मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १६

वेदस्तुति - श्लोक १६

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


इति तव सूरयस्त्र्यधिपतेऽखिललोकमलक्षपणकमलक्षकथाऽमॄताऽब्धिमवगाह्नातपांसि जहु: ॥
किमुत पुन: स्वधामविधुताशयकालगुणा: परम भजंति ये पदमजस्त्रसखानुभवम् ॥१६॥

॥टीका ॥ सर्व कारणत्वें तूं वास्तव ॥
ऎसा परमार्थनिर्वाह ॥
श्रुतिही बोलोनि महानुभाव ॥
द्दढाविती ॥३२॥
त्रिगुणमायामॄगीनर्तन ॥
कर्ता म्हणोनि संबोधन ॥
अधिपतें हें तुजलागून ॥
श्रुतींही पूर्ण केलें असे ॥३३॥
भो भो अधिपते परेशा ॥
सूरि म्हणिजे विवेकी पुरुषां ॥
तिहीं तुझिया अमळयशा ॥
सेवनि दोषा त्यागिलें ॥३४॥
ते विवेकी म्हणसी कैसें ॥
जिहीं तव यश अति उत्कर्षें ॥
लक्षिलें तेंचि विशेषणवशें ॥
श्रतिसंदभै अवधारीं ॥३५॥
अखिल म्हणिजे संपूर्ण लोक ॥
श्यांचे कायिक वाचिक मानसिक ॥
मळक्षपणीं पटुतर देख ॥
कथामॄताब्धि हाचि तुझा ॥३६॥
त्यांमाजीं करुन अवगाहन ॥
त्रिविध पापतापांचे दहन ॥
करुनि टाकिती निपटून ॥
स्वानंदघन मग होती ॥३७॥
कथामात्रें पापताप ॥
त्यागिती ऎसा तव प्रताप ॥
माझें वास्तव चित्स्वरुप ॥
भजोनि संकल्प निरसिती ॥३८॥
चित्स्वरुप तें तव धाम ॥
तन्निष्ठ जे कां आत्माराम ॥
त्यागिती आशयसह गुणधर्म ॥
किमुत परम हें म्हणणें ॥३९॥
आशय म्हणजे अंत:करण ॥
एतध्दर्म रागादि पूर्ण ॥
जन्मापासूनि जरामरण- ॥
पर्यंत गुण काळकृत ॥४०॥
अंत:करणचतुष्टय ॥
मनोधिचित्ताद्यहंतामय ॥
धर्म म्हणिजे तयाचे विषय ॥
अवस्थात्रयात्मक अवघे ॥४१॥
एवं रागद्वेषादिक ॥
तृष्णादुराशावासनात्मक ॥
यांच्या अवलबें अविवेक ॥
बुडवी निष्टंक भवडोहीं ॥४२॥
ऎसे आशय काळगुण ॥
तुरि क्षाळिती तुज भजोन ॥
भो भो परम हें संबोधन ॥
करुनि श्रुतिगण काय वदे ॥४३॥
अमलवास्तव त्वध्दाभभजनें ॥
आशयकाळगुण क्षाळणें ॥
अखंडैकरससुख भोगणें ॥
किमुत म्हणणें हें नवल ॥४४॥
ऎसे सूरि विवेकनिष्ठ ॥
संप्रज्ञातहि वर्ततां स्पष्ट ॥
नलिनीदलवत्‍ भवास्पृष्ट ॥
नित्य भ्राजिष्ट निर्लेप ॥४५॥
इष्टानिष्टमिश्र त्रिविध ॥
येणेंचि कर्मलेपें बध्द ॥
होवोनि भोगिती कर्मविरुध्द ॥
तन्मुक्त शुध्द ते होती ॥४६॥
ऎसा श्रुतिगण कविजन चर्याअ ॥
प्रमाण करुनि अनुवादलिया ॥
पुढती तव गुणां कां चिन्मयां ॥
न भजति तयां धिक्करिती ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP