मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २४

वेदस्तुति - श्लोक २४

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


क इह नु वेद बतावरजन्मलयोऽग्रसरं यत उदगादृषिर्यमनु देवगणाउभये ॥
तर्हि न सन्न चासदुभयं न च कालजव: किमपि न तत्र शास्त्र-मवकृष्य शयीतयदा ॥२४॥ (११)

॥ टीका ॥
बत या अव्ययार्थे श्रुति ॥
भो भगवन्ता ऎसे म्हणती ॥
अग्रसर तूं इये जगती ॥
सर्वा पूर्वी स्वत:सिध्द ॥८८॥
तया तूतें अर्वाचीन ॥
उत्पत्तिस्थितिनाशवान ॥
जाणो शकेल पुरुष कोण ॥
ज्ञानकारणावांचूनि ॥८९॥
सर्वत्र तुजहूनि अलीकडे ॥
यदर्थी काय प्रमाण घडे ॥
तरी यतउदगात् या पदे कोडें ॥
देऊनि अलीकडे ॥
यदर्थीं काय प्रमाण घडे ॥
तरी यतउदगात्‍ या पदें कोडें ॥
देऊनि झाडे सूचविलें ॥९०॥
यत: म्हणिजे ज्यापासून ॥
प्रथम ऋषि जों कां द्रुहिण ॥
उत्पन्न झाला तेणें सृजन ॥
केलें संपूर्ण सॄष्टीचे ॥९१॥
आधिदैविक आध्यात्मिक ॥
द्विविध देवगण द्रुहिणें देख ॥
सृजिले तिहीं विश्व सम्यक ॥
रचिलें अर्वाक उत्तरोत्तर ॥९२॥
ऎसें तुजमाजी तुजपासून ॥
या विश्वाचें स्थितीलयसृनन ॥
एंव तुजहूनि अवीचीन ॥
तुज कोठून जाणती हे ॥९३॥
ऎसें अर्वाकू उत्तरोत्तर ॥
तुजसीं पडतां बहु अंतर ॥
म्हणोनि न कळे यां तव पार ॥
पडिला अंधार अज्ञाने ॥९४॥
आणि जेव्हां सर्व आकर्षून ॥
आपणामाजि करुनि लीन ॥
योगमायामंचकीं शयन ॥
उपसंहरुन तं करिसी ॥९५॥
तेव्हां समस्त जीव कोटी ॥
निद्रित होती मायेच्या पोटीं ॥
ज्ञानसाधनांची त्यां गोठी ॥
नाहीं शेवटी निद्रिता ॥९६॥
तेव्हां नाहीं सदसद् ॥
स्थूलसूक्ष्मादिक जें विशद ॥
दोही मिळोनि एकविध ॥
तो शरीरभेद नसेचि तैं ॥९७॥
तेव्हां नाहीं काळवेग ॥
अक्षरपळघटिकाब्दयुग ॥
काळ वैषम्य प्रसंग ॥
तोहि मार्ग नसेचि तैं ॥९८॥
तेव्हां कैंचे पृथक् प्राण ॥
तेथ कैंचा इंद्रियगण ॥
शास्त्रही ज्ञानसूचक पूर्ण ॥
कैचें कोठून त्या ठायीं ॥९९॥
तुजपासूनि जन्मला द्रुहिण ॥
तेणें मन्वादि महर्षिगण ॥
उत्तरोत्तर प्रजासृजन ॥
केला उत्पन्न करावया ॥५००॥
आध्यात्मिक आधिदैविक ॥
व्यष्टिसमष्टिकरणाश्मक ॥
द्विविधदेवताचत्र्कविवेक ॥
झाला अर्वाक तुजहूनी ॥१॥
तया देवता चत्र्कद्वारां ॥
विपरीत ज्ञानाचा उभारा ॥
देहवंता प्राणिमात्रां ॥
अविद्यापरां औपाधिका ॥२॥
तेणे काळकाळान्तरें ॥
तुजसीं अंतर पडिलें खरें ॥
यास्तव अज्ञान अंधारें ॥
अविद्याभरें दृढावलें ॥३॥
असो देहादि  उपाधिवन्तां ॥
मळिनसत्वां काळान्तरितां ॥
भगवज्ज्ञानी अनर्हता ॥
घडे तत्वता या अर्थें ॥४॥
परंतु प्रळयाच्या अवसरीं ॥
लय पावल्या चराचरीं ॥ ।
समस्त गुणसाम्यें माझीरी ॥
जीव कोटि लीन होती ॥५॥
मायामंचकीं तुझें शयन ॥
तैं जीवां तुजसी सन्निधान ॥
असतां तुझें वास्तव ज्ञान ॥
नोहे संपूर्ण जगदीशा ॥६॥
प्राणादिकरणांचा समुदाय ॥
इहीं साधनीं जाणिजे ज्ञेय ॥
तूंहीं न होसी ज्ञेयविषय ॥
साधन-समुच्चय नसेचि तैं ॥७॥
तेथ शास्त्र ना शास्त्रवक्ता ॥
श्रवण श्रोता ना मननकर्ता ॥
एवं वास्तवज्ञानवार्ता ॥
नोहे तत्वता दोहीं परी ॥८॥
यास्तव होवोनि तवाड्:घ्रिशरण ॥
सप्रेम करितां नवबिध भजन ॥
कृपेनें द्रवूनि बोधिसी ज्ञान ॥
तरी भक्तिसाधन वर सर्वा ॥९॥
याचि श्रुत्र्यर्था दृढीकरण ॥
करावया व्यासनंदन ॥
करुनि अनेकमतखंडन ॥
करी ब्याख्यान तें ऎका ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP