मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १९ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १९ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १९ Translation - भाषांतर स्वकॄतविचित्रयोनिषु विशन्निव हेतुतया तरमतश्वकास्स्यनलव्त्स्वंकृतानुकृति: ॥अथ वितथास्वभूष्ववितथं तव धाम समं विरजधियोऽन्वयंत्यभिविपण्यव एकरसम् ॥१९॥॥ टीका ॥तरीं जीवांचे तारतम्य ॥सहसा नोहे ईश्वरासम ॥केंवि तें दोहींमाजी प्रथम ॥जीवांचेचि श्रुति वदती ॥१९॥स्वकॄत म्हणिजे निजाचरित ॥इष्ट अनिष्ट आणि मिश्रित ॥तदनुसार होती प्राप्त ॥विचित्र योनिफ़ळभोगा ॥२०॥मग त्या विचित्र योनीमाजी ॥कर्म संकल्प फ़ळभोग बिजीं ॥अनुप्रवेश करुनि सहजीं ॥आविष्कारें अवभासे ॥२१॥परिमित निर्मित पुरातनें ॥योनि म्हणिजे जन्मस्थानें ॥तेथ जन्मूनि तदभिमानें ॥देह होवोनि विचंबिजे ॥२२॥खेचर भूचर जलचर योनी ॥स्थावर जंगम वनचर कोण्ही ॥योनींमाजी देह श्रेणी ॥अनुकरुनि तारतम्यें ॥२३॥कुत्र्जरयोनी परमथोर ॥मशक मॄकुट अतिलघुतर ॥तारतम्यें तदाकार ॥आविर्भवूनि आनुकरे पैं ॥२४॥अनळ म्हणिजे पावक जैसा ॥लहानथोर इन्धनासरिसा ॥अनुकरुनि निज प्रकाशा ॥करी तद्वत् जीवही पैं ॥२५॥स्वकर्म कॄता ज्या ज्या योनि ॥त्यांमाजी तैसाचि अनुकरुनि ॥जीव प्रकाशे म्हणवूनि ॥स्वकॄतानुकॄति बुध म्हणती ॥२६॥तया जिवांचिये परी ॥तारतम्य परमेश्वरीं ॥कैसें न घडे तें श्रुतिनिकरीं ॥वाखाणिजेतें तें ऎका ॥२७॥न रमी एकाकी म्हणोन ॥बहुधा चित्र योनि निर्मून ॥त्यांमाजी तैसाचि अनुकरुन ॥कूटस्थपणें अवभाससी ॥२८॥स्वकॄता योनींच्या अनुकारें ॥अनुकरुनि तदाकारें ॥भाससी म्हणोनि तुज बुधनिकरें ॥स्वकॄतानुकृति म्हणिजे तो ॥२९॥कर्मजनित योनिप्रभव्व ॥आधीं निर्माण होय देह ॥तेथ प्रवेश करी जीव ॥तैसा भाव तुज न घडे ॥३०॥जैसी तृणजलूका काडी ॥पुढील धरुनि मागील सोडो ॥तैशा देहाच्या परवडी ॥स्वकर्म आवडी जीव धरी ॥३१॥तैसें घडे तुज ईश्वरा ॥जेविं स्वयंभ गगनोदरा- ॥माजी होतां घटमठनिकरा ॥गमे अंबरा अनुकरणें ॥३२॥किंवा पावक प्रसवोनि जळ ॥द्रमाकार होय सकळ ॥तयांचे गर्भीं आपुलें स्थळ ॥पूर्वीच असे कीं मग निर्मीं ॥३३॥तेंवि स्वकॄता योनींमाजीं जाण ॥पूर्वीच अससी तूं विद्यमान ॥प्रविष्टा परी तदनुकरण ॥प्राकॄत जन अवगमिती ॥३४॥मिथ्या विवर्तरुपा योनी ॥त्यांमाजीं वास्तव तुज वाचूनी ॥नाहींच ऎसें जाणती ज्ञानी ॥जें श्रुतिवननीं प्रतिपाद्य ॥३५॥जीव प्रविष्ट एका देहीं ॥सर्वभूती तूं निगूढ पाहीं ॥भूतान्तरात्मा ठायींच्या ठायीं ॥सर्वव्यापी साक्षिस्वें ॥३६॥सर्व भूतांमाजी वसता ॥कर्माध्यक्ष साक्षी चेता ॥केवळ निर्गुण अविकारता ॥म्हणोनि स्तविती श्रुतिनिचय ॥३७॥विवर्तरुपा योनि मिथ्या ॥त्यांचें कारण तूं वस्तुता ॥इहामुत्रिकफ़ळकर्मरहिता ॥सन्मात्र तत्त्वता एकरस तूं ॥३८॥सांडूनि रजस्तमांचा लेप ॥विशुध्द मति जे निर्लेप ॥ज्यांसी नातळे पापताप ॥जे निप्पंक गुणरहित ॥३९॥इहामुत्रिकफ़ळाभिलापी ॥कर्मव्यवहार न शिवे ज्यांसी ॥ते तुज जाणती निश्र्चयेंसी ॥सन्मात्रासी स्वात्मत्वें ॥४०॥यास्तव विभो तुझ्या ठायीं ॥उपाधिकृत हें तारतम्य नाहीं ॥अविच्युत ऎश्वर्य यास्तव पाहीं ॥उपास्यत्व तुजचि घडे ॥४१॥पूर्व शंकेची निवृत्ति ॥केली असतां येथ पुढती ॥परमाश्र्यर्य मानूनि चितीं ॥वदती श्रुति तें ऎका ॥४२॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP