मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १३

वेदस्तुति - श्लोक १३

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


यथा शयानं सम्राजं बन्दिनस्तत्पराक्रमै:॥
प्रत्यूषेऽभ्येत्य सुश्लाकैर्बोधयंत्यनुजीविन: ॥१३॥

॥टीका ॥ जैसा सुप्तसम्राट्‍ चक्रवर्ती ॥ तद‍नुक्रमें ज्यां जीविकावृत्ति ॥
ते बंदिजन तयाप्रति ॥ उपौढ करिती प्रत्युषीं ॥७२॥
सुश्लोक ह्मणिजे उत्तम कीर्ति॥ तत्कृत गाऊनि करिती स्तुती ॥
लाहूनि तत्पूर्वी जागृति ॥ जेंवि बोधिती अनुजीवी ॥७३॥
प्रभूच्या जागृतिसमयापूर्वीं ॥ येऊनि प्रत्यूषीं अनुजीवी ॥
प्रबोधिती श्रुतिही तेंवी ॥ निजगोसावी जागविती ॥७४॥
अनंतगुणीं जो परिपूर्ण ॥ अमलयशोमय तद्‍गुणगण ॥
तन्नि:श्वासीं लाहोनि जनन ॥स्तविती श्रुतिगण तें ऐका ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP