वेदस्तुति - श्लोक १८
' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे.
उदरमुपासते य ॠषिवर्त्मसु कूर्पदृश: परिसरपद्धतिं ह्नदयमारुणयोदहरम् ॥
तत उदगादनंत तव धाम शिर: परमं पुनरिय यात्समेत्य न पंतति कॄतांतमुखे ॥१८॥ (५)
॥ टीका ॥
कूर्पदृश जे शार्कराक्ष ॥
ऋषिमार्गीं ते धरुनि लक्ष ॥
कैवल्यलाभास्तव प्रत्यक्ष ॥
उदरं ब्रह्योति उपासिती ॥९३॥
ॠषींचिया संप्रदायमार्गें ॥
शार्कराक्ष निजाधिकारविभागें ॥
उदर उपासिती निजाडें ॥
कोण्या लिड्गें तें ऎका ॥९४॥
कूर्प म्हणिजे सिकतारज ॥
ज्यांचे दृष्टीसी वर्ते सहज ॥
शार्कराक्ष नामें त्यांतें बुझ ॥
स्थूळदृष्टी भवभजक ॥९५॥
हुदयाहूनि स्थूळ उदर ॥
तदूपासनीं जें सादर ॥
म्हणाल कोण देवतापर ॥
उपासनासार पैं त्यांचें ॥९६॥
उदरनिष्ठ जो जठराग्नि ॥
अग्नि देवांचा विष्णु म्हणोनि ॥
प्रतिपाद्य श्रुतिस्मृतींच्या वचनीं ॥
मणिपूरस्थ उपासिती ॥९७॥
अहं वैश्वानरो भूरवा ॥
ऎसा स्मॄत्यर्थ जाणावा ॥
यदर्थीं श्रुतींचा यावा ॥
भाषाग्रंथिं न ये लिहितां ॥९८॥
येचि स्मृतीचें व्याख्यान ॥
मधुसूदनी टीकेवरुन ॥
पाहतां श्रुत्यर्थ विवरण ॥
विध्दज्जनीं विलोकिजे ॥९९॥
तस्मात् जाठर वैश्वानर ॥
प्रत्यक्ष होऊनि परमेश्वर ॥
प्राणिमात्रांचें वसवी उदर ॥
हा निर्धार श्रुतिस्मृतींचा ॥३००॥
जाणोनि केवळ कूर्पदृश ॥
जे म्हणिजेति शार्कराक्ष ॥
स्थूळदृष्टि रजाक्त अक्ष ॥
त्यांचें लक्ष हें कथिलें ॥१॥
आरुणिसंप्रदायत्र्कम ॥
प्राचीन ऋषींचें अधिष्ठूनि वर्त्म ॥
कूर्प म्हणिजे परम सूक्ष्म ॥
दृष्टी परमात्मपर ज्यांच्या ॥२॥
ह्रदयस्थ जें परमात्मतत्त्व ॥
लक्षूनि तत्प्राप्ती उपाव ॥
उदरोपासनेचा भाव ॥
धरिती स्वयमेव तल्लामा ॥३॥
शार्कराक्षांची कथिली कथा ॥
यावरी ऎका अरुणिपथा ॥
साक्षात्परमात्मया ह्रदयस्था ॥
सूक्ष्मातेंचि उपासिती ॥४॥
ह्रदयस्थ सूक्ष्म म्हणाल कैसा ॥
किरणवेष्टित भास्कर जैसा ॥
परिसरनाडींचिया प्रकाशा ॥
माजी आपैसा द्योतक जो ॥५॥
तया ह्रदयस्था परम सूक्ष्मा- ॥
माजी लक्षूनियां परमात्मा ॥
उपासिती पूर्णकामा ॥
वास्तव तध्दामा ठाकावया ॥६॥
हुदयरविन्दाभवंती घरटी ॥
शतैकनाडी कर्णिकापिठीं ॥
किरण जैसै भास्करा निकटीं ॥
तत्परिपाठीं देदीप्य ॥७॥
तयां मध्यग जे कां दहरी ॥
तन्वी नीवारशूकापरी ॥
तेज:पुत्र्ज तयेच्या अग्रीं ॥
पीता भास्वती अणूपम ॥८॥
ब्रह्या विष्णु शिव केवळ ॥
स्वाराट् तोचि अखंडळ ॥
ऎसा महिमा श्रुतींचा मेळ ॥
वर्णिती बहळ व्याख्यानीं ॥९॥
मूळाधारापासूनि दहरी ॥
व्यापक तत्प्रभा सर्व शरीरीं ॥
ह्रदयापासूनि मूर्ध्नीवरी ॥
सुषुन्नामार्गें उर्ध्वग पैं ॥१०॥
त्यावरी सुषुन्नावर्त्म अधिष्टून ॥
जे ठाकिती मूर्ध्निस्थान ॥
भो अनंता ते तुजमाजीं पूर्ण ॥
समरसोन विराजती ॥११॥
उत्कॄष्ट जें कां तुझें धाम ॥
तें ते पावूनि मुनिसत्तम ॥
टाकिती संपूर्ण संसारश्रम ॥
उत्तमोत्तम सुख लाभे ॥१२॥
पुढती संसार जो कृतान्त ॥
सहसा तन्मुखीं न होती पतित ॥
ऎसा श्रुतींचा सिध्दांत ॥
शुक बोधित कुरुवर्या ॥१३॥
श्रुती म्हणतो भो परेशा ॥
झणें तूं म्हणसी जीवांसरिसा ॥
मी ईश्वरही अनुप्रवेशा ॥
पावोनि निवासा पवितसें ॥१४॥
अपरनाडीमागें जाती ॥
त्यांची न चुके पुनरावृत्ती ॥
तेथ पुढती शंका करिती ॥
ते तूं नृपती अवधारीं ॥१५॥
उदर ह्रदय मूर्ध्निस्थान ॥
उत्तरोत्तर न्यून पूर्ण ॥
ईश्वरासहि जीवासमान ॥
तारतम्यें असतां पैं ॥१६॥
तरी मग कोण्या विशेषणें ॥
उपास्यता ईश्वराकारणें ॥
किमर्थ जीवीं ईश्वरा भजणें ॥
सामान्यपणें तारतम्यें ॥१७॥
ऎसिया शंकेच्या परिहारा ॥
श्रुति म्हणती परमेश्वरा ॥
यदर्थी सहसा शंका न करा ॥
ऎका उत्तरा भो स्वामी ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2017
TOP