मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३८

वेदस्तुति - श्लोक ३८

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


स यदयजा त्वजामनुशयीत गुणांश्च जुषन्भजति सरुपतां तदनु मॄत्यु-मपेभग: ॥
त्वमुत जहासि तामहिरिव त्वचमात्तभगो महसि महीयसे‍ष्ट गुणितेऽपरिमेयभग: ॥३८॥ (२५)

॥ टीका ॥
सनंदन म्हणे श्रोतयां प्रति ॥
ईश्वर नित्य मुक्त कवणें रीती ॥
जीवासि संसाराची प्राप्ति ॥
केंवि ते श्रुत्युक्ति अवधारा ॥१॥
तरी जो जीव मायेकरुन ॥
ज्या कारणास्तव भ्रमोन ॥
अविद्येसी अनुशयी पूर्ण ॥
झाला विसरुन आत्मत्वा ॥२॥
म्हणाल माया कैसी कोण ॥
अविद्येचें काय लक्षण ॥
तें ऎकावें निरुपणा ॥
यथा ज्ञानें कथिजेल ॥३॥
केवळ पूर्णपणें चैतन्य ॥
असतां स्फ़ुरलें अहंपण ॥
तेचि माया जाणिजे सगुण ॥
बीज संपूर्ण भवाचें ॥४॥
हेंचि पुढें विश्वरुप ॥
विस्तारली सविक्षेप ॥
जीस्तव जीव पावे अविद्यालेप ॥
ते ऎला संक्षेप त्र्कमरीती ॥५॥
जैसी समुद्रीं उठिली ऊर्मी ॥
ते अनेक बुद्‍बुदांलागीं निमी ॥
ते असोनिही जळत्व धर्मी ॥
बुद्‍बुदनामीं अभिव्यक्ता ॥६॥
जितुकें बुद्‍बुदाकारें उंचावलें ॥
तितुकेंचि बुद्‍बुद नामाथिलें ॥
समानत्व जें राहिलें ॥
उदक बोलिलें जयापरी ॥७॥
तेंवि अहंपणें वेढले ॥
तेचि मायोपाधिक बोलिले ॥
तेथें ही मायेसी अनुसरिले ॥
तितुकेचि पातले जीवत्वा ॥८॥
मायाध्यासें घनावला ॥
विसर तोचि अविद्या बोलिला ॥
अविद्यायोगें संसार स्फ़ुरला ॥
विपरीत ज्ञानें जीवासी ॥९॥
महत्तेजावलोकनें आपैसी ॥
दृक्‍तेजीं झांपडी पडे जैसी ॥
मग तमोगर्भीं रंगविशेषीं ॥
तये दष्टीसी अवगमिजे ॥१०॥
तेंवि स्वस्वरुपाठवें विरमली ॥
निजवृत्ति जडत्वा पातली ॥
तमत्वें अविद्या बोलिली ॥
पुढें विक्षेपली सत्वर जे ॥११॥
ते अज्ञानरुप अविद्या ॥
तीमाजी सुलीन जीव सद्या ॥
विसरला स्वरुपा अनादि आद्या ॥
अभेद अच्छेद्या भ्रमास्तव ॥१२॥
म्हणोनि यी रीती माये करून ॥
जीव अविद्या आलिंगी आपण ॥
तेव्हां तज्जनित देह कवळून ॥
आत्मत्वें पूर्ण अध्यासी ॥१३॥
अतं:करणादि वॄत्यंकुर ॥
हे भोक्तॄज्ञातॄसंज्ञापर ॥
सत्वगुणात्मक अविद्याप्रसर ॥
कतृकरण या म्हणिजी ॥१४॥
ज्ञानेन्द्रियें कर्मेन्द्रियें ॥
पंचप्राणिदि निश्चयें ॥
राजस सर्ग हा अविद्यामय ॥
तमें होय विषयादि ॥१५॥
एवं एतदात्मक लिंगदेह ॥
याचें आयतन नि:संदेह ॥
स्थूळशरीर भूतमय ॥
आपणा तन्मय मानीतसे ॥१६॥
मग त्या देहाचे जे धर्म ॥
सुखदु:खादि विकार परम ॥
तन्निमित्तें भोग अधम ॥
भोगी उत्तम होत्साता ॥१७॥
देह जन्मला जये याति ॥
तेचि मानी आपणाप्रति ॥
देह असतां अस्तित्वप्रतीति ॥
धरुनि चित्तीं भ्रम वाहे ॥१८॥
मी बाळ मी आहें तरुण ॥
मी वृध्द मी पुष्ट रुग्ण ॥
मी  पवित्र मी पापी पूर्ण ॥
मूर्ख सज्ञान मी म्हणे ॥१९॥
प्रिय संवादें अथवा गानें ॥
संतोष मानी आपुल्या मनें ॥
निन्दा किंवा भीकर वर्णें ॥
सुखदु:खश्रवणें अनुभवी ॥२०॥
एवं शब्द-स्पर्श-रुप-रस ॥
गंधादि विषय हे तामस ॥
अनुकूळप्रतिकूळत्वें त्रास ॥
मानी तोष श्रवणादि कीं ॥२१॥
तया विषयसेवनासाठीं ॥
गॄहधन-दारादि आटाटी ॥
करी विशेषें  न मनूनि खोटी ॥
मग होय कष्टी फ़ळपाकीं ॥२२॥
एवं देहात्मत्वें विषयसेवन ॥
करुनि विसरला पूर्णपण ॥
म्हणोनि हतभाग्य झाला आपण ॥
जन्ममरण पावतसे ॥२३॥
सत् असोनि असत् झाला ॥
चिन्मय असतां जडत्वा आला ॥
आनंदरुप दु:खे श्रमला ॥
वैगुण्य पावला परोपरी ॥२४॥
ऎसा जीव अपेतभग ॥
म्हणिजे आनंदादि गुण अव्यंग ॥
लोपले ज्याचे नैसर्गिक ॥
अविदद्ययोग झालिया ॥२५॥
जैसा ब्राह्यण कामें भुलला ॥
अंत्यजीसंगें भ्रष्ट झाला ॥
षडिवध कर्मापासूनि च्यवला ॥
पातित्य पावला तत्काळ ॥३६॥
किंवा राजा दुष्टाष्टप्रकॄती- ॥
संगें पावे ऎश्वर्यच्युति ॥
तैसी जीवांची हे स्थिती ॥
झाली निश्चिती उपहत ॥२७॥
ऎसा पिहितानंदादिगुण ॥
होत्साता संसारवैगुण्य ॥
पावे दु:खद जन्ममरण ॥
वास्तव मीपण विसरुनी ॥२८॥
तयाचा जीवाचाचि विषय ॥
कर्मकांड हा निश्चय ॥
प्रवॄत्तिनिवॄत्तिकारक होय ॥
सम्यक उपाय त्र्कियात्मक ॥२९॥
श्रुति म्हणती जगदीश्वरा ॥
अनंता अपारा अक्षरा ॥
जीव भोगी संसारा ॥
अविद्यापुरा अधिष्ठूनी ॥३०॥
तूं तये मायेचा त्याग ॥
करुनि राहसी नि:संग ॥
केवळ सन्मात्रत्वें अभंग ॥
निष्कलंक अद्वितीय ॥३१॥
म्हणसी तें माझ्याचि ठायीं आहे ॥
मजवीण क्षण भिन्न न राहे ॥
ममाश्रयचि सहजा जिये ॥
केंवि मज होय तत्त्याग ॥३२॥
तरी सर्पा आंगीं त्वचा जैसी ॥
न टाकूनी टाकी आपैसी ॥
आभासरुपा माया तैसी ॥
तूं त्यागिसी तद्वत पैं ॥३३॥
ये दृष्टांतीं ऎसा भाव ॥
स्वगत ही कचुक सावेव ॥
असतां न मनीं गुणवैभव ॥
आदि स्वयमेव निश्चयें ॥३४॥
त्वचा असतां अतिभूषण ॥
अथवा न मनीच दूषण ॥
गेलिया न स्मरे उदासीन ॥
जणिजे म्हणोन त्यक्तवत् ॥३५॥
गुणवती जे माया अजा ॥
तूं सांडिसी तैसिया वोजा ॥
हें आश्चर्य काय संवित्पुब्जा ॥
तुज केवळ निजानंदमया ॥३६॥
निरंतरा ह्नादरुपिणीं ते उपेक्षिसी ॥३७॥
न इच्छी निश्चिती तयेसी ॥३८॥
अजाजनित विषयसुख ॥
जें क्षणित आणि अल्पक ॥
जीव कामिती अज्ञानमूर्ख ॥
हीनविवेक मतिमंद ॥३९॥
तूं नित्यानंद सुखकल्लोळ ॥
स्वसंवित्फ़ुरणरोळ ॥
तद्रताह्लादें पूर्ण केवळ ॥
उपेक्षाशीळ मायेतें ॥४०॥
म्हणसी मज कोठून हें सामर्य्थ ॥
तरी ऎकावें करुनि स्वास्थ्य ॥
जें निरोपितसों यथातथ्य ॥
ऋतनिर्मथ्यविशेषणें ॥४१॥
तूं परमात्मा आत्तभग ॥
म्हणजे निरंतर अव्यंग ॥
तुज ऎश्वर्य अमोघ ॥
जें अजस्त्र साड्रग तव धामीं ॥४२॥
उत्कॄष्ट ऎश्वर्य अष्टगुणित ॥
अणिमादिमत्प्तिध्दिमंत ॥
येथ शोभसी इत्थंभूत ॥
अपरिमित सभाग्य तूं ॥४३॥
अणिमा गरिमा लघिमा महिमा ॥
प्राप्ति साहवी प्राकाम्या ॥
ईमित्व वशित्व ऎशा परमा ॥
सहज सुगमा तुजलागीं ॥४४॥
अणिमा म्हणिजे अणूहूनि सान ॥
होऊनि वर्तणें आपण ॥
गरमा म्हणिजे स्थूळ होऊन ॥
राहणें जाण लघु असतां ॥४५॥
तरी तूं सहज अणूहूनि अणीयान ॥
महताहूनि ही महीयान ॥
गगनासही तूं सांठवण ॥
निश्चयें करुनि श्रुति बोले ॥४६॥
लघिमा म्हणिजे अति लाघवें ॥
सर्व ही करणें चापल्यमावें ॥
तरी सर्वीं सर्वपणें स्वभावें ॥
न करुनि आघवें तूं करिसी ॥४७॥
महिमा म्हणिजे सर्वत्र पूज्य ॥
होणें जें कां किर्तीपूत्र्ज ॥
तरी तूं ईड्रय निगमीं सहज ॥
ब्रह्यादि तुज भजताति ॥४८॥
प्राप्ति म्हणिजे संकल्पमात्र ॥
करितां दुर्लभ ही विचित्र ॥
पदार्थ प्राप्त व्हावे स्वतंत्र ॥
असतां स्थिर स्वस्थानीं ॥४९॥
तूं पूर्णपणें सर्वत्र सर्वीं ॥
संप्राप्त अससी पदार्थापूर्वीं ॥
अधिष्ठानत्वें व्यापक विभवीं ॥
हे प्राप्ति गुवीं तव रुपीं ॥५०॥
प्राकाम्या जे कामिल्या ठायां ॥
कामिल्या सारिख्या रुपा जया ॥
धरुनि जाणें पालटूनियां ॥
आपुली काया बहुरुप ॥५१॥
ईशित्व म्हणिजे सर्वत्र सत्ता ॥
आज्ञा मानिजे सर्वी तत्वता ॥
तरी कारणत्वें तूंचि शास्ता ॥
तुझेनि भूतां वर्तणूक ॥५२॥
तरी व्यापकत्वें सर्वां ठायीं ॥
सर्व रुपें तॄंचि पाहीं ॥
तुजवीण पदार्थमात्र नाहीं ॥
जाणती ह्नदयीं विपश्चित ॥५३॥
वशित्व म्हणजे वश होऊन ॥
इतरीं व्हावें पैं स्वाधीन ॥
तरी भूतां तव तंत्रवर्तन ॥
चेष्टक संपूर्ण तूं त्यांसी ॥५४॥
एवं स्वत:सिध्द अष्टविभूति ॥
तुझ्या ठायीं संविन्मूर्ति ॥
तेथ शोभसी अजस्त्रस्थिति ॥
अमोघकीर्ति परमात्मा ॥५५॥
इतरांसारिखें परच्छिन्न ॥
देशकाळादिनियमेंकरुन ॥
नव्हे तव ऎश्वर्यमान ॥
अमोघ परिपूर्ण निरंतर ॥५६॥
आकाश तेथवरी अवकाश ॥
तेंवि परिपूर्ण तूं परेश ॥
तत्संबंधें ऎश्वर्य अशेष ॥
अपरिमित निर्दोष सहजेंची ॥५७॥
यास्तव अपरिमेयभग ॥
हें आसमंतात् जाणावया योग्य ॥
तुझें ऎश्वर्य नाहीं साड्र्ग ॥
तो तूं अव्यंग मायातीत ॥५८॥
सनंदन म्हणे श्रोतयांस ॥
ऎसा नित्यमुक्त ह्नषीकेश ॥
जीव अविद्याबंधनीं सक्लेश ॥
कर्मकाण्डास आधिकारी ॥५९॥
म्हणोनि पूर्वाक्तप्रकारें ॥
सत्प्राप्तिसाधननिकरें ॥
स्वहिताकारणें अति आदरें ॥
जी भगवंताते भजताती ॥६०॥
यथोक्त वर्णाश्रमाचरण ॥
करुनि प्रपंचीं विरक्त पूर्ण ॥
होऊनि सत्यमागमें निपुण ॥
होईजे विचक्षण विचेकें ॥६१॥
मग अनन्यभावें सद्रुरुचरण ॥
सेवितां उपजे उपनिषज्ज्ञान ॥
भगवत्तत्व अनुभवें पूर्ण ॥
तैं भजिजे भगवान अभेदें ॥६२॥
साधनसंपन्न विवेकी ऎसे ॥
भगवंतातें भक्तिविशेषें ॥
भजती ते हा भव आपैसे ॥
तत्कॄपावशें तरताती ॥६३॥
इतर जे कां भजनविमुख ॥
विषयसेवनपर नि:शंक ॥
ते भवीं बुडती हीनविवेक ॥
पावती दु:ख जननादि ॥६४॥
आणि जे देखोवेखी ॥
घेती जोग ॥
भोगीं पावूनिया उपसर्ग ॥
किंचित आश्रयिती भगवन्मार्ग ॥
विवेकवैराग्य न होतां ॥६५॥
जैशा नारी प्रसूतिकाळीं ॥
कीं स्मशानीं माणसें भोळीं ॥
विराग पावती भोगफ़ळीं ॥
पुन्हा विषयशाळी पूर्ववत् ॥६६॥
तेंवि रजस्तमात्मक अषढ्ढाळें ॥
कर्में करितां गात्रें विकळें ॥
होतां किंचित् त्रास उजळे ॥
तैं टाकिती सळें बहि:संग ॥६७॥
प्रतिकूळ्व्यवसायें होती दु:खी ॥
म्हणती नि:संग असती सुखी ॥
त्याग करिती देखोवेखीं ॥
भ्रष्टती शेखीं उभयत्र ॥६८॥
कीं त्यागिले जे जे भोग ॥
पुन्हा इच्छिती त्यांचा योग ॥
म्हणोनि वान्तभक्षक ते अव्यंग ॥
कामानुराग घरिताती ॥६९॥
त्यांसि न होय भगवत्प्राप्ति ॥
ना इहलोकीं सुखावाप्ती ॥
अंतीं कुयोनि पावती ॥
क्लेशी होती एनसे ॥७०॥
जे जे काम कामीं अंतरीं ॥
त्यातें शोची परोपरी ॥
भोग्य मानूनि वासना धरी ॥
कर्मे जन्मे तेथ तेथ ॥७१॥
इत्यादि श्रत्यर्थविवरणें ॥
सनंदन श्रोत्यां कारणें ॥
बोले जें विशद बोलणें ॥
सम्यगवधानें तें ऎका ॥७२॥


References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP