मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ९

वेदस्तुति - श्लोक ९

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ श्रीभगवानुवाच ॥
स्वायंभुव ब्रह्मसत्रं जनलोकेऽभवत्पुरा ॥
तत्रस्थानां मानसानां मुनीनामूर्ध्वरेतसाम्‍ ॥९॥


॥टीका॥ भाविभूतवर्तमान ॥ ज्ञाता सर्व नारायण ॥
स्वमुखें नारदालागून  । इतिहास प्राचीन निरुपी ॥३६॥
पूर्वी जनलोकाच्या ठायीं ॥ ब्रह्मसत्र होता पाहीं ॥
स्वायंभुव या नामें तिहीं ॥ लोकीं सर्वही जाणती जें ॥३७॥
स्वयंभू यजमान जिये सत्रीं ॥ यालागीझं स्वायंभुव हे नाम वक्त्रीं ॥
श्रेष्ठीं वदतां चराचरीं ॥ ख्यात झालें सर्वत्र ॥३८॥
परंतु सत्रें बहुविध असती ॥ मीमांसात्मकें शंसिलीं श्रुती ॥
त्यांमाजीं स्वायंभुव हे व्युत्पत्ती ॥ व्दिविध श्रोतीं परिसावी ॥३९॥
स्वयंभू जे सत्रीं यजमान  । तयासी स्वायंभुव अमिधान ॥
स्वयंभूपासोनि ज्यांचें जनन ॥ तें तपोधन स्वायंभुव ॥४०॥
कर्मकलाप यथोक्त चांग ॥ ऋत्विज यजमान यथायोग्य ॥
प्रायश्चित्ताचा न पडे पांग ॥ तें अव्यंग कर्मसत्र ॥४१॥
कर्मसत्र स्वयंभूकृत ॥ यास्तव स्वायंभुव त्या नामसंकेत ॥
तैसें नव्हे हें वेदोदित ॥ ब्राम्ही संतत मीमांसा ॥४२॥
स्वयंभूचे स्वायंभुव ॥ ऊर्ध्वरेते कुमार सर्व ॥
ब्रह्मवेत्ते मुनिपुड्‍गव ॥ तत्कृत अपूर्व ब्रह्मसत्र ॥४३॥
समान वक्तोश्रोते जेथ ॥ ब्रह्मनिष्ठ पूर्ण विरक्त ॥
ऊर्ध्वरेते भवनिवृत्त ॥ प्रत्ययवंत अपरोक्ष ॥४४॥
त्यांमाजीं अध्वर्यु करुनि वक्ता ॥ प्राश्चिक यजमान तत्त्वता ॥
प्रशंसिता केवळ होता ॥ अनुमोदिता आग्रीघ्र ॥४५॥
ऐसे करुनि ऋत्विजगण ॥ उर्ध्वरेते मुनि सर्वज्ञ ॥
ब्रह्ममीमांसामय मख पूर्ण ॥ कृतनिर्वपण जनलोकीं ॥४६॥
तया जनलोकनिवासियांचा ॥ ब्रह्ममीमांसामय मख साचा ॥
झाला तो आजी मज तां वाचा ॥ प्रश्न केला देवर्षि ॥४७॥
नारदा तूं जरी म्हणसी ऐसें ॥ तो मख मज कां विदित नसे ॥
तरी तें कथितों सावध परिसें ॥ प्रसंगा सरिसें उपस्थित ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP