मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३६ - ८ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३६ - ८ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३६ - ८ Translation - भाषांतर ॥भट्टोक्ति: ॥अध्यस्य ते खपुष्पत्वमसत्कथमवस्तुनि ॥प्रज्ञातगुणसत्ता कमध्यारोप्येतवानवेति ॥८॥॥ टीका ॥असत् खपुष्प अवस्तु गगनीं ॥भ्रमें नाध्यासी सहसा कोणी ॥व्रास्तव सभ्दाव प्रज्ञात गुणीं ॥अध्यारोपण घडे न घडे ॥९३॥मॄगजळें सासिन्नला मळा ॥वंध्याकुमर तेथींच्या फ़ळा ॥सेवूनि पूर्ण धाला ॥न वचे केला आरोप हा ॥९४॥तस्मात् सभ्दाव प्रपंचासी ॥वास्तव आहे निश्चयेंसी ॥भ्रमें अध्यस्त एकदेशी ॥आरोप ऎसी गोष्टी वदां ॥९५॥ऎसें ऎकोनि वक्ता म्हणे ॥सहसा न मनूं हें बोलणें ॥अंधपरंपरेस्तव भ्रमाचें होणें ॥विकल्प म्हणणें श्रुत्यन्वयें ॥९६॥तो विकल्प आवश्यक ॥व्यवहारीं अर्थकियार्थ देख ॥ऎक तयाचा विवेक ॥स्वस्थ नावेक होवोनियां ॥९७॥संस्कारजन्य म्हणिजे भ्रम ॥तरी संस्कारसिद्धिकारणें नियम ॥पूर्वप्रतीति मात्र परम ॥वस्तु सत्यत्व अनपेक्ष ॥९८॥प्रतीतिमात्र बैसल्या ह्नदयीं ॥तें बीजसंस्कार भ्रमासि पाहीं ॥वस्तुसत्तत्व तिये ठायीं ॥नापेक्षिजे सर्वथा ॥९९॥भ्रमव्यतिरेकाचें अदर्शन ॥यास्तव अनादि चि तो जाण ॥पूर्वापूर्व पुरातन ॥उत्तरोत्तर आरोपें ॥१०००॥अंधपरंपरान्यायेंकरुन ॥भ्रमोप्तत्ति संस्कारजन्य ॥व्यवहारीं अर्थत्र्कियासाधन ॥दिसे संपूर्ण तद्योगें ॥१॥बाळें बागुल देखिलाचि नाहीं ॥कीं तो वास्तव आहे कहीं ॥पूर्वापूर्वप्रवाहें देहीं ॥संस्कार बाणे बाळाच्या ॥२॥तया संस्कारें व्यवहारसिध्दि ॥बिभीषा अध्यस्त होय बुध्दि ॥दुर्गुण आळिकेपण निरोधी ॥सद्गुणवृध्दि होत असे ॥३॥तस्मात तुझे हेत्वंतर ॥अप्रयोजक हा कॄतनिर्धार ॥हें ऎकोनि वदे उत्तर ॥प्रमाणपर प्राश्निक तो ॥४॥तुम्हां वेदांतिया लागून ॥मुख्यत्वें श्रुतिवाक्य प्रमाण ॥तरी ऎका श्रुतीचें वचन ॥द्वैतप्रतिपादनकारक जें ॥५॥चातुर्मास्यया जियाप्रति ॥अक्षय होय सुकृतावाप्ति ॥ऎसी नित्यत्व वदे श्रुति ॥तैं द्वैतापत्ति घडे चि कीं ॥६॥सोमयाजी सोमपानें ॥अमर होऊं म्हणती जेणें ॥ऎसिया श्रुतींच्या प्रमाण वचनें ॥नित्यत्व जाणणें कर्मफ़ळा ॥७॥तस्मात नित्य जें कां होय ॥असद्वस्तु तें कदापि नोहे ॥कर्मकर्ता फ़ळभोगत्रयें ॥नित्य निश्चयें श्रुतिवाक्ये ॥८॥ऎसें वेदप्रतिपादित ॥सत् शाश्वत असतां द्वैत ॥तुम्ही म्हणतां जें अद्वैत ॥तें असंमत अप्रमाण ॥९॥हें ऎकोनियां वेदान्ती ॥श्वास घालूनि विस्मयगति ॥म्हणे भगवंता तव भारती ॥कर्मठाप्रति भ्रामक पैं ॥१०॥वेदलक्षणा भारती तुझी ॥बहुधा वॄत्ति करुनि सहजी ॥कर्मठा श्रद्वावंतांमाजी ॥भ्रमकर होवूनि भुलवीतसे ॥११॥मुख्या लक्षणा रूढि गौणी ॥इत्यादि बहुधा वृत्ति करुनी ॥कर्मठां भारवाहकां लागूनी ॥भ्रमवी भासूनि नित्यत्वें ॥१२॥कर्मठ मूर्ख मंदमति ॥देहात्मजीवात्म प्रतीति ॥इहामुष्मिक नित्य म्हणती ॥वास्तव नेणती श्रुत्यर्थ ॥१३॥कर्मफ़ळांचा नित्य बोध ॥सहसा न प्रतिपादी वेद ॥लक्षणें करुनि प्राशस्त्य विशद ॥विधिवाक्यास्तव प्रशंसी ॥१४॥विधीच्या एकवाक्यास्तव जाण ॥प्राशस्त्य मात्र प्रशंसन ॥अन्यथा वाक्यभेद प्रसंगा भेण ॥कर्मठ अल्पज्ञ प्रबोधी ॥१५॥तो हा येथींचा विवेक ॥कर्मजित हा पैं इहलोक ॥तस्मात् क्षय पावे निष्टंक ॥तैसाच आमुत्रिक पुण्यजित ॥१६॥पुण्य क्षयीं पावे क्षय ॥न्याय संमत हा निश्चय ॥श्रुत्यंतरा विरोध होय ॥परस्परें पूर्वापर ॥१७॥यास्तव कर्मजडाप्रति ॥भ्रामक मात्र पुष्पिता श्रुति ॥जैसे बाळा भेषज देती ॥शर्करामतिप्रलोभें ॥१८॥भेषज दानाचे अभोष्ट ॥निरामयता वास्तव स्पष्ट ॥शर्कराप्रलोभग्रहणाविष्ट ॥हें जाणती श्रेष्ठ सर्वज्ञ ॥१९॥तेंवि अज्ञाना कर्मबोध ॥चित्तशुध्दयर्थ केला विविध ॥चित्तशुध्दिद्वारां शुध्द ॥बोधे विशद परमात्मा ॥२०॥आणि स्वर्गादि फ़ळत्र्कामना ॥ते रोचनार्थ मात्र वल्गना ॥म्हणोनि ब्रह्यपराचि संपूर्णा ॥निगमासि जाणा यथास्थित ॥२१॥ऎसें हें येथील वर्म ॥न कळे भ्रान्ताअ असोनि सुगम ॥जाणती ज्ञानी पूर्ण काम ॥श्रुतिसंभ्रम आघवा ॥२२॥अन्वयव्यतिरेकात्मक श्रुति ॥साद्यंत ब्रह्यचि प्रतिपादिती ॥प्रपंच आहा च सा बोलती ॥मायिक दर्शविती निदानी ॥२३॥तस्मात प्रपंचाचिया सत्यत्वविषयीं ॥साधकवचन श्रुतिसमुदायीं ॥सहसा निश्चयेंसी नाहीं ॥जलप्रवाहीं कॄशानुवत् ॥२४॥आणि असत्त्वीं बहुधा श्रुति ॥सृष्टिप्रळयात्मका असती ॥उत्त्पतिनाशा प्रतिपादिती ॥ब्रह्य निश्चिती अवनाश ॥२५॥ज्यापासूनि भूतां जनन ॥पुन्हा ज्यांमाजी होती लीन ॥ज्यावरी भासती वर्तमान ॥तें अविकार पूर्ण वस्तुत्वें ॥२६॥आणि श्रुतिमूळक अनुमान ॥तेंही यदर्थीं प्रमाण ॥प्रत्यक्ष मिथ्या सविकार जाण ॥निश्चयेंकरुन प्रपंच हा ॥२७॥अनुमान म्हणिजे किंलक्षण ॥तरी पदार्थाचें यथार्थ ज्ञान ॥जेणें होय अनुलक्षण ॥तें ज्ञापक पूर्ण अनुमान ॥२८॥शब्द अनुमान प्रत्यक्ष ॥इत्यादि प्रमाणांचें लक्ष ॥ज्याच्या सत्वीं न पुरे पक्ष ॥तो जाणती दक्ष खपुष्पवत् ॥२९॥हे चि सनंदन भारती ॥बोले श्रुत्यक्त व्युपत्ति ॥तें परिसावें पवित्र श्रोतीं ॥ऎके परीक्षिति शुकमुखें ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP