मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १

वेदस्तुति - श्लोक १

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ परीक्षिदुवाच ॥
ब्रह्मन्‍ ब्रह्मण्यनिर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तय: ॥
कथं चरंति श्रुतय: साक्षात्‍ सदसत: परे ॥१॥


॥टीका॥ ब्रह्मन्‍ ऐसिया संबोधनें ॥ शुकाचार्यातें नृपति म्हणे ॥
अनिर्देश्यीं ब्रह्मीं निर्गुणे ॥ केवि प्रवर्तणें श्रुतींचे ॥१३॥
असत्सत्‍ या उभयां पर ॥ केवळ परब्रह्म निराकार ॥
तेथें साक्षात्‍ सगुण साकार ॥ श्रुति संचार केंवि करिति ॥१४॥
म्हणाल श्रुतींसी आकार नाहीं ॥ तरी मूर्तिमंत विधीच्या गेहीं ॥
श्रुती वर्तती हे सर्वां ही ॥ व्यासोक्ति कायी विदित नसे ॥१५॥
कीं अंतस्थ उष्माण स्पर्श स्वर ॥ र्‍हस्वदीर्घप्लुतादि प्रकार ॥
इत्यादि वर्णी श्रुत्युच्चार ॥ कीं तो साकार न म्हणावा ॥१६॥
तस्मात्‍ श्रुति ज्या सगुणवृत्ति ॥ साक्षात्‍ परब्रह्मीं केंवि चरति ॥
ऐसी शंका धरुनि चित्तीं ॥  करुनि विनती नृप राहे ॥१७॥
इतुका प्रथम श्लोकींचा अर्थ ॥ भाषा उपलविला पदार्थ ॥
श्रीधरस्वामींचें व्याख्यान येथ ॥ विस्तृत शास्त्रपरिभाषा ॥१८॥
भाविकां श्रोतयां अनध्ययनें ॥ वाटे अत्यंत कंटाळवाणें ॥
म्हणती गर्ता जेंवि पाषाणॆं ॥ भरणॆं उभरणॆं ठग ठग पैं ॥१९॥
यालागीं सांडूनियां तो विस्तार ॥ पदसंदर्भ व्याख्यानमात्र ॥
उपलविलिया होती सादर ॥ लहानथोर श्रवणार्थी ॥२०॥
यदर्थीं श्रोते विपश्चित ॥ म्हणती केविदां प्रिय हा ग्रंथ ॥
यालागीं व्याख्यान श्रीधरोक्त ॥ भाषापर्यायें परिसवीं ॥२१॥
हें ऐकोनि संतांप्रति ॥ दयार्णवें केली विनति ॥
केवळ अनधीत मंदमति ॥ केंवि त्या हातीं हें वदवां ॥२२॥
शास्त्रपरिभाषापर्याय ॥ अव्युत्पन्ना विदित काय ॥
तथापि तुमचें असतां अभय ॥ दावाल सोय तेंचि वदों ॥२३॥
ऐसी करुनियां विनवणी ॥ माथा ठेवूनि संतां चरणीं ॥
शास्त्रपरिभाषापर्यायकथनीं ॥ दयार्णववाणी प्रवर्तली ॥२४॥
नृप म्हणे भो योगीश्वर ॥ निर्गुणब्रह्मीं श्रुति साकारा ॥
साक्षात्‍ चरति ऐसी गिरा ॥ एकोन अंतरा स्मय गमला ॥२५॥
जरी श्रुतींचा अर्थ गहन ॥ तरी त्या शब्दांची सांठवन ॥
पात्रावांचूनि थोर लहान ॥ पदार्थ कोण संग्रहिती ॥२६॥
घटमण्ठादि वाजंतरीं ॥ गगन व्यवहारीं आणिजे चतुरीं ॥
व्यजनीं चामरीं पल्लवीं भस्त्री ॥ वायु व्यवहारीं वर्तविजे ॥२७॥
इन्धनाधारें प्रवृत्ति अनळा ॥ धात्वादिमृचर्म पात्रीं जळा ॥
कीं विविध द्रव्याधारें सकळां ॥ घडे परिमळा प्रवृत्ति ॥२८॥
कुडयादि सीमा वरणें पृथ्वी ॥ व्यवहारीं घडे प्रवृत्ति जेंवीं ॥
शब्दांमाजी श्रुत्यर्थ तेंवी ॥ सांठवलासे अगोचर ही ॥२९॥
तया शब्दांची त्रिधा प्रवृत्ति ॥मुख्या लक्षणा गौणी म्हणती ॥
त्यांमाजी मुख्येची ही गती ॥ रुढि आणि योगभेदीं ॥३०॥
यांची प्रवृत्ति कोणे ठायीं ॥ सावध परिसा कथितों तेही ॥
निर्देशाहीं पदार्थी पाहीं ॥ संज्ञा संज्ञि सकेतें ॥३१॥
नाम आणि नामधारक ॥ संज्ञा संज्ञी ते सम्यक्क्‍ ॥
निर्देशार्ह असतां देख ॥ प्रवृत्ति शाब्दिक तेथ घडे ॥३२॥
निर्देश म्हणिजे निवडपणें ॥ घडे जिथे वस्तूकरणें ॥
तेथ शब्दांचीं प्रवर्तनें ॥ त्रिविधा भिन्नें जियें कथिलीं ॥३३॥
वनीं चरतां धेनूशतक ॥ त्यांमाजी निवडूनि पुसतां एक ॥
तेथें रुढि प्रवृत्ति देख ॥ त्रिविधात्मक निर्देशी ॥३४॥
स्वरुप जाति आणि गुणें ॥ त्रिविध बोधें गौ निवडणें ॥
पुष्ट धेनु कपिला म्हणणें ॥ त्रिधा भिन्नें वाक्यार्थे ॥३५॥
सर्वसाधारणांमाजी पुष्ट ॥ म्हणतां स्वरुपचि निर्दिष्टा ॥
अविकें अजा यथेष्ट ॥ तैं जाति निर्दिष्ट गोशब्दें ॥३६॥
पाटला बहुला रक्ता शुका ॥ तैं गुणनिर्दिष्टा म्हणिजे कपिला ॥
रुढि भेदाचा विस्तार केला ॥ त्रिधा मोकळा कळला कीं ॥३७॥
अनिर्देश्य ब्रह्म निर्गुण ॥ तेथें कैंचे आत्यादि गुण ॥
तस्मात्‍ रुढि प्रवृत्ति प्रवर्तन ॥ तेथ कोठुन घडूं शके ॥३८॥
और्ण कौशेय कार्पास ॥ जातिभेद हे अंबरास ॥
स्थूलसूक्ष्मादि बहुवस ॥ स्वरुपविशेष निर्दिष्ट ॥३९॥
श्वेतरक्त चित्राम्बरें ॥ गुणनिर्दिष्टें ऐसीं वस्त्रें ॥
चिदंबरी या प्रकारें ॥ केंवि शब्दें संचरिजे ॥४०॥
रुढि मुख्या निराकरिली ॥ आतां लक्षणा जे बोलिली ॥
तेही निरुपिजेल भली ॥ सावध परिसिली पाहिजे ॥४१॥
निर्देशाहीं वस्तुमात्रीं ॥ लक्षणाशब्दप्रवृत्ति वक्त्रीं ॥
उदाहरणीं कथितां श्रोत्रीं ॥ रुचे आणि उमजे ही ॥४२॥
गंगेवरी गौळवाडा ॥ म्हणतां अभिनव वाटॆ मूढां ॥
तेथ लक्षणा शब्दवृत्ति सुघडा ॥ करी निवाडा शब्दार्था ॥४३॥
गंगा सांडूनि घेइजे तट ॥ ऐसी जहल्लक्षना करितां नीट ॥
तैसें ब्रह्म नित्य निघोंट ॥ काशा निकट लक्षावें ॥४४॥
दुरुनि पथिका दाविती वाट ॥  वटावरुनि जाइजे नीट ॥
तेथ वट सांडूनि लक्षिजे स्पष्ट ॥ पंथ चोखट वामसव्यें ॥४५॥
तेंवि ब्रह्मीं लक्षणा प्रवृत्ति ॥ घडे केंवि कोणे रीति ॥
तैसी गौणीचीही व्याप्ती ॥ न घडे निश्चिती निर्गुणीं ॥४६॥
पुरुषव्याघ्र या संबोधनें ॥ कवि शंसिती नृपाकारणें ॥
तेथ कौर्यचापल्यादि गुणें ॥ प्रवृत्ति जाणणें शब्दाची ॥४७॥
तैसी येथ अदूय ब्रह्मीं ॥ कोठील गुणां  कोण उपमीं ॥
यालागीं प्रवृत्ति गौणानामी ॥ न घडे व्योमीं पल्लवत्‍ ॥४८॥
ब्रह्म केवळ अनिर्देश्य ॥ तेथ योगवृत्तीशीं अवकाश ॥
न घडे कैसा तो विशेष ॥ चतुरीं चित्तास आणावा ॥४९॥
पंकयोगें पंकज कमळ ॥ कीं गंगायोगें गाड्‍गकुळ ॥
पुण्ययोगें पुण्यशीळ ॥ कीं दु:शीळ दुष्कृतें ॥५०॥
दशरथयोगें दाशरथि ॥ जनकयोगें जानकी म्हणती ॥
अब्जसादृश्य कराब्जाप्रति ॥ योगवृत्ति गौणी पैं ॥५१॥
गाड्‍गी मठ म्हणतिये वेळे ॥ लक्षणायोगवृत्तीच्या बळें ॥
गंगातटी लक्षितां विवळे ॥ कीं म्हणिजे जळें  पावित पैं ॥५२॥
जलद नामें  रुढ कमळ ॥ तैसेंचि जळज पै जंबाळा ॥
जलजाक्ष रुढिस्तव केवळ ॥ अक्षि जंबाळ सम न घडे ॥५३॥
क्रियानिर्दिष्ट योगवृत्ति ॥ पचनक्रियेची ज्या प्रवृत्ति ॥
पाचक ऐसें त्यातें म्हणती ॥ लेखका न म्हणती पाचक पैं ॥५४॥
तस्मात निर्दिष्टे वस्तुमात्रीं ॥ इत्यादि शब्दप्रवृत्ति शास्त्रीं ॥
शोभती वक्त्यांच्या वक्रीं ॥ श्रुतिस्मृति मात्रीं सर्वत्र ॥५५॥
ब्रह्म अनिर्देश्य केवळ ॥ तेथ शब्दप्रवृत्ति होय विफळ ॥
निर्गुणीं गौणवृत्तीचा मळ ॥ न लगे केवळ नभ: साग्यें ॥५६॥
कार्यकारणांहूनि पर ॥ त्यातें म्हणिजे सदसत्पर ॥
संबंध नसतां लक्षणाकार ॥ ब्रह्मीं संचार केंवि परी ॥५७॥
एवं वस्तू पदार्थ नव्हें ॥ अपदार्थेसी वाक्यगौरवें ॥
श्रुतिगोचरत्व केंवि घडावें ॥ हें निवडावें सर्वज्ञीं ॥५८॥
ऐसी शंका विवरुनि चित्तीं ॥ नृपें शुकासी केली विनती ॥
तो सर्वज्ञ करील शंकानिवृत्ती ॥ तेंचि श्रोतीं परिसावें ॥५९॥


N/A

References : N/A
Last Updated : December 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP