मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४ व ५

वेदस्तुति - श्लोक ४ व ५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


अत्र ते वर्णयिष्यामि गाथां नारायणान्विताम्‍ ॥
नारदस्य च संवादमृषेर्नारायणस्य च ॥४॥
॥टीका॥ नारदनारायणासंवाद ॥

नारायणाश्रमीं विशद ॥
हे नारायणान्वित गाथा शुध्द ॥ऐकें सावध कथितों ते ॥१९॥

एकदा नारदो लोकान्पर्यटन्भगवत्प्रिय: ॥
सनातनमृषिं द्रष्टुं ययौ नारायनाश्रमम्‍ ॥५॥


॥ टीका॥ कोणे एके अपूर्व समयीं ॥ नारद फिरतां लोकीं तिहीं ॥
नारायणाश्रमीं पाहीं ॥ येता झाला स्वच्छंदें ॥२०॥
केवळ भगवत्प्रिय नारद ॥ हरिगुणकथनीं परमानंद ॥
गगनगामी आस्मविद ॥ आला स्वच्छंद तपोधन ॥२१॥
नारायणातें देखावया ॥ हृदयीं प्रेमा धरुनियां ॥
नारायणाश्रमालया ॥ आला मुनिवर्या माजिवडा ॥२२॥
गगनासारिखें ज्याचें मन ॥ ज्याचें अमृतोपम भाषण ॥
परोपकारार्थ कर्माचरण ॥ तो सनातन ऋषिवर्य ॥२३॥
त्यातें देखावया कारणें ॥ नारदाचें झालें येणे ॥
जया ऋषीनें निजात्मगुणॆं ॥ त्रिजग कल्याणें भरियेलें ॥२४॥
ऐक तया ऋषीचे गुण ॥ कथितों संक्षेपें तुजलागून ॥
जेणें जिंकून कायवाड्‍मन ॥ केलें कल्याण त्रिजगासी ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP