अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, मघा, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, मूळ, शततारका आणि रेवती ही नक्षत्रे शुभ तिथीच्या ठायी व शुभवारी असता वृक्ष व लता यांची लावणी प्रशस्त होय. आश्लेषा नक्षत्र, सोमवार व लग्नी बलिष्ठ चंद्र असा योग असता, ऊस, केळी आणि पोफळी इत्यादिकांची लावणी करावी. लग्नी रवि असता अश्विनी नक्षत्रावर नारळाचे वृक्ष भूमीत लावावेत. चंद्र स्वांशस्थ व लग्नी गुरु असता नागवेलीची लावणी करावी.