अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, मघा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, मूळ, श्रवण, धनिष्ठा, शततारका, हस्त, ज्येष्ठा, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे; द्वितीया; तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, त्रयोदशी या तिथी; व बुध, गुरु, शुक्र आणि सोम हे वार जलोत्सर्गास शुभ आहेत. ज्या उदकाचा उत्सर्गसंस्कार झाला नसेल ते उदक घेऊ नये. विहिरी, कूप, तलाव इत्यादिकांच्या उदकांचा संस्कार केला नसेल तर ते उदक संस्कारहीन असल्यामुळे त्याला स्पर्शही करू नये; मग प्राशनाची गोष्टच नको. असे जल प्राशन केल्यास चांद्रायण प्रायश्चित्त करावे. उत्सर्गाचा प्रयोग दुसर्या ग्रंथात पहावा.