ज्येष्ठ पत्नी अग्नीच्या समीप असता कनिष्ठ पत्नीसहवर्तमान यजमानाने प्रवास केला असता दोष नाही. दोघेही दंपती ग्राम अथवा गृह यांच्या सीमेबाहेर जाऊन होमकालाच्या पूर्वी परत येतील तर दोष नाही. यजमान अग्नीच्या समीप असताही होमकाली पत्नी ग्रामांतरी असता पुनराधान करावे असे सांगितले आहे. प्रवासामध्ये दंपतीपैकी कोणी समारूढ अग्नीला स्पर्श न करील तर नदी व सीमा यांचे उल्लंघन केले असता पुनराधान करावे. यजमान अग्नीला सोडून शंभर योजनांपलीकडे जाईल अथवा एक वर्षपर्यंत स्वतः होम न करील तर अग्निनाश होतो. त्याकरिता पुनराधान अथवा पवित्रेष्टि करावी. जर समुद्राला मिळणार्या नदीचे उल्लंघन पत्नी अग्निविरहित करिल त्र अग्निनाश होतो अशी श्रुति आहे. अग्नीच्या समीप पति अथवा दुसरी पत्नी असेल तर एका पत्नीने अग्निविरहित नदीचे उल्ल्म्घन केल्याचा दोष नाही. पति प्रवासात असता पत्नीने अप्रीसह सीमोल्लंघन केले असता अग्निनाश होतो. याप्रमाणे पत्नी प्रवासात पतीने उल्लंघन केले असता अग्निनाश होतो. उदकामुळे अग्नि विझला असेल तर पुनराघे करावे. अग्नि नष्ट झाला असता अग्नीचे आधान केल्याखेरीज यजमान सीमा उल्लंघन करून जाईल तर हेच पुनराधेय समजावे. समारोप केल्यावाचून छत्तीस अंगुळांच्या (शम्यापरास) पलीकडे अग्नि नेला असता अग्नीचा नाश होतो. पत्नीचा रजोदोष, जननाशौच अथवा मृताशौच ही असता पति जर प्रवास कर्ल तर पुनराधान केले पाहिजे. अनेक पत्नीपैकी एक जरी रजस्वला असली तरी पतीने प्रवास करू नये. निमित्त झाल्यापासून चवथ्या व अकराव्या दिवशी प्रवास करावा. अग्नीचा होमकाल व पर्वदिवस यांचे ठिकाणी प्रवास करू नये. दोन होम अतिक्रांत होतील अथवा दर्शपूर्णमास अतिक्रांत होईल तर पुनराधेय करावे असे जे सांगितले आहे ते आपस्तंबादिकांविहयी आहे. 'सूतक (जननाशौच) अथवा मृतक (मृताशौच) ही असता पंचनाग्नीवर पाक करावा, पाक केल्यावाचून रात्र जाईल तर पुनराधान करावे, असे जे वचन आहे ते कात्यानादिकांविषयी आहे. पत्नी प्रवासस्थ असता पुनराधान करावे असे जे सांगितले ते ज्याला एकच पत्नी आहे त्याच्या विषयी होय; ज्याला अनेक पत्नी असतील त्याने ज्येष्ठ पत्नी प्रवासस्थ असेल तरच पुनराधान करावे असे कित्येक ग्रंथकार म्हणतात. ही निमित्ते पूर्वीचे अग्नि टाकून दुसर्या अग्नीचे आधान करावे. साक्षात उपकार करणार्या अंगभूत कर्माचा लोप झाला असता कर्मसमाप्तीच्या पूर्वी प्रायश्चित्त करून ते अंगभूत कर्म करावे. कर्माची समाप्ति झाल्यावर प्रायश्चित्तच करावे, अंगभूत कर्माची आवृत्ति करण्यास नको. परंपराभूत द्रव्यसंस्काररूप अंगभूत कर्माचा लोप झाला असता प्रधान कर्माच्या पूर्वी ते अंगभूत कर्म करावे. प्रधान कर्मानंतर प्रायश्चित्तच करावे, अंगभूत कर्माची आवृत्ति करू नये.