भोजन झाल्यावर उच्छिष्ट शेष अन्न घेऊन
"रौरवे पूयनिलये पद्मांर्बुद निवासिता । प्राणिनां सर्व भूतानामक्षय्यमुपतिष्ठतु ॥"
असे म्हणून द्यावे. "हातपाय धुवून आचमन केले असेल तरी जोपर्यंत भोजनपात्र काढले नाही तोपर्यंत तो अशुचि असतो;" आणि पात्र काढले तरी जोपर्यंत भूमी सारविली नाही तोपर्यंत तो अशुचि आहे. नागवेलीच्या पानाचे अग्र, मूळ व विशेषतः शिरा काढून चुन्याचे पान वर्ज्य करून शहाण्या पुरुषाने तांबूल भक्षण करावा. मुखात पान घातल्याशिवाय सुपारी खाऊ नये. आधी पान व नंतर सुपारी अशा रीतीने तांबूल भक्षण करावा. याप्रमाणे पाचव्या भागाचे कृत्य सांगितले.