मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४|
अग्निनाशाची निमित्ते

धर्मसिंधु - अग्निनाशाची निमित्ते

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


दंपतीपैकी एकाने सूर्योदय व सूर्यास्त या काली अग्नीच्या समीप वास करावा. दोघां दंपतींनी गृहाची अथवा ग्रामाची सीमा उल्लंघून अथवा नदी उल्लंघून होमकाली बाहेर वास केला तर पुनराधान करावे. कुंडातील सर्व अग्नि बाहेर घेऊन जाताना कुंडापासून छत्तीस अंगुळांच्या आत (शम्यापरास) उच्छ्वास झाल्यास अग्नीचा नाश होतो. काही कर्मासाठी अग्नि नेत असता उच्छ्वासादिकांचा दोष नाही. स्वतः अग्निसमारोप केला असता उदकात बुडी मारणे, मैथुन शूद्रादिकांचा स्पर्श, ही झाली असता अग्निनाश होतो. अनेक पत्‍नी असता त्यापैकी एखादी जरी होमकाली गृहाच्या सीमेच्या बाहेर गेली असेल तरी अग्निनाश होतो.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP