सायंहोम व प्रातर्होम हे दोन्ही आपत्तीमुळे सायंकालीच करणे याचे नाव समस्यहोम.
"सायं प्रातर्होम समस्य करिष्ये"
असा संकल्प करून पूर्वी सांगितल्याप्रमाणे सायंकाल होमाचे सर्व कर्म करून पर्युक्षण करून पुन्हा द्रव्याचा संस्कार करावा. नंतर समिध अग्निमध्ये देऊन सूर्य व प्रजापति यांच्या उद्देशाने आहुति दिल्यावर
"हविष्यांत०"
या मंत्राने उपस्थान करावे. ते असे
"हविष्यान्तमिति पंचर्चस्य वामदेवः सूर्य वैश्वानरौ त्रिष्टुप०"
इत्यादि प्रजापतींचे उपस्थान नित्याप्रमाणे करावे.