देवांचें तर्पण सव्यानें, देवतीर्थानें (अंगुलीच्या अग्रांनीं) व दर्भाच्या अग्रांनीं करावें. अक्षतायुक्त उदकानें देवर्पीचें तर्पण करावें. तिलयुक्त उदकानें आचार्य व पितर यांचें तर्पण करावें. देवांचें तर्पण असें-----"प्रजापतिस्तृप्यन्तु १ ब्रह्मा० तृप्य० २ वेदास्तृप्यन्तु ३ देवास्तृप्यन्तु ४ ऋषयस्तृप्यन्तु ५ सर्वाणि छन्दांसि तृप्यन्तु ६ ॐकारस्तृप्य० ७ वषट्कारस्तृप्य०८ व्याहृतयस्तृप्यं ९ सावित्री तृप्य० १० यज्ञास्तृप्यं० ११ द्यावापृथिवी तृप्यतां १२ अंतरिक्षं तृप्यं० १३ अहोरात्राणि तृप्यन्तु १४ सांख्यास्तृप्यं० १५ सिद्धास्तृप्यं० १६ समुद्रास्तृप्यं० १७ नद्यस्तृप्यं० १८ गिरयस्तृप्यं १९ क्षेत्रौषधिवनस्पतिगंधर्वाप्सरसस्तृप्यं० २० नागास्तृप्यं० २१ वयांसि तृप्यं० २२ गावस्तृप्यं० २३ साध्यास्तृप्यं२४ विप्रास्तृप्यं० २५ यक्षास्तृप्यं० २६ रक्षांसि तृप्यं० २७ भूतानि तृप्यं० २८ एवमन्तानि तृप्यन्तु २९. "ऋषींचें तर्पण निवीती (गळ्यामध्यें सरळ यज्ञोपवीत) करुन कनिष्ठिकेच्या मूलानें दर्भांच्या मध्यभागांनीं करावें. तें असें--"शतर्चिनस्तृप्यं० माध्यमास्तृप्यं० गृत्समदस्तृप्यं० विश्वामित्रस्तृप्यं० वामदेवस्तृप्य० अत्रिस्तृप्य० भरद्वाजस्तृप्य० वसिष्ठस्तृप्य० प्रगाथास्तृप्यं० पावमान्यस्तृप्यं० क्षुद्रसूक्तास्तृप्यं० महासूक्तास्तृप्यं० १२" एकवचन, द्विवचन अथवा बहुवचन जसें असेल त्याप्रमाणें तृप्यतु, तृप्यतां, तृप्यन्तु इत्यादि उच्चार करावा. नंतर प्राचीनावीती करुन पितृतीर्थानें द्विगुणित केलेल्या दर्भाच्या मूलाग्रांनीं पितृतर्पण करावें. तें असें----सुमन्तु जैमिनी वैशंपायन पैलसूत्र भाष्य भारत महाभारत धर्माचार्यास्तृप्यन्तु १ जानन्तिबाहविगार्ग्य गौतमशाकल्य बाभ्रव्यमाण्डव्यमाण्डूकेयास्तृप्यन्तु २ गर्गी वाचक्रवी तृप्य० ३ वडवा प्रातीथेयी तृप्य० ४ सुलभामैत्रेयी तृप्य० ५ कहोळं तर्पयामि ६ कौषीतकं त० ७ महाकौषीतकं त० ८ पैङ्ग्यं त० ९ महा पैङ्ग्यं० १० सुयज्ञं तर्प० ११ सांख्यायनं त० १२ ऐतरेयं त० १३ महैतरेयं त० १४ शाकलं त० १५ बाष्कलं०१६ सुजातवक्त्रं त० १७ औदवाहिं त० १८ महौदवाहिं त० १९ सौजामिं त० २० शौनकं त० २१ आश्वलायनं त० २२ ये चान्ये आचार्यास्ते सर्वे तृप्यंन्तु २३" नंतर मृतपितृक असेल त्यानें पितृत्रयी, मातृत्रयी, सपत्नीक मातामहत्रयी० पत्नी इत्यादि एकोद्दिष्ट गण इत्यादि महालय प्रकरणांमध्यें सांगितलेल्या सर्व मृतांच्या उद्देशानें तर्पण करावें. तर्पण करितांना संबंधाचा उच्चार प्रथम करुन नंतर नाम व गोत्र यांचा उच्चार करावा; आणि त्यानंतर रुप (वस्वादिरुप, वसुरुद्रादित्यस्वरुप, वसुरुप) इत्यादिकांचा उच्चार करावा. देवांना एकेक अंजलि, ऋषींना दोन दोन आणि पितरांना तीन तीन याप्रमाणें संख्याविशेष आश्वलायनांना वैकल्पिक आहे. कारण त्यांच्या सूत्राम्ध्यें संख्या सांगितली नाहीं. ज्यांच्या सूत्रामध्यें संख्या सांगितली आहे त्यांना नित्य आहे असें माधवाचें मत आहे. मातृत्रयीखेरीजकरुन इतर स्त्रियांना एक अंजलि द्यावा. इतकें विस्तारानें तर्पण करण्यास असमर्थ असेल त्यानें "आब्रह्मस्तंबपर्यन्तं देवर्षिपितृमानवाः । तृप्यन्तु पितरः सर्वे मातृमातामहादयः ॥ अतीतकुलकोटीनां सप्तद्वीप निवासिनाम् । आब्रह्मभुवनाल्लोकादिदमस्तु तिलोदकम् ॥" याप्रमाणें तीन तीन वेळ उदक द्यावें. नंतर "ये के चास्मत्कुले जाता अपुत्रा गोत्रिणो मृताः । ते गृह्नन्तु मया दत्तं वस्त्रनिष्पीडनोदकम् ॥" याप्रमाणें परिधान केलेलें वस्त्र भूमीवर पिळून उदक द्यावें. याविषयीं आश्वलायनांनीं प्राचीनावीती करावी, इतरांनीं निवीती करावी. हें निप्पीडनोदक घरामध्यें निषिद्ध आहे. ब्रह्मयज्ञ गांवाच्या बाहेर उदकासन्निध करावा. गांवांत करणें असल्यास मनांत उच्चार करुन करावा. डावा हात लावलेल्या उजव्या हातानें अथवा अंजलीनें तर्पण करावें. तर्पण दर्भानें आच्छादिलेल्या स्थलीं करावें, उदकांत करुं नये; अथवा अंजलीणें तर्पण करावें. तर्पण दर्भानें आच्छादिलेल्या स्थलीं करावें, उदकांत करुं नये; अथवा एका पात्रामधून उदक घेऊन तें दुसर्या शुद्ध पात्रांत सोडावें. उदकानें भरलेल्या जमिनीच्या खाचेंत सोडावें, पण दर्भविरहित भूमीवर सोडूं नये. सुवर्ण, रौप्य, ताम्र, कांसें यांच्या पत्रांत सोडावें, मृत्तिकेच्या पात्रांत सोडूं नये. जर भूमि अशुद्ध असेल तर नदीच्या उदकामध्यें तर्पण करावें. अनामिकेमध्यें सुवर्ण, तर्जनीमध्यें रौप्य आणि कनिष्ठिकेमध्यें खडग हीं धारण केल्यानें मनुष्य शुचिर्भूत असतो. अंगुलीचें अग्र तें देवतीर्थ, अनामिका व कनिष्ठिका यांचें मूल तें कायतीर्थ (प्रजापतितीर्थ) अंगुष्ठ व तर्जनी यांचा मध्य तें पितृतीर्थ आणि अंगुष्ठाचें मूल तें ब्राह्म तीर्थ. बाहेर काढलेल्या उदकानें पितृतर्पण करणें असेल तर उदकामध्यें तिळांचें मिश्रण करावें. बाहेर उदक काढलेलें नसेल तर डाव्या हातामध्यें तीळ घ्यावे. तिलतर्पण गृहामध्यें निषिद्ध आहे. रविवार, शुक्रवार, सप्तमी, नन्दातिथि, कृत्तिका, मघा, भरणी, मन्वादि, युगादि यांचे ठिकाणीं पिंडदान, मृत्तिकास्नान व तिलतर्पण हीं करुं नयेत. पितरांच्या श्राद्धदिवशीं नित्यतर्पणाविषयीं तिल निषिद्ध आहेत. पर्वदिवशीं व निषिद्ध तिथि, वार यांचे ठिकाणींही तिलतर्पण करावें. विकिर, पिंडदान, तर्पण व स्नानकर्म हीं केल्यानंतर आचमन करुन ज्ञात्या माणसानें दर्भांचा त्याग करावा. दर्भांचा त्याग करण्याचा मंत्र---"येषां पिता न न भ्राता न पुत्रो नान्य गोत्रिणः । ते सर्वे तृप्तिमायान्तु मयोत्सृष्टैः कुशैस्तथा ॥"