Dictionaries | References

वाहणे

   
Script: Devanagari

वाहणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  प्रवाहाबरोबर एखादी गोष्ट जाणे   Ex. माझ्या चपला नदीत वाहून गेल्या.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benবয়ে যাওয়া
kanಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು ಹೋಗು
mniꯇꯥꯎꯊꯕ
urdبہنا , چلےجانا , ساتھ ساتھ چلےجانا
 verb  श्रद्धेने देव, समाधी इत्यादीकांवर फूले इत्यादी अर्पण करणे   Ex. त्याने शंकरावर पाणी, अक्षता आणि फूले वाहिली.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmঅর্পণ ্কৰা
kasپیٚش کرُن
malഗൂഡാലോചന നടത്തുക
urdنذر کرنا , نذرانہٴ عقیدت پیش کرنا , بھینٹ چڑھانا , چڑھانا , پیش کرنا , خراج عقیدت پیش کرنا
 verb  वार्‍याचे गतिमान होणे   Ex. ह्या महिन्यात पाऊस आणणारा वारा वाहतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  गतिमान होणे   Ex. कोरड्या मातीपेक्षा पाणी असलेल्या जमिनीतून वीज लवकर वाहते.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे   Ex. व्रणातून पू वाहत होता.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  विपत्ती, कष्ट इत्यादीत गुजराण करणे   Ex. आयुष्याचा भार आता वाहिला जात नाही.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

वाहणे

 उ.क्रि.  
   उचलून नेणे ; एका जागेवरुन उचलून दुसर्‍या नेऊन ठेवणे . वाहतिये वेळे जडशिदोरी जैसी । - ज्ञा १८ . १५८ . - एभा ३ . ८७ . शीतलजल कलश शीघ्र वाहोन । - मोभीष्म १२ . ४ .
   भार सहन करणे , सोसणे ; आधार देणे ; आश्रय देणे . गेल्या पळोनि गायी पृष्ठावरि पुच्छभार वाहोनी । - मोविराट ४ . ८८ .
   मनांत बाळगणे ; धरणे . परी ते चाड एकी जरी वाहे । - ज्ञा ४ . १९५ . वाहतसे हृदयाब्जी अत्युत्सुक मी - मोमंभा २ . ३२ . मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । - राम १७ .
   चालू ठेवणे ; पुढे चालविणे ( व्यवहार , धंदा वगैरे ),
   अर्पण करणे ; पूजेमध्ये देणे ; पुढे ठेवणे . उडवी किरीट विधिने जे निर्मुनि यासी वाहिले होते । - मोकर्ण ४७ . ७६ . वाहूनि मस्तकचरणी । - मोअनु ४ . ५५ . ( शपथ ) घेणे .
   देऊन टाकणे ; स्वत्वनिवृत्ति करणे ; टाकून देणे ; सोडून देणे ; त्याग करणे .
   काढून देणे ; पुढे करणे ; स्वतःजवळचे देणे . जामीन रहा आणि गाठेचे वाहा .
   चढविणे ; बसविणे ; सज्ज करणे ( धनुष्यास गुण वगैरे ). कैकेयांची चापे खंडूनी ... अन्य धनुष्ये वाहुनी ते । - मोकर्ण ९ . ८ . जो या धनुष्या वाहील गुण । - रावि ७ . ५४ .
   ( जमीन ) कसणे ; लागवडीस आणणे ; पेरणे ; मशागत करणे . काय जाहाले न वाहता भुई पेरिजे । - ज्ञा ११ . १६२ .
   धारण करणे ; नेसणे ; वापरणे . वाहे वल्कल जटा । - मोरामायणे २३ . हे विपरीताक्षिति असतीसी नवनवा गुणा वाहे । मोमंभा १ . ७३ .
   चालविणे ; उपयोग करणे . जेती घाणे वाहती । - पाटण शिलालेख .
   हल्ला करणे ; चाल करणे . मग तेणे विक्रमसेनु प्रौढवर्धनावरि सबळु वाहौनु आला । - पंच १ . ३२ . चिंता वाहणे - काळजी वाहणे ; अस्वस्थता बाळगणे . वाहणे - अक्रि .
   वारा , पाणी हलणे ; एका जागेवरुन दुसर्‍या जागी जाणे ; सरकणे ; पुढे जाणे ; गतिमान असणे . ( सैन्य , पशूंची , गाड्यांची रांग वगैरे ). वाहे हिममंद सुगंध पवन . - मोभीष्म ११ . ८७ .
   ( नाक , व्रण , गळते भांडे यांतून ) पाणी , पू वगैरे बाहेर येणे ; स्त्रवणे ; पाझरणे ; गळणे ; ठिबकणे .
   एका दिशेने जाणे ; लांबवर पसरणे ; रांगेने असणे ( ररुता , किनारा , डोंगराची रांग ). परमार्गु वाहाती सदैवे । जेआंलागी । ऋ १०० .
   चालू असणे ; गतिमान असणे ; कार्य करीत राहणे ( यंत्र , हत्यार ; साधन ).
   तीक्ष्ण असणे ; उपयोग होण्याच्या स्थितीत असणे ; धार असणे ( शस्त्र , हत्यार वगैरे ).
   प्राप्त होणे ; चालू असणे . रुपयाचे दीड शेर पाणी अशी कठिण वेळा वाहली . - ऐपो २२५ . [ सं . वह ] वाहता झरा - री - पुस्त्री . जिवंत झरा ; ज्यांतून नेहमी पाणी वाहत असते असा झरा , प्रवाह .
   चालू प्रवाह , वर्षाव ( देणगी , खर्च वगैरेचा ); चांलू पुरवठा ; रेलचेल ; चंगाळी . वाहतवणा - पु . रानांतून चालणारा ; प्रवासी . आणि जन्मशतांचा वाहतवणा । - ज्ञा ७ . १२९ . वाहत वाटोळे - न .
   जुजबी किंवा तात्पुरती व्यवस्था , दुरुस्ती , उपाययोजना ; मिटावामिटव ( वाद , भांडण ; रोग यासंबंधी कामचलाऊ योजना ).
   आरंभ ; सुरुवात ; चालू होण्याची क्रिया ( काम , धंदा वगैरेची ).
   सत्यानाश ; पूर्ण नाश ; फन्ना ; वाटोळे ( धंदा , कार्य , व्यवहार , सल्ला वगैरेचा ). वाहता - वि .
   मोकळेपणाने वावरणारे , हलणारे , फिरणारे , वागणारे ; तीक्ष्ण धारेचे ; कुशाग्र ( शस्त्र , बुद्धि वगैरे ). उदा० वाहती कुर्‍हाड .
   चालू ; कार्य करीत असलेले ; चालते ; सुरु ( काम , धंदा , व्यवहार , कारखाना वगैरे ). वाहता घाणा - पु . चालू असलेला , उपयोगांत असलेला तेलाचा घाणा . वाहता झरा , वाहती झरी - वाहतझरा पहा . वाहता रस्ता - पु . रहदारीचा रस्ता . वाहती - स्त्री .
   प्रारंभ ; सुरुवात .
   चाल ; वहिवाट ; शिरस्ता ; प्रघात . वाहतीकूस - स्त्री . गर्भधारणा करण्यास योग्य अशी स्त्रीची अवस्था ; मुले व्हावयास योग्य अवस्था . एकदां वाहतीकूस झाली म्हणजे वाटेल तितकी मुले होतील . पावसाची वाहतीकूस झाली . = पावसाळा सुरु झाला . वाहत्यागंगा - स्त्री . अनुकूल परिस्थिति ; चालू काम ; भरभराटलेला धंदा ; सुकाळ ; चंगळ ; संपन्नता . ( क्रि० चालणे ; होणे ). वाहत्यागंगेत हात धुवून घेणे - अनुकूल काल असेल तो आपले कार्य साधून घेणे . वाहती धार -
   तीक्ष्ण पाजळलेली धार ( हत्याराची ); याच्याउलट पडती धार .
   वाहत असलेला , चालू असलेला पाण्याचा प्रवाह ( नदी , ओढा वगैरेचा ); पाणी , रस वगैरेचा पडता प्रवाह , झोत .
   ( ल . ) धंद्याची , कामाची चलती , भरभराट , घाई , धुमश्चक्री . उदा० लढाईची - धर्माची - वादाची - वाहती धार . वाहती वाट - स्त्री .
   रहदारीचा रस्ता ; मोकळा , बंदकेलेला रस्ता ; चालू रस्ता .
   मुले होत असलेला स्त्रीचा गर्भाशय , कूस .
   ( ल . ) सुरुवात ; आरंभ ; ओनामा ( धंदा , व्यवहार इत्यादीचा ). वाहतुक , वाहतूक - स्त्री . रहदारी ; येजा ; वापर ; नेआण . - पु . वाहणारा ; लाकडाअची नेआण करणारा . - नस्त्री . वाहतुकीची मजुरी . वाहतुरा - वि . वाहती ; तीक्ष्ण ( शस्त्राची धार ). वाहते - वि . चालू ; तीक्ष्ण ; धारचे ; उपयोगांत असलेले ( शस्त्र वगैरे ). वाहते नांव - न . चालू , व्यावहारिक नांव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP