Dictionaries | References

भुई

   
Script: Devanagari
See also:  भुईं

भुई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

भुई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The terraqueous globe. The ground. Stature.
भुईत जाणें   Said of animals and plants which are dwarfed or stunted.
सापसाप म्हणूण भुई बंडवू नये   Do not cast false charges.

भुई     

ना.  भू , भूतल , भूमी ;
ना.  काळी आई , काळी माती , जमीन .

भुई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जमीन

भुई     

 स्त्री. 
जलस्थलमय गोल ; भूगोल .
भूमि .
जमीन या शब्दांखालीं दिलेल्या सर्व अर्थांत व वाक्यप्रचारांत जमिनीच्या ऐवजीं भुई शब्दहि योजतात .
शरीराची उंची ; चण ; बांधा ; ठेवण . त्या माणसाची भुई ठेंगणी आहे . [ सं भूमि ; सिं . भुई ] म्ह० पळत्या पायाला भुई थोडी . ( वाप्र . )
०उकरणें   क्रि . भुई ओर खडणें ; निष्कारण पायाचीं बोटें भुईवर ओढीत राहणें ( दोषी , गुन्हा शाबीत झालेल्या किवा लाजलेल्या इसमासंबंधानें म्हणतात ). भुईचा लहान वि . खुजट ; ठेंगू ; लहान चणीचा . भुईचा सावरणें क्रि . ( ल . ) भयंकर दुखण्यांतून बरें होणें ; पुनः आपल्या पायांवर उभें राहणें . भुईच्या तुकड्यावर राहणें कोठें तरी राहणें . भुईंत जाणें क्रि . खुजट , खुरटें होणें ( प्राणी , वनस्पति ). भुई फोडून जाणें क्रि . ( लज्जेनें ) भुईंत गडप होण्यास , तोंड लपविण्यास तयार होणें , असणें .
०बडविणें   क्रि . ( ल ) तुफान घेणें ; खोटा ठपका , आरोप करणें . साप साप म्हणून भूई बडवूं नये . भुई बोम देऊन उठणें एखाद्याच्या पापाविरुद्ध लोकांनीं मोठ्यानें ओरडणें ; पाप प्रसिद्ध होणें , करणें , सामाशब्द -
०आवळी  स्त्री. एक झाड . हिची पानें लाजाळू सारखीं बारीक ; उंची वीत दोन विती असते . फळें हिरवीं व नाचणीएवढीं ; रुचि आंबट व कडवट असते .
०कंद   कांदा - पु . एक वनस्पति , कंद .
०काला  पु. जमीन सारवण्यासाठीं एकत्र केलेलें शेण व पाणी ; सारवण .
०कोट  पु. मैदानावरचा किल्ला . डोंगरी किल्ल्याच्या उलट . कोहळा , कोहाळा , कोहोळा , कोव्हाळा , कोहळें , कोव्हळें पुन . भुईकोहळीचा कंद . भूईकोहळ्यांत साधा भुईकोहळा व दूधभुईकोहळा अशा दोन जाती आहेत . याचा पाक शक्तिवर्धक आहे . - वगु ४ . ११६ .
०कोहळी   कोव्हाळी - स्त्री . भुई कोहळ्याचा वेल .
०घर  न. भुईखालील खोली ; तळघर . भुईंचणे , भोयचणे पु . अव . ( तंजा . ) भुईमूग .
०चांपा   फा - पु . एक फूलझाड . याला पानें फुटण्यापूर्वीं भुईंतूनच दांडा येऊन त्यास फुलें येतात .
०चार  स्त्री. ( राजा ) गुरांना खावयास योग्य असें हिरवें गवत , ओला चारा इ
००छत्री  स्त्री. एक वनस्पति ; अलंबें ; कुत्र्याचें मूत .
०ठाकूर  पु. ( निंदार्थी ) खुजा , ठेंगू . वामन मूर्ति मनुष्य इ
००तरवड  पु. एक औषधी झाड ; सोनामुखी .
०देणें  न. जमिनीचें भाडें .
०नळा  पु. दारुनें भरलेला मातीचा नळा . हा भुईंवर ठेवून पेटविला म्हणजे दारुच्या ठिणग्या कारंज्यासारख्या उडतात .
०नेत  न. एका औषधीचें नांव .
०पारणें  न. ( पानाशिवाय , ताटाशिवाय ) भुईवरच जेवण्याचें व्रत .
०पाळणा  पु. भुईवरचा पाळणा . घोडेपाळण्याच्या उलट .
०फुगडी  स्त्री. एक मुलींचा खेळ . - मेखेपु २१८ .
०फोड  न. भुईछत्री पहा .
०बिब्बा  पु. ( बे . ) एक प्रकारची वनस्पति . बिब्बा उतल्यास हिचा रस लावल्यानें तो कमी होतो .
०भाग  पु. ( सरकारनें ) पैशाच्या रुपानें धारा घेण्याऐवजीं जमीनीच्या उत्पन्नाचा घेतलेला भाग .
०भाटलें  न. ( कों . )
ज्यामध्यें वरकस अथवा निकृष्ट धान्यांची लागवड करतात अशी जमीन ; वरकस जमीन ; डोंगराळ आणि सखल जमीन . आगर व शेत व भुईंभाटलें व महाजनकी ह्यांचें उत्पन्न .
( कांहीं खतपत्रांमध्यें जमिनी याअर्थी हा शब्द योजतात ) सर्व प्रकारच्या व सर्व उपयोगाच्या जमिनी .
०भाडें  न. दुसर्‍याच्या मालकीच्या जमिनीवर इमारत बांधली असतां मालकीहक्काबद्दल द्यावयाचें भाडें ; भुईदेणें .
०माडा  पु. ( कों . ) आपोआप बीज पडून उगवलेला रोपा .
०मीठ  न. डोकेंदुखी , दंश इ० वर लावण्यास करतात तो चिकणमाती , मीठ व पाणी यांच्या मिश्रणाचा लेप .
०मूग  पु. 
एक कंद . याच्या वेलाचे ताणे जमिनीवर पसरतात . वेलास आर्‍या फुटून त्या जमिनींत गेल्यावर तेथें त्याच्या शेंगा होतात . भुईमुगाचा खाण्याकडे व तेल काढण्याकडे उपयोग होतो
वेलाची शेंग .
०रिंगणें  न. सामान्यतः रिंगणें ; लहान मुलाचें चोखणें .
०शेंग  स्त्री. भुईमुगाची शेंग .
०सपाटी  स्त्री. भूपृष्ठ
०सर  न. भुई ; जमीन ( घराची ). - क्रिवि . भुईच्या पृष्ठभागावर ; भूपृष्ठाला लागून .
०सरपट   टां - क्रिवि . भुईस लागून ; भुईबरोबर ( वृक्षाची खांदी , घराचें पाखें इ० असणें ); सरपट्या बाजूनें पण पृष्ठभागापासून दूर ( बाण , गोळी इ० कांचें जाणें ). [ भुई + सरपटणें ]
०सरपटा  पु. जमीनीवर पसरणार्‍या एका वेलीचें नांव .
०सांड   क्रिवि . ( राजा . ) भुईपासून थोडें वर ( ओझें उचलणें ); जमीनसांड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP