Dictionaries | References

साप

   
Script: Devanagari

साप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

साप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A serpent or a snake.

साप

  न. एक सरपटणारा प्राणी ; सर्प . देशावर नागाखेरीज सर्व सर्पजातीच्या प्राण्यांना साप म्हणतात ; सामान्य जातिनाम जिवाणूं , किरडूं असून , फुरसे मण्यार , घोणस , शेण्या , नानेटी , जोगी , धामण , आघेला इ० विशिष्ट जातीची नावें कोंकणांत आहेत . २ ( गो . ) घोरपड ; गार . [ सं . सर्प ; प्रा ; सप्प ; पं . संप्प ; हिं . गु . बं . साप ; फ्रेजि . सप ] ( वाप्र ) साप खाई तोंड रितें - ( साप चावतो पण त्याच्या तोंडात कांही येत नाही ) एखाद्या कृत्याचा निष्फळपणा दाखविण्यासाठी योजतात . साप साप म्हणून भुई धोपटणें - ( साप असल्याचा खोटया समजुतीने भुई बडविणे ) नसता दोष लावून बोभाटा , शिक्षा करणें ; ( कधी सा० दोरखंड झोडपण्यांत काय अर्थ . - फाल्गुनराव ) म्ह० साप म्हणू नये धापलो , बामण म्हणू नये आपलो . ( गो . ) दुष्ट माणसावर विश्वास कधी ठेवू नये .
 वि.  ( प्र . ) साफ पहा .
०टोळी  स्त्री. एक विषारी सापाची जात
०सापसुरळी   सापसोळी - स्त्री . एक जातीचा सरडा . ही दिसण्यांत सरडयासारखी तर चालण्यांत सापासारखी असते ; जात विषारी . चोपय पहा . सापाची जीभ - स्त्री . अगदी लहान शस्त्राला म्हणतात . सापाचीमावशी - सापसुरळी . सापाचें वारूळ - साप राह्त असलेले पांढर्‍या मुंग्यांचे वारूळ . सापीण - स्त्री . सापाची मादी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP