Dictionaries | References

यंत्र

   
Script: Devanagari

यंत्र

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह उपकरण जो कोई विशेष कार्य करने या कोई वस्तु बनाने के लिए हो   Ex. आधुनिक युग में नये-नये यंत्रों का निर्माण हो रहा है ।
HYPONYMY:
वाद्ययंत्र इंजन यंत्र-मानव नलकूप ख़राद घड़ी रहट चरखा ओटनी विद्युतजनित्र दमकल धौंकनी पिचकारी चाँपाकल डुप्लिकेटर सूक्ष्मदर्शी कोल्हू कैलक्यूलेटर जलयंत्र रिकॉर्डर वातानुकूलक धूपघड़ी सूली बुलडोजर कम्प्यूटर चक्की मीटर क्रेन बादनुमा आला टेप अधोयंत्र दुग्ध-परिमापक-यंत्र सुरंग अधोलंब बैरोमीटर सिरकाकश प्रोजेक्टर ड्रिल पेसमेकर आरामशीन सिलाई मशीन मुद्रणयंत्र उद्वाहक कूग वाशिंग मशीन भोंपू सीस्मोग्राफ टरबाइन कैमरा मोबाइल मोटर राइड फोनोग्राफ़ दमकला घूर्णिका आसवनी जलकल पवनचक्की एटीएम दूरबीन वायुयंत्र संवातक आर्द्रतामापी टर्बाइन विद्युत उपमार्ग मेमोरी डिवाइस यूएसबी टेबलेट कतरी प्रसारक यंत्र ईरफ़ोन
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

यंत्र

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कसलेंय खास कार्य करपा खातीर वा कसलीय वस्तू तयार करपा खातीर आसता अशें उपकरण.   Ex. आधुनीक युगांत नव्या नव्या यंत्रांची निर्मणी जाता
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

यंत्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

यंत्र

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   An engine, a machine. A diagram of a mystical nature.

यंत्र

 ना.  उत्पादन बाढविणारे साधन . उर्जेवर चालणारे उपकरन ;
 ना.  तांत्रिक साधन .

यंत्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कोणतेही काम सुलभतेने किंवा कमी प्रयासाने होण्यासाठी तयार केलेले गुंतागुंतीचे साधन   Ex. यंत्राच्या साहाय्याने कमी वेळात जास्ती कामे होणे शक्य झाले आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

यंत्र

  न. 
   साधन ; हत्यार ; कोणतेंहि एखादें काम सुलभतेनें , जलदीनें किंवा कमी प्रयासानें होण्यासाठीं तयार केलेलें गुंता गुंतीचें उपकरण ; कळ ; युक्ति .
   बंदूक ; तोफ ; कोणतेंहि अशा रीतीचें संहारसाधन . नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । - ज्ञा ११ . ३४३ .
   रहाट ; रहाटगाडगें . वाया यंत्रारुढ जीवसृष्टि । भ्रमतुसे । - ऋ १३० .
   देवतेच्या पूजेला लागणारी एक गूढ रेखात्मक आकृति ; इच्छा पूर्ण होण्यासाठीं कागदावर वात्स्यायन कामसूत्रकर्त्या ऋषीनें सांगितल्याप्रमाणें काढावयाची आकृति ; एखादी गूढ आकृति . ही कागदावर काढून व ती ताइतांत घालून गळ्यांत बांधतात किंवा तिची पूजा करतात . असें केल्यानें इच्छित फल मिळतें किंवा अनिष्ट टळतें अशी समजूत आहे . उदा० स्वस्तिक कमल वगैरे यांनीं पिशाच्चबाधा होत नाहीं . मंत्रयंत्र कांहीं करिसी बुटबुटी । तेणें भूतसृष्टी पावशील । - तुगा .
   जादू .
   प्राणायाम .
   कळाशी .
   वाद्य . [ सं . यन्त्र = बांधणें , नियमांत आणणें ] एखाद्या भोंवती , बरोबर , शीं यंत्र किंवा यंत्रमंत्र लावणें , मांडणें , चालविणें , करणें - एकाद्याच्या विरुद्ध व्यूह रचणें ; एखाद्याच्या विरुद्ध कट रचणें ; जंतरमंतर करणें .
०गोळ  पु. तोफेचा गोळा . उल्हाट यंत्रांचे मार । दुर्गावरुनि होती अपार । परसैन्याचे यंत्रगोळ समग्र । दुर्गपरिघामाजी पडती । - ह २२ . ८९ .
०धारी  पु. हत्यारबंद शिपाई . काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो म्हणे बेगारी विठा कीं जी । - तुगा ४४३६ .
०शास्त्र  न. यंत्रासंबंधीं ज्यांत विवेचन केलेलें असतें असें शास्त्र ; पदार्थाच्या स्थिरावस्थेचें व गमनावस्थेचें विवेचन करणारें शास्त्र ; याचे दोन विभाग आहेत - १ स्थितिशास्त्र . २ गतिशास्त्र . ( इं . ) एंजिनिअरिंग . यंत्रित वि . नियंत्रण केलेला ; नियमित बांधलेला ; ताब्यांत ठेवलेला . यंत्री वि . यंत्र चालविणारा . देह हें ईश्वर निर्मित यंत्र आहे , यंत्री चालवील तसें तें चालेल । - वि . यंत्राच्या सहाय्यानें बनविलेलें . यांत्रिक वि .
   यंत्रासंबंधीं .
   केवळ यंत्रयोगें झालेलें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP