|
स्त्री. १ तलवार , कोयता , विळी , चाकू इ० हत्यारांची तीक्ष्ण कड , तीक्ष्णपणा ; चौकोनी लांकूड इ० कांची सरळ कड . २ पर्वत , डोंगर इ० कांची माथ्यावरची अगदी उंच कडा . ३ ( ल . ) तीक्ष्ण , तल्लख , तापट , कडक स्वभावाचा माणूस . ४ डोंगराची रांग , ओळ . ५ क्षितिज ; क्षितिजाची काळी रेषा , दृष्टमर्यादा . दिवस धारेस आला . स्त्री. १ जोराचा , वेगाचा ( नदी , इ० काचा ) प्रवाह . तो धारेमाजी निश्चिती । नाव गेली तेधवां । - ह ९ . २६९ . भोंवरे वळणे आणि धार । - दा ३ . ७ . ५२ . २ पाणी इ० पातळ पदार्थ वरुन पडत असतांना , पाऊस पडत असतांना , फुटक्या भांड्याच्या छिद्रांतून द्रवपदार्थ बाहेर पडतांना पाणी इ० चा दिसणारा दोरीसारखा आकार . ३ तेल , तूप इ० पातळ पदार्थ बाजरांत विकण्यास आल्यास त्यांतील काही भाग हक्क म्हणून घेण्याचा पाटील , कुलकर्णी इ० गांवकामगारांचा ( पूर्वीच्या काळी असलेला ) मान ; तेल , दूध वगैरे विकत घेतलं असतां पूर्ण माप झाल्यानंतर वर्तावळा म्हणून घ्यावयाचा थोडासा अंश . ४ धान्य उफणतांना जे हलके धान्य राशीच्या पलेकडे जाऊन पडते ते . ५ तेल , तूप इ० द्रवपदार्थाचा किंचित अंश . जसे - दह्याची कवडी , पाण्याचा थेंब ; तेलाची , तुपाची धार . ६ ( गाय , म्हैस जनावराचे ) दूध काढणे . धारेची वेळ झाली . [ सं . धारा ] ०करणे १ ( शस्त्र इ० कास ) धार लावणे , तीक्ष्ण करणे . २ शौर्याची कृत्ये करणे ; पराक्रम गाजविणे . ०उष्ण धारुष्ण धारोष्ण - वि . धार काढतांना ( दुधास ) असणारा उबटपणा ज्याचा निवाला नाही असे ताजे ( दूध ). असले दूध बलवर्धक व धातुपौष्टिक असते . जेवि श्वानचर्म पात्राप्रती । गोक्षीर भरिती धारोष्ण । - भाराबाल ११ . २८ . [ धारा + सं . उष्ण ] ०काढणे पिळणे ( गाय , म्हैस इ० जनावराचे ) दूध काढणे . ०धरणे ( एखाद्यास तोंड देण्यास ) सिद्ध होणे , सज्जणे . ०देणे उंचावर उभे राहून ( धान्य इ० स्वच्छ करण्याकरितां ) टोपलीतून एकसारखे धारेने खाली ओतणे , वारवणे . ०पडणे ( एखाद्यावर कामे इ० कांचे ) ओझे , बोजा पडणे ; धाड पडणे या अर्थी चुकीने रुढ . ०बंद - ( मंत्र इ० काने शस्त्राची धार बोथट करणे ; निकामी करणे . ०धरणे ( विषार , मोडशी इ० उतरण्यासाठी ) मस्तकावर थंड पाण्याची धार सतत पडेल असे करणे . करणे - ( मंत्र इ० काने शस्त्राची धार बोथट करणे ; निकामी करणे . ०पडणे ( ल . ) पाहिजे तितके द्रव्य , धान्य इ० आकाशांतून ( घरांत ) येऊन वर्षाव होणे , पाऊस पडणे . तुम्ही फार खर्च करावयास सांगता तर माझ्या घरी कांही पैशाची धार पडत नाही . ०फुटणे ( गाय , म्हैस इ० काला ) पुष्कळ दूध येऊं लागणे . ०मारणे तलवार गाजविणे , पराक्रम करणे . धारेवर आणणे धरणे कडक शिस्तीने , करडेपणाने वागविणे ; सक्त अंमल गाजविणे . धारेवर येणे ( एखादे काम इ० ) कडक शिस्तीखाली चालू होणे , राहणे . धारेवर वागणे सावधपणाने , दक्षतेने , मागेपुढे पाहून वागणे ; कष्टाचा आणि धोक्याचा मार्ग चोखळणे . धारेवरचा वाघ पु . ( अशिष्ट . ) कोणीहि , जवरा या अर्थाने रुढ . जसेः - हे काम तू करीनास तर धारेवरचा वाघ करील ? तुला न हाक न मारुं तर धारेवरच्या वाघाला हाक मारुं ? सामाशब्द - ०मारुन पाहणे - ( एखाद्याला ) अगदी कस्पटाप्रमाणे लेखणे , हिंग लावूनहि न पुसणे , ढुंकूनहि न पाहणे . ०करी पु. योद्धा ; पराक्रमी पुरुष ; तरवारबहाद्दर . पाटणकर घोरपडे निंबाळकर तलवारीचे धारकरी । - ऐपो ४३९ . [ धार + करणे ] न पाहणे - ( एखाद्याला ) अगदी कस्पटाप्रमाणे लेखणे , हिंग लावूनहि न पुसणे , ढुंकूनहि न पाहणे . ०कस पु. पोराने खाऊकरितां मला फारच धारकशी धरले . ०लागणे फार वाहूं , गळूं लागणे ; गळती , बुळकी लागणे . जसेः - पावसास धान्यास , गुळास , डोळ्यास , नकातोंडास , गांडीस धार लागली . चारही धारा तोंडात पडणे अनेक मार्गांनी लाभ होणे ; विलासाच्या , उपभोगाच्या सर्व गोष्टी मिळणे . म्ह ० चारही धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहीत = सर्व सुखे , चांगल्या गोष्टी एकाच्याच वांट्यास कधी येत नाहीत . धारभर क्रिवि . थोडेसे , अगदी थोडे ( दूध , तूप तेल इ० द्रव पदार्थ ). कवडी पहा . ( सामाशब्द ) ०कशी - टाकणे - ढकलणे - देणे - लावणे - सोडणे - धारकी - मोठ्या संकटांत , पेचांत आणणे . ०चिंबपोल चिंपोल - न . ( कों . ) धान्य वार्यावर उफणतांना धान्याच्या राशीच्या पलीकडे पडणारा कोंडा , भूस , फोल , हलके धान्य . [ धार + कों . चिंब + पोल ] धरणे - टाकणे - ढकलणे - देणे - लावणे - सोडणे - धारकी - मोठ्या संकटांत , पेचांत आणणे . ०तीर्थ न. ( प्र . ) धारातीर्थ ; धारातीर्थ पहा . ०वणी न. १ दूध तापवितांना त्यांत थोडेसे पाणी घालतात ते . जैसे दुग्धामाजी धारवणी । उदक थोडे घालिती । - भवि ३ . ३३६ . २ ( पाट , प्रवाह इ० काचे ) धारेने पडणारे , वाहणारे स्वच्छ पाणी . डोणीतील पाणी आणूं नकोस ; चांगले धारवणी आण . [ धार + पाणी ] ०बंद स्त्री. १ शब्दाची धार बोथट करण्याचा मंत्र . २ - वि . शस्त्राची धार बोथट करण्याचे मंत्रसामर्थ्य असणारा . ३ - पु . ( वागणुक भाषण इ० कांतील ) धरबंद ; ताळमेळ , ताळतंत्र , संबद्धता . [ धार + बंद ] ०वसा पु. पाण्याचा , नदीचा जोराचा प्रवाह . ते नेणपणाच्या वळसां । बुडोनि गेले गा सहसा । येक कर्ममार्गाचे धारवसां । पडिले जन्ममृत्यूच्या । - रंयोवा १ . ४६९ . ०बोळ मेर - पुस्त्री . ( कु . ) सुसंबद्धता ; ताळमेळ ( भाषण , वर्तन इ० कांतील ) ( अकरणरुपी प्रयोग ). ०शीव स्त्री. नदीच्य प्रवाहाने ठरलेली ( गांव , शेत इ० काची ) मर्यादा , सीमा . हीत बदलहि होत असतो . सायखेड व चांदोडी यांची धारशीव आहे . [ धार + शीव = सीमा ] ०बोळ क्रिवि . कांठोकांठ ; तुडुंब ; भरपूर ( पाणी इ० द्रव पदार्थ भरणे ) ०राव पु. १ तरवारबहाद्दर , शूर योद्धा या अर्थाची पदवी . धारराव शिंदे . - रा १९ . ८१ . धारराव स्वागारदार संसारमोह सांडुनी .... स्वप्राणावरि उदार झाले . - अमृत ५४ . २ ( उप . ) पराक्रमाच्या पोकळ बाता मारणारा ; बढाईखोर . धारोधार क्रिवि . तुडुंब ; कांठोकांठ . [ धार द्वि . ]
|