Dictionaries | References

घाणा

   
Script: Devanagari
See also:  घाण , घाणी

घाणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   घाण्यांत घालणें To cast into a troublous condition. घाण्यांतून पिळणें or काढणें To squeeze and crush; to destroy the strength, substance, marrow of, lit. fig.

घाणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An oil-mill. materials thrown into the mill at one time, the charge. A sugarcane-press.
घाण्यात घालणें   To cast into a troublous condition.
घाण्यातून पिळणें, काढणें   To squeeze and erush.
  f  A lime-mill.

घाणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तेल किंवा उसाचा रस काढण्याचे यंत्र   Ex. शेतकर्‍याने घाण्याला बैल जुंपले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एका वेळी जाते, गिरणी, घाणा इत्यादींमध्ये घालावयाचा घास, परिमाण   Ex. आईने सकाळी आठ घाणे ज्वारी दळली
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malഉരല്/ രമുറം/ ചട്ടി

घाणा

  पु. तीळ , भुईमुग , करडई वगैरेचे तेल काढण्याचें साधन , यंत्र सांचा ; तेलाची गिरणी . घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । - ज्ञा १७ . ४१९ . २ तेल्याच्या घाण्याची लाट जींत फिरते ती लांकडी कुंडी . ३ एका वेळीं जातें , गिरणी , घाणा इ० मध्यें घालावयाचा घांस ; एकवार घालावयाचें परिमाण ; तेल काढण्यासाठीं घाण्यांत घालावयाचें तिळाचें , करडईचें एका खेपेचें परिमाण ; खापरांत भाजण्याच्या , उखळांत कांडण्याच्या पदार्थाचें , धान्याचें औषधांचें एक वेळेचें परिमाण , भर , हप्ता . ४ उसाचा रस गाळण्याचा चरक . रणभूमीचा घाणा करौनि सरिसां । महाकाळु इक्षु गाळीतुसें जैसा । - शिशु १०४३ . ५ मकरसंक्रांतीच्या दिवशीं ब्राह्मणास दान देण्याकरितां स्त्रिया उखळावर जी धान्याची रास ठेवतात ती . ६ कांडण्याचा विधि ( देवक बसण्यापूर्वीचा ); लग्न , मुंज , इ० मंगल कार्यात दुरडींत तांदूळ घालून सौभाग्यवती स्त्रिया मंगलगीतें गात ते तांदूळ कांडतात तो विधि ; मंगलविधीच्या आरंभीं कांडण्याचा समारंभ करतात तो . ( क्रि० भरणें ; घालणें ). लग्न किंवा मुंज यांच्या साहित्याला आरंभ करण्याची सूचक ही घाण्याची चाल असावी . ही शास्थोक्त नाहीं . ७ चुना मळण्याची घाणी . ८ दौतींत उगीच लेखणी घालून ठेविली असतां होणारी विशिष्ट स्थिति , अवस्था . - शास्त्रीको [ प्रा . दे . घाण ; का . गाण ; गु . घाण ; सिं . घाणो = तेल्याचा घाणा ; तुल० ग्रहाणक - गहाणअ - घाणअ - घाणा - राजवाडे , पाटणचा शिलालेख शके ११२८ ; मूळअर्थ घाण्यांतला घांस ; हप्ता . ] ( वाप्र . ) घाणा करणें - १ ( मनुष्यास , प्राण्यास ) छळणें ; त्रास देणें ; गांजणें ; सतावून सोडणें ; शक्तीबाहेर काम करावयास लावणें . २ ( कागद , कापड , कपडे इ० ) विसकटून टाकणें ; अस्ताव्यस्त करणें ; चुरडणें ; गुधडणें ; सुरकुत्यांनीं युक्त करणें ; घुसडणे . घाण्यांत घालणें - ( एखाद्यास ) मोठया संकटांत लोटणें ; पेंचात पाडणें . घाण्यांतून पिळणें , घाण्यांतून काढणें - १ चेंगरणें ; चिरडणें ; पिळून काढणें . २ ( एखाद्यास त्याच्या ) शक्तीबाहेरचें काम सांगून , करावयास लावून , नि : सत्त्व , निर्बल बनविणें . ( एखाद्याचा ) भुसा पाडणें . घाणेकार - पु . ( गो . ) तेली ; तेलविक्या [ घाणा + करणें ]
  पु. एक मुलांचा खेळ . - व्याज्ञा १ . ३२९ .

घाणा

   घाणा करणें
   १. वाटोळे फिरणें. २. घाण्याप्रमाणें फिरवून, चिरडून वगैरे त्रास देणें. ३. छळणें
   त्रास देणें. ४. विसकटून टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP