|
पु. - हस्त ; बाहु ; खांद्यापासून बोटांपर्यंत शरीराचा भाग . कोपरापासून बोटांपर्यंतचा भाग .
- कोपरापासून मधल्याबोटाच्या टोकापर्यंतचें माप . हा पंचा साडेचार हात भरला .
- उजवी किंवा डावी बाजू . तरफ . आमचें घर वाडयाचे उजव्या हातास आहे .
- ताबा ; आटोका ; अधिकार ; खातें . तुझें काम करणें माझ्या हातीं नाहीं . ( कारक विभक्तींत प्रयोग ).
- स्वतः व्यक्तिगत मनुष्य . अपराधावांचून शिवी देणें हें माझ्या हातानें घडणार नाहीं .
- स्वामित्व ; कबजा ; मालकी ; ताबा . सांप्रत माझ्या हातीं पैसा नाहीं .
- हातानें वाजविण्याच्या वाद्यावर मारलेली हाताची थाप .
- डाव ; खेळ ( काठी , लाठी , पट्टा इ० शस्त्रांचा ). पट्टयाचे दोन हात करून दाखव .
- कर्तृत्वशक्ति ; अंग ; हस्तकौशल्य ( एखाद्या विषयांतील , कलेंतील ). त्याचा चित्र काढण्याचा हात चांगला आहे .
- कुलुपाची किल्ली ; चावी . कुलपाचा हात इकडे दे बघूं .
- सोंगटया , पत्ते इ० खेळांतील डाव , खेळण्याची पाळी , खेळ ; खेळणारा गडी . अजून आमच्यांतील एक हात खेळावयाचा आहे .
- हस्तक ; मदतनीस ; साहाय्यक ; हाताखालचा मनुष्य .
- ज्यावर दंड , जोर काडावयाचे तो लांकडी , दगडी ठोकळा ; हत्ती
- ( रंग देणें , सारवणें इ० कामीं ) वरून हात फिरविणें ; हातानें दिलेला थर , लेप .
- ठोंसा ; तडाखा ; हस्तक्रिया ( भिन्नभिन्न प्रसंगीं त्या त्या अर्थांनीं ).
- ( तेली - घाणा ) कातरीस जोडलेला वांकडा लाकडी तुकडा .
- हात टेकावयासाठीं , हातानें धरावयाचा कोणताहि पदार्थाचा भाग . खुर्चीचे - रहाटाचे - हात .
- हाताच्या आकाराची कोणतीहि वस्तु .
- ( सोनारी ) हातांतील दागिना सैल करण्याचें एक हत्यार .
- ( नृत्य ) दोन हातांनीं मिळून करावयाचे अभिनयाचे प्रकार . हे ४० प्रकारचे आहेत .
- ( शिंपी ) कापड मोजण्याचें बारा तसूंचें एक माप ; गज .
- पान्हा ( नटबोलट फिरविण्याचा ). [ सं . हस्त ; प्रा . हत्थ ; हिं . गु . हाथ ; बं . हात ; आर्मे . जि . हय , अथ ; पॅलेस्टाईनजि . हस्त ; पोर्तुजि . बस्त ]
म्ह०
- हात ओला तर मैत्र भला - नाहींतर पडला अबोला - जोपर्यंत माणूस दुसर्यास देत असतो तोंपर्यंत त्याच्याशीं सगळे मित्रत्वानें वागतात.
- हात घशांत घातला तरी कोरडाच = कितीहि मदत केली तरी बेइमान राहणारा .
- हातपाय रोडया , पोट लोडया ; हातपाय काडया , पोट ढेर्या = पोटाचा तटतटीतपणा व अवयवांचा रोडकेपणा .
- हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे , तोंड फिरे तेथें अवदसा फिरे = उद्योगी माणसाचा हात श्रीमंती आणतो तर नुसत्या बडबडयाच्या हातून कांहींच होत नाहीं उलट दारिद्रय येतें .
- आपला हात जगन्नाथ ( जगन्नाथपुरीस आपल्या हातानें वाटेल तेवढा प्रसाद घेतां येतो त्यावरून ) वाटेल तेवढें व तसें घेणें ; प्राचुर्य .
- हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये = जें खात्रीनें आपलें आहे ( आपणांस मिळावयाचेंच आहे ) तें सोडून जे अनिश्चित आहे तें मिलविण्याच्या नादीं लागूं नये .
- हातच्या कांकणास आरसा कशाला ? ( हातांतील कांकण डोळयानें दिसण्यासारखें आहे , आरसा आणणें वेडेपणा )= जी गोष्ट उघड सिध्द आहे ती दाखविण्यास पुराव्याची जरूरी नाहीं .
- हातपाय र्हावलें काम करूं वायले = नाइलाज होणें .
- हातपाय लुले तोंड चुरचुरां चाले = अशक्त पण तोंडाळ , मुजोर माणूस .
- हातभर लांकूड नऊ हात ढलपी = अतिशयोक्ति करणें .
- हातांत नाहीं अडका बाजारांत चालला धडका = जवळ कवडी नाहीं पण डौल बादशहाचा . ( वाप्र . )
स्त्री. संवय ; खोड . तरुणपणाची ऐट आणण्याची विलक्षण हात होती . - महाराष्ट्रशारदा , नोव्हेंबर १९३६ . ०आंखडणें देण्यासाठीं पुढें केलेली वस्तु एकदम मागें घेणें ; देण्याचें प्रमाण कमी करणें , बंद करणें . ०आटोपणें मारणें इ० हातांनीं करावयाची कोणतीहि क्रिया बंद करणें . ०आवरणें १ हात आटपणें . २ कोणत्याहि कृत्यापासून परावृत्त होणें . ऐकेल वचन माझें आवरिल द्वेषिकाळ हात रणीं । - मोकर्ण ४६ . ४४ . ०इचकणें ( व . ) हात मोडणें . ०उगारणें उचलणें - ( एखाद्यास ) मारावयास प्रवृत्त होणें . ०उचलणें १ स्वयंस्फूर्तीनें , आपण होऊन बक्षीस देणें . २ हातीं घेणें ( काम , धंदा ). ०ओढविणें १ घेण्यासाठीं झांप टाकणें . २ विटंबना , करण्यासाठी तुच्छता दर्शविण्यासाठीं तोंडापुढें हात करणें . ०ओंवाळणें तुच्छता दर्शविणें . ०करणें १ लाठी मारणें ; शस्त्राचा वार करणें . हात टाकणें . स्त्रीचे अंगावर हात करूं नये . २ पट्टा , बोथाटी वगैरेचे डाव करणें ; फिरविणें . ३ वादविवाद , युध्द करणें . ०कापून देणें गुंतणें - लेखी करारकरून स्वतःस बांधून देणें . ०खंडा एखादें कार्य ( हुन्नर ) हमखास पार पाडण्याचें कौशल्य , पटाईतपणा अंगीं असणें . असणें एखादें कार्य ( हुन्नर ) हमखास पार पाडण्याचें कौशल्य , पटाईतपणा अंगीं असणें . ०गहाण उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें . २ कोणत्याही कामास हात न लावणें . ठेवणें उजवा हात देवास वाहून कोणत्याहि कामीं त्याचा उपयोग करावयाचा नाहीं असा नवस करणें . २ कोणत्याही कामास हात न लावणें . ०घालणें १ ( एखादें काम ) पत्करणें ; करावयास घेणें . २ एखादी वस्तु घेणें , धरणें , शोधणें यासाठीं हात पुढें करणें . मग विभु वसनासी त्याचिया हात घाली । - आनंदतनय . ३ ( एखाद्या कामांत , व्यवहांरांत ) ढवळाढवळ करणें . आंत पडणें . ०घेणें ( पत्त्यांचा खेळ ) हुकूम मारून अगर भारी पान मारून दस्त करून घेणें . ०चढणें प्राप्त होणें . अनुताप चढलिया हात । क्षणार्ध करी विरक्त । - एभा २६ . २० . हाताचा आंवळा , हाताचा मळ , हातचें कांकण - उघडउघड गोष्ट ; सत्य . ०चा अत्यंत सोपें कृत्य ; हात धुण्यासारखें सोपें काम ; अंगचा मळ . मळ अत्यंत सोपें कृत्य ; हात धुण्यासारखें सोपें काम ; अंगचा मळ . ०चालणें - हातांत सत्ता , सामर्थ्य , संपत्ति असणें , मिळविणें , मिळणें .
- एखादी गोष्ट करतां येणें . काशिद्यावर माझा हात चालत नाहीं .
०चालविणें हत्यार चालविणें ( संरक्षणार्थ ). न्यायाच्या अभावीं ज्याला त्याला हात चालवावेसें वाटणें रास्तच होईल . - टि १ . २२ . ०चेपणें लांचाचे पैसे मुकाटयानें एखाद्याचे हातांत देणें . ०चोळणें फार राग आला असतां तळहात एकमेकांवर घासणें ; कुंठितगति होऊन स्वस्थ बसावें लागणें . शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा ... । - मोकर्ण २१ . १३ . ०जोडणें - नमस्कार , प्रार्थना , विनंति करणें .
- शरण जाणें , येणें . अपराध फार केले परि आतां हात जोडिले स्वामी ! । - मोआर्यकेका.
- नको असलेंला पदार्थ हात जोडून आर्जवानें दूर सारणें ; अव्हेरणें . दानश्री त्याहुनि बहु दुग्धासहि हात जोडितो मीन । - मोबृहद्द ८ .
०झाडणें १ झिडकारणें ; नापसंत ठरविणें . २ निराशेनें सोडून देणें . ३ एखादें काम उरकून मोकळें होणें . ०टाकणें १ पोहतांना पाण्यावर हात मारणें . २ ( एखाद्यावर ) प्रहार करणें ; मारणें . बायकोमाणसाच्या अंगावर हात टाकणें तुम्हाला शोभत नाहीं . ०टेकणें १ काम करण्यास असमर्थ असल्यानें पराभव पावल्याचें कबूल करणें . २ म्हातारपणानें अशक्त होणें . ३ दमणें ; थकणें ; टेकीस येणें . ०तोडणें स्वतःच्या लेखानें आपणांस बांधून घेणें . ०थावरणें हात आवरणें ; आटोपणें . यावरूनि हातरणीं । - मोस्त्री ६ . ५१ . ०दाखविणें दावणें - १ हस्तसामुद्रिक जाणण्यासाठीं जोशापुढें तळहात करणें . २ अहितकारक परिणाम करणें . ३ स्वतःची शक्ति , सामर्थ्य दाखविणें . शकादि देव असते तरि त्यांसहि दावितोंचि हात रणीं । - मोभीष्म ३ . ४ . ४ नाडीपरीक्षा करण्यासाठीं वैद्यापुढें हात करणें . ५ हातानें एखादी वस्तु दर्शविणें . ६ बडवून काढणें ; पारिपत्त्य करणें ; सूड घेणें ; उट्टें काढणें . म्ह० हात दावून अवलक्षण चिंतणें , करणें . ०दाबणें लांच देणें . त्यानें आपल्यास मदत करावी म्हणून त्याचे हात दाबावे असें एकदां मनांत येतें . - विवि १० . ९ . २१० . ०देणें १ मदत करणें ; तारणें . घडतां अधःपतन मज पुण्यें देतिल न हात परिणामीं । - मोआदि १९ . ३२ . २ चोरणें ; उचलेगिरी करणें . ३ खाद्यपदार्थावर ताव मारणें . ४ ( बायकी , छप्पापाणी ) छप्पू घातलेल्या मुलीस इतर मुलीनीं ( तिनें उठावें म्हणून ) हस्तस्पर्श करणें . २ लांच देणें . ०धरून विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें ; जाराबरोबर निघून जाणें . जाणें विवाहित स्त्रीनें एखाद्या परपुरुषाबरोबर पळून जाणें ; जाराबरोबर निघून जाणें . ०धुणें ( ल . ) एखाद्या कामांतून आपलें अंग काढून घेणें . ०धुवून लागणें - एखाद्याचा नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें ; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें . पाठीस लागणें - एखाद्याचा नाश करण्याविषयीं हट्टानें प्रवृत्त होणें ; चिकाटी धरून एखाद्याचा पाठलाग करणें . ०न ( व . ) विटाळशी होणें ; गुंत येणें . बनणें ( व . ) विटाळशी होणें ; गुंत येणें . ०नाचविणें चेष्टा करण्यासाठीं दुसर्याचे तोंडापुढें हातावारे करणें . हात ओवाळणें पहा . ०पडणें १ एखादें काम अनेकांनीं लागून संपविणें ; एखादा खाद्यपदार्थ अनेकांनीं एकसमयावच्छेनेंकरून फन्ना करणें . २ ( ना . ) जिवंतपणी भेट नाहीं पण दहनापूर्वी तरीं प्रेताचें दर्शन होणें . ०पसरणें भीक मागणें . ०पाय १ अवयव आंखडणें ; विव्हल होणें . २ एखाद्यास प्रतिबंध , अडचण करणें . खोडणें १ अवयव आंखडणें ; विव्हल होणें . २ एखाद्यास प्रतिबंध , अडचण करणें . ०पाय , पाय गाळणें - १ अशक्त होणें ; रोडावणें . २ खचून जाणें ; नाउमेद होणें ; गलितधैर्य होणें . गळणें , पाय गाळणें - १ अशक्त होणें ; रोडावणें . २ खचून जाणें ; नाउमेद होणें ; गलितधैर्य होणें . ०पाय १ अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें ; क्रियाशक्ति रहित होणें . २ हरकत , अडथळा करणें . गुंडाळणें १ अंतकाळच्या वेदनांनीं हातपाय आंखडणें ; क्रियाशक्ति रहित होणें . २ हरकत , अडथळा करणें . ०पाय १ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें ; चरफडणें . २ रागानें तरफडणें ; शिव्याशाप देणें . चोळणें १ सूड घेण्याची प्रतिज्ञा करणें ; चरफडणें . २ रागानें तरफडणें ; शिव्याशाप देणें . ०पाय १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा . २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें . ३ धडपड करणें ; चरफडणें . झाडणें १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा . २ सुटकेसाठीं हातापायांचा उपयोग करणें . ३ धडपड करणें ; चरफडणें . ०पाय सुखानें , निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें . ताणणें सुखानें , निष्काळजीपणानें हातपाय पसरून पडणें . ०पाय ( गो . ) आटापिटा करणें . धोडावप ( गो . ) आटापिटा करणें . ०पाय १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा . २ मर्यादेच्या आटोक्याच्या बाहेर जाणें ; जास्त जास्त व्याप वाढविणें ; पसारा वाढविणें . म्ह० भटाला दिली ओसरी , भट हातपाय पसरी . ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें ; कामांत आळस करणें ( काम करीन असें वचन दिलें असतां ). ४ मागणी वाढत जाणें , अधिकाधिक आक्रमण करणें . पसरणें १ हातपाय गुंडाळणें अर्थ १ पहा . २ मर्यादेच्या आटोक्याच्या बाहेर जाणें ; जास्त जास्त व्याप वाढविणें ; पसारा वाढविणें . म्ह० भटाला दिली ओसरी , भट हातपाय पसरी . ३ काम होत नसल्यास सबबी सांगणें ; कामांत आळस करणें ( काम करीन असें वचन दिलें असतां ). ४ मागणी वाढत जाणें , अधिकाधिक आक्रमण करणें . ०पाय अंतकाळच्या वेदनेनें , फार संतापानें हातपाय झाडणें . पाखडणें अंतकाळच्या वेदनेनें , फार संतापानें हातपाय झाडणें . ०पाय बसणें , पाय पोटाळून बसणें - आळशासारखेम बसणें ; जेठा मारून बसणें . पांघरून बसणें , पाय पोटाळून बसणें - आळशासारखेम बसणें ; जेठा मारून बसणें . ०पाय १ उधळपट्टी सुरू होणें ; संपत्तीला ( जाण्यास ) पंख फुटणें . दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत . ३ लुच्चेगिर्या करण्यांत तरबेज होणें . २ थंडीनें हातपायास भेगा पडणें . फुटणें १ उधळपट्टी सुरू होणें ; संपत्तीला ( जाण्यास ) पंख फुटणें . दौलतीला अलीकडे हातपाय फुटुं लागले आहेत . ३ लुच्चेगिर्या करण्यांत तरबेज होणें . २ थंडीनें हातपायास भेगा पडणें . ०पाय , पाय लावणें , पाय फुटणें , पाय लागणें - १ मूळ गोष्टींत , अंदाजांत भर घालणें ; वाढविणें . २ नटविणें ; थटविणें ; अलंकृत करणें . ३ मागून वाढविणें ( काम , दर , खर्च इ० ). ४ लबाडया इ० नीं सजवून उजळून दाखविणें . फोडणें , पाय लावणें , पाय फुटणें , पाय लागणें - १ मूळ गोष्टींत , अंदाजांत भर घालणें ; वाढविणें . २ नटविणें ; थटविणें ; अलंकृत करणें . ३ मागून वाढविणें ( काम , दर , खर्च इ० ). ४ लबाडया इ० नीं सजवून उजळून दाखविणें . ०पाय करणें - फेरफटका करून हातपाय सैल , हलके करणें ; फिरणें ; सहल करणें . मोकळे करणें - फेरफटका करून हातपाय सैल , हलके करणें ; फिरणें ; सहल करणें . ०पाय , पाय मोडून येणें , पाय टाकणें - १ तापापूर्वी अंग मोडून येणें ; निरंगळी येणें . २ बलहीन , निःसत्त्व करून टाकणें ; हरकत घेणें . मोडणें , पाय मोडून येणें , पाय टाकणें - १ तापापूर्वी अंग मोडून येणें ; निरंगळी येणें . २ बलहीन , निःसत्त्व करून टाकणें ; हरकत घेणें . ०पाय अंतकळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें , ताठ होणें . सोडणें अंतकळच्या वेदनांनीं हातपाय ताणणें , ताठ होणें . ०पाय उद्योग , परिश्रम , कष्ट इ० करणें ; स्वस्थ न बसणें . हालविणें उद्योग , परिश्रम , कष्ट इ० करणें ; स्वस्थ न बसणें . ०पोचणें कृतकृत्य होणें ( ढुंगणाला हात पोंचणें असा मूळ प्रयोग ). ०फाटणें रुची वाढणें . जेथें जिव्हेचा हातु फाटे । - ज्ञा १८ . २४९ . ०फिरणें लक्ष जाणें ; व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेणें ; साफसफाई करणें . ०फिरविणें १ लहान मुलास प्रमानें कुरवाळणें . प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी । - मोउद्योग १३ . १८३ . २ पुन्हां उजळणी , उजळा देणें . ०बसणें १ एकसारखें लिहीत , वाचीत इ० राहणें . २ अक्षरांचें वळण बसणें ; तें पक्कें होणें . ३ एखादें काम उत्तम प्रकारें करतां येणें ; मनांत ठसणें ; विशिष्ट क्रिया करण्याची सफाई हातास प्राप्त होणें . ०बांधणें १ मर्यादा घालणें ; स्वैर होऊं न देणें . २ अडथळा आणणें . ०बोट , भार - मदत करणें . लावणें , भार - मदत करणें . ०भिजणें १ दक्षणा देणें ; ( गो . ) हात भिजविणें . २ लांच देणें ; हात ओले करणें . ०मारणें १ बळकाविणें ( पैसा इ० ) देणें . २ अधाशीपणानें खाणें ; ताव मारणें . ३ एखाद्या वस्तूवर विविध क्रिया करणें . ०मिठ्ठीला ( माण . ) हाताहातीं होईपर्यंत भांडणें . येणें ( माण . ) हाताहातीं होईपर्यंत भांडणें . ०मिळवणें १ घाव घालणें . तस्करानें जलदीकरून हात मिळविला जाऊन । - ऐपो ३९० . २ ( कुस्ती ) सलामी घेणें . ०मोडणें १ असहाय्य , मित्रहीन होणें . २ मिळत असलेली देणगी , बक्षीस नाकारणें . ०राखणें कुचराई करणें . ०राखून करणें - काटकसरीनें खर्च करणें . खर्च करणें - काटकसरीनें खर्च करणें . ०लागा ( गो . ) विटाळशी होणें . ना ( गो . ) विटाळशी होणें . ०लावणें मदत करणें . - वसणें - क्रि . हस्तगत होणें . ते ज्ञाननिष्ठा जेथें हातवसे । - ज्ञा १८ . १२४८ ; - भाए २४० . ०वहाणें १ हत्यार चालविणें . परि परमप्रिय अर्जुन त्यावरि याचा न हात वाहेल । - मोउद्योग १२ . ५४ . २ प्रवृत्त होणें ; कार्य करणें . ०वळणें १ सराव , परिपाठ इ० नें हातास सफाई येणें . २ ( एखाद्या गोष्टीस , कृत्यास ) प्रवृत्त होणें . ०सैल सढळपणें खर्च करणें . सोडणें सढळपणें खर्च करणें . ०सोडणें १ पूर्वीप्रमाणें कृपा , लोभ न करणें . २ संगति , ओळख सोडणें . ०हातांत लग्न लावणें . एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे . - भा ४९ . देणें लग्न लावणें . एखाद्या तरुणीचा हात माझ्या हातांत दे . - भा ४९ . ०हालवीत काम न होतां रिकामें परत येणें . हातणें - क्रि . सारवणें . हाताखालीं घालणें - देखरेखीखालीं , अंमलाखालीं , कबज्यांत , ताब्यांत घेणें . हातां चढणें - प्राप्त होणें . जरी चिंतामणी हातां चढे । - ज्ञा ३ . २३ ; - एभा १० . २८२ . हाताचें पायावर लोटणें - आजची अडचण उद्यांवर ढकलणें ; आजचें संकट लांबणीवर टाकणें . हाताचे लाडू होणें - खरजेनें हाताच्या मुठी वळणें , त्या न उघडणें . हाताच्या धारणेनें घेणें - मारणें ; बुकलणें . हातांत कंकण बांधणें - एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें ; चंग बांधणें ( यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून ). हातांत हात घालणें - १ लांच देणें . २ मैत्रीच्या भावानें वागणें , प्रेम करणें . ३ विवाहसंबंध घडवून आणणें . ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें ; निघून जाणें . २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें . ३ बोंब मारणें . हातातोंडास - १ तारुण्यावस्था प्राप्त होणें ( लग्न झालेली स्त्री , तरुण मुलगा इ० ). २ फल देण्याच्या स्थितीस येणें . हातापायांचा चौरंग होणें - पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें . हातापायांचे डगळे होणें , हातापायांचे डगळे पडणें , हातापायांचे डगळे मोडणें - अशक्तपणानें अंगास कंप सुटणें ; अंग शिथिल होणें . हातापायांचे ढीग पडणें , हातापायांचे ढीग होणें - भीतीनें , आजारानें अशक्त असहाय्य होणें . हातापायांच्या फुंकण्या होणें - अशक्तता , निर्बलता येणें . हातापायां पडणें , हातींपायां पडणें , हातापायीं पडणें , हातींपायीं पडणें - गयावया करणें ; प्रार्थना करणें . २ शरण जाणें ; नम्र होणें ; दया याचिणें . हाताबोटावर , हातावर - आतां होईल , घटकाभर्यानें होईल अशा स्थितीस येणें ; हस्तगत कबज्यांत , साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें . हाताला चढणें - प्राप्त होणें . संसार कशाचा जरि न हाताला चढली । - राला ११२ . हाताला येईल तें - जें कांहीं हातांत सांपडेल तें ; ज्याचेवर हात पडेल तें . हाताला लागणें - गमावलेल्या , फुकट गेलेल्या , नासलेल्या , बिघदलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें . कापडांत पैसे घालूं नका , त्यांतून हाताला कांहीं सुध्दां लागणार नाहीं . हाताला वंगण लावणें - लांच देणें . - राको १३३७ . हाताला हात लावणें - १ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें ( म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें ). २ स्वतःकांहीं न करतां दुसर्यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें ; दुसर्याच्या कार्याला अनुमति देणें . हातावर असणें - पूर्णपणें साध्य पैसे उसनें आणणें , काढणें , घेणें . हातावर तुरी देणें , हातावर तुरी देऊन पळून जाणें , हातावर हात देऊन पळून जाणें , हातावर हात मारून पळणें - फसविणें ; डोळयादेखत फसवून पळून जाणें ; देखत देखत भुलविणें . सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या ... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ? - आगर . हातावर दिवस काढणें , हातावर दिवस लोटणें - मोठया कष्टानें संसार चालविणें . हातावर धरणें - हातांवर संभाळीत राहावयास लावणें ( मुलानें ). यानें मला सकाळपासून हातावर धरिलें . हातावर पाणी पडणें - भोजनोत्तर आंचवणें . हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर . हातावर पिळकणें - लांच देणें . हातावर पोट भरणें , हातावर संसार करणें - अंगमेहनत , भिक्षा , नौकरी करून उपजीविका करणें . हातावर मिळविणें - मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें . हातावर - जवळ येऊन ठेपणें . हातावर , हातावर लागणें हातावर दूध देऊं लागणें - थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण ( सरकी इ० ) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें , पान्हवणें . हातावर शीर घेऊन असणें - कोणतेंहि धाडसाचें कृत्य करण्यास सदां सिध्द असणें . हातावर हात चोळणें - रागानें तळहात एकमेकांवर घासणें ; चरफडणें . इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी ... - मोआदि ७ . ४० . हातावर हात मारणें - १ ( देणार्याच्या , घेणार्याचे हातास स्पर्श होणें ) द्रव्यलाभ होणें . हातास चढणें , हातां चढणें , हातीं चढणें - प्राप्त होणें . तो किल्ला माझ्या हातीं चढला . नवनीत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि । हातीं धरणें - १ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें ; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें . २ निरंकुशपणें मोकाट सोडणें ( जीभ , तोंड , पोट इ० इंद्रियें ). हातीं धोंडे घेणें - १ विरुध्द उठणें . २ वेडयासारखें करणें . हातींपायीं डेवणें , हातींपायीं अन्न इ० डेवणें , हातींपायीं धावणें , हातींपायीं , हातींपायीं रेवणें - जाडय , सुस्ती येणें ; शिव्या देण्यास तयार होणें . हातींपायीं उतरणें , हातींपायीं सुटणें , हातींपायीं मोकळी होणें - सुखरूपपणें बाळंत होणें . हातींपायीं पडणें , हातींपायीं लागणें - अतिशय विनवण्या , काकुळत्या करणें . हातीं भोपळा घेणें , हातीं भोपळा देणें - भिक्षा मागणें , मागावयास लावणें . आडव्या हातानें घेणें - १ चोरून ; चोरवाटेनें घेणें . २ झिडकारणें ; भोसडणें ; तुच्छता दाखविणें ; कचकावून खडकाविणें ; मारणें . आडव्या हातानें घेणें , आडव्या हातानें चारणें - बाजूनें , तोंडांत हात घालून खाऊं घालणें ; औषधोपचार करणें ( घोडा इ० स ). ( देणें - चोरून देणें - मारणें - मागल्या बाजूनें मारणें - ठोकणें ). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत - सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो . दोहों हाताचे चार हात करणें , दोहों हाताचे चार हात होणें - लग्न करणें , होणें . या हाताचे त्या हातावर - क्रिवि . ताबडतोब ; जेव्हांचे तेव्हांच ( दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थी ). या हाताचे त्या हातास कळूं न देणें - अत्यंत गुप्तपणें करणें . रिकाम्या हातानें - जरूरीच्या साधनां - उपकरणां - सामग्रीखेरीज ; कांहीं काम न करतां . याचा हात कोण धरीसा आहे ? - याच्या वरचढ , बरोबरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला - ( व ) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई देणें , हातांत नरळाची नरोटी देणें - भिक्षा मागावयास लावणें . सामाशब्द - येणें काम न होतां रिकामें परत येणें . हातणें - क्रि . सारवणें . हाताखालीं घालणें - देखरेखीखालीं , अंमलाखालीं , कबज्यांत , ताब्यांत घेणें . हातां चढणें - प्राप्त होणें . जरी चिंतामणी हातां चढे । - ज्ञा ३ . २३ ; - एभा १० . २८२ . हाताचें पायावर लोटणें - आजची अडचण उद्यांवर ढकलणें ; आजचें संकट लांबणीवर टाकणें . हाताचे लाडू होणें - खरजेनें हाताच्या मुठी वळणें , त्या न उघडणें . हाताच्या धारणेनें घेणें - मारणें ; बुकलणें . हातांत कंकण बांधणें - एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणें ; चंग बांधणें ( यजमानानें यज्ञ करावयाच्या पूर्वी हातांत दीक्षासूत्र बांधण्याच्या चालीवरून ). हातांत हात घालणें - १ लांच देणें . २ मैत्रीच्या भावानें वागणें , प्रेम करणें . ३ विवाहसंबंध घडवून आणणें . ४ विवाहित स्त्रीनें परपुरुषाशीं संबंध ठेवणें ; निघून जाणें . २ एखाद्या कार्यास घाईनें आरंभ होणें . ३ बोंब मारणें . हातातोंडास - १ तारुण्यावस्था प्राप्त होणें ( लग्न झालेली स्त्री , तरुण मुलगा इ० ). २ फल देण्याच्या स्थितीस येणें . हातापायांचा चौरंग होणें - पेटके वगैरेमुळें हातपाय आंखडणें . हातापायांचे डगळे होणें , हातापायांचे डगळे पडणें , हातापायांचे डगळे मोडणें - अशक्तपणानें अंगास कंप सुटणें ; अंग शिथिल होणें . हातापायांचे ढीग पडणें , हातापायांचे ढीग होणें - भीतीनें , आजारानें अशक्त असहाय्य होणें . हातापायांच्या फुंकण्या होणें - अशक्तता , निर्बलता येणें . हातापायां पडणें , हातींपायां पडणें , हातापायीं पडणें , हातींपायीं पडणें - गयावया करणें ; प्रार्थना करणें . २ शरण जाणें ; नम्र होणें ; दया याचिणें . हाताबोटावर , हातावर - आतां होईल , घटकाभर्यानें होईल अशा स्थितीस येणें ; हस्तगत कबज्यांत , साध्य होण्याच्या अगदी बेतांत असणें . हाताला चढणें - प्राप्त होणें . संसार कशाचा जरि न हाताला चढली । - राला ११२ . हाताला येईल तें - जें कांहीं हातांत सांपडेल तें ; ज्याचेवर हात पडेल तें . हाताला लागणें - गमावलेल्या , फुकट गेलेल्या , नासलेल्या , बिघदलेल्या वस्तूंतून अल्प अंश मिळणें . कापडांत पैसे घालूं नका , त्यांतून हाताला कांहीं सुध्दां लागणार नाहीं . हाताला वंगण लावणें - लांच देणें . - राको १३३७ . हाताला हात लावणें - १ पति पुण्याहवाचनादि धर्मसंस्कारास बसला म्हणजे पत्नीनें त्याच्या हातास नुसता हात लावणें ( म्हणजे तिलाहि त्याचें फळ मिळतें ). २ स्वतःकांहीं न करतां दुसर्यानें केलेल्या कामाच्या फळांत वांटेकरी होणें ; दुसर्याच्या कार्याला अनुमति देणें . हातावर असणें - पूर्णपणें साध्य पैसे उसनें आणणें , काढणें , घेणें . हातावर तुरी देणें , हातावर तुरी देऊन पळून जाणें , हातावर हात देऊन पळून जाणें , हातावर हात मारून पळणें - फसविणें ; डोळयादेखत फसवून पळून जाणें ; देखत देखत भुलविणें . सुभद्रा काबीज करण्यासाठीं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मदतीनें बलिरामाच्या हातावर ज्या तुरी दिल्या ... तें पाहून तरी आम्हांस कधीं विषाद झाला आहे काय ? - आगर . हातावर दिवस काढणें , हातावर दिवस लोटणें - मोठया कष्टानें संसार चालविणें . हातावर धरणें - हातांवर संभाळीत राहावयास लावणें ( मुलानें ). यानें मला सकाळपासून हातावर धरिलें . हातावर पाणी पडणें - भोजनोत्तर आंचवणें . हातावर पाणी पडलें कीं चालला बाहेर . हातावर पिळकणें - लांच देणें . हातावर पोट भरणें , हातावर संसार करणें - अंगमेहनत , भिक्षा , नौकरी करून उपजीविका करणें . हातावर मिळविणें - मिळवावें व खावें अशा स्थितींत राहणें . हातावर - जवळ येऊन ठेपणें . हातावर , हातावर लागणें हातावर दूध देऊं लागणें - थानास वासरूं न लावतां किंवा पान्हवण ( सरकी इ० ) पुढें न ठेवतां जनावरानें दूध देणें , पान्हवणें . हातावर शीर घेऊन असणें - कोणतेंहि धाडसाचें कृत्य करण्यास सदां सिध्द असणें . हातावर हात चोळणें - रागानें तळहात एकमेकांवर घासणें ; चरफडणें . इंद्रें स्वतातघातक पाठीसीं घातला म्हणोनि करें । कर चोळी ... - मोआदि ७ . ४० . हातावर हात मारणें - १ ( देणार्याच्या , घेणार्याचे हातास स्पर्श होणें ) द्रव्यलाभ होणें . हातास चढणें , हातां चढणें , हातीं चढणें - प्राप्त होणें . तो किल्ला माझ्या हातीं चढला . नवनीत मंथनावांचून । हातां न चढे सहसाहि । हातीं धरणें - १ स्वतःच्या देखरेखीखालीं घेणें ; एखाद्यास आपल्या आश्रयाखालीं घेणें . २ निरंकुशपणें मोकाट सोडणें ( जीभ , तोंड , पोट इ० इंद्रियें ). हातीं धोंडे घेणें - १ विरुध्द उठणें . २ वेडयासारखें करणें . हातींपायीं डेवणें , हातींपायीं अन्न इ० डेवणें , हातींपायीं धावणें , हातींपायीं , हातींपायीं रेवणें - जाडय , सुस्ती येणें ; शिव्या देण्यास तयार होणें . हातींपायीं उतरणें , हातींपायीं सुटणें , हातींपायीं मोकळी होणें - सुखरूपपणें बाळंत होणें . हातींपायीं पडणें , हातींपायीं लागणें - अतिशय विनवण्या , काकुळत्या करणें . हातीं भोपळा घेणें , हातीं भोपळा देणें - भिक्षा मागणें , मागावयास लावणें . आडव्या हातानें घेणें - १ चोरून ; चोरवाटेनें घेणें . २ झिडकारणें ; भोसडणें ; तुच्छता दाखविणें ; कचकावून खडकाविणें ; मारणें . आडव्या हातानें घेणें , आडव्या हातानें चारणें - बाजूनें , तोंडांत हात घालून खाऊं घालणें ; औषधोपचार करणें ( घोडा इ० स ). ( देणें - चोरून देणें - मारणें - मागल्या बाजूनें मारणें - ठोकणें ). एका हाताचीं बोटें पण सारखीं नाहींत - सारख्या परिस्थितींतील माणसें असलीं तरी त्यांच्यांत थोडाफार फरक असतो . दोहों हाताचे चार हात करणें , दोहों हाताचे चार हात होणें - लग्न करणें , होणें . या हाताचे त्या हातावर - क्रिवि . ताबडतोब ; जेव्हांचे तेव्हांच ( दुष्कृत्याची फेड लवकर व खात्रीनें मिळते या अर्थी ). या हाताचे त्या हातास कळूं न देणें - अत्यंत गुप्तपणें करणें . रिकाम्या हातानें - जरूरीच्या साधनां - उपकरणां - सामग्रीखेरीज ; कांहीं काम न करतां . याचा हात कोण धरीसा आहे ? - याच्या वरचढ , बरोबरीचा कोण आहे ? याचा हात धरण्याची शक्ति कोणास आहे ? हातांत काय तागडू मिळाला - ( व ) कोणता फायदा झाला ? हातांत नारळाची आई देणें , हातांत नरळाची नरोटी देणें - भिक्षा मागावयास लावणें . सामाशब्द - ०अनार पु. शोभेच्या दारूचा एक प्रकार . ०इंद न ( कों . ) खेंकडे पकडण्याचें जाळें . ०उगावा पु. १ एखाद्या किचकट , अडचणीच्या कामांतून , धंद्यांतून अंग काढून घेणें . २ सूड ; पारिपत्य . ( क्रि० करणें ). ३ कर्जाची उगराणी ; घातलेलें भांडवल परत मिळविणें . [ हात + उगवणें ] ०उचल स्त्री. १ पेढींतून स्वतःची रक्कम आतां थोडी मग थोडी अशा रीतीनें खर्चण्यास घेणें . २ मूळ भांडवल ; मुद्दल . उचल मध्यें पहा . ०उचला वि. १ आपखुषीनें , हात उचलून दिलेला ( पदार्थ ). २ ज्याचा स्वतः करण्याबद्दल पत्कर घेतला आहे असा ( व्यवहार , उद्योग ). ०उसणा उसना - वि . थोडा वेळ उसना घेतलेला ; लवकर परत करण्याच्या बोलीनें ( लेख करून न देतां ) उसनी घेतलेली रक्कम . ०कडी स्त्री. हातांतील बेडी . मन सिंतरील विवेकासीं । यालागी हात कडिया दोहींसीं । - एभा २३ . ९५१ . ०करवत पुस्त्री . हातानें चालविण्याची लहान करवत . ०करवती स्त्री. लहान हात करवत . ०करीण स्त्री. अचळाला हात लावतांच ( वासरूं न सोडतां किंवा आंबोण न ठेवतां ) पान्हा सोडून दूध देणारी गाय ; म्हैस . इच्या उलट पान्हवणकरीण . ०कार्पे न. ( गो . ) लांडी , बिन बाह्यांची बंडी . ०काम न. हस्तकौशल्याचें काम ( यांत्रिक कामाच्या विरुध्द ); हस्तव्यवसाय . ( इं . ) हॅंडफ्रॅक्ट . ०कैची कचाटी - स्त्री . अलिंगन ; मिठी . ०खंड वि. १ मधून मधून कामांत सोडवणूक करणारा ; मदतनीस ( मूल , मित्र , शेजारी ); अडल्या वेळीं आपल्या कामीं उपयोगी पडणारा . २ हातखंडा पहा .[ हात + खंड = खळ , विसावा ] ०खंडा वि. निष्णात , करतलामलकवत् असलेली ; म्हणाल त्यावेळीं तयार ( विद्या , कला ). ०खर्च पु. किरकोळ खर्च ; वरखर्च . ०खवणी खंवणी - स्त्री . लहान खवणी . ०खुंट खुंटा - पु . ( विणकाम ) वशारन पसरलेल्या लांबीपाशीं असलेल्या समोरच्या खांबापासून मागा पाशीं बसण्याच्या जागेजवळ उजवीकडे दोरी बांधावयाची खुंटी . ०खुरपणीचें न. हातखुरप्या नारळाचें खोबरें . लोणी न. हातखुरप्या नारळाचें खोबरें . ०खुरपा वि. हातानेंच आंतील खोबरें खरवडून काढण्याजोगा ( कोंवळा नारळ ). ०खुरपें न. हातखुरपा नारळ . २ गवत काढण्याचा लहान विळा . ०खेरणें खोरणें - न . कलथा ; उलथणें ; झारा . ( क्रि० लावणें , अन्नास , पैक्यास = पैका उकळण्याचा सपाटा ). म्ह० हातखेरणें असतां हात कां जाळावा . ०खेवणें न. १ हातवल्हें . २ मदतनीस ; हाताखालचा माणूस . ०खेवा खेव्या - पु . हातखेवणें अर्थ २ पहा . ०खोडा पु. हात अडकविण्याचा सांपळा . चंद्रसूर्याचा हातखोडा । काळा कैसेनि घालिजे । - भाए ५९४ . ०गाडी स्त्री. हातानें फेकण्या - उचलण्या - जोगा दगड . कुश्चीतभावाचे हातगुंडे । - ज्ञाप्र २६५ . २ असला दगड हातानें जेथवर फेंकला जाईल तितकें अंतर . ०गुण पु. ( बरेंवाईट करण्याचा योग , गुण ) नशीब ; हातीं ( काम , माणूस ) धरणाराचा प्रारब्धयोग . हस्तगुण पहा . ०घाई स्त्री. १ हातानें वाजवावयाचें वाद्य जोराजोरानें , आवेशानें वाजविणें . २ ( ल . ) उतावळेपणा ; जोराची हालचाल . ( क्रि० हातघाईस येणें = मारामारी करणें ). ०चरक पु. १ हातानें फिरवून रस काढावयाचा चरक . २ हात घाणी . ०चलाख वि. चोर ; उचल्या . ०चलाकी चलाखी - स्त्री . हस्तचापल्य ; लपवाछपवी ; नजरबंदीचा कारभार ( गारुडी , सराफ इ० चा ). ०चाळा पु. १ हाताचा अस्थिरपणा ; चुळबुळ ; हातानें कांहीं तरी उगीच करीत रहावें अशी लागलेली खोड ; हातचेष्टा . ( क्रि० लागणें ). २ अशा प्रकारानें होणारें नुकसान . ( क्रि० करणें ). ३ सदोदित हात गुंतलेला असणें ; त्यांत निमग्न असणें ( वाढता धंदा , व्यापार , खेळ इ० त ); देवघेवीचा मोठा उद्योग . ०चिठी चिटी चिट्टी - स्त्री . १ अधिकार्यानें शिक्कामोर्तब न करतां आपल्या हातच्या निशाणीनेंच पुरी केलेली चिठी , हुकूम . २ कोणाहातीं पाठविलेली चिठी - चपाटी . ०चे , च्या , हातोहातीं - क्रिवि . लगेच ; ताबडतोब ; आतांचे आतां ; क्षणार्धात ; पट्कन ( करणें , घडणें ). हा गडी हाताचे हातीं जाऊन येईल . हाताचे हातीं चोरी - लबाडी - शिंदळकी इ० . हातीं , च्या , हातोहातीं - क्रिवि . लगेच ; ताबडतोब ; आतांचे आतां ; क्षणार्धात ; पट्कन ( करणें , घडणें ). हा गडी हाताचे हातीं जाऊन येईल . हाताचे हातीं चोरी - लबाडी - शिंदळकी इ० . ०चोखणें चुंफणें - न . तान्ह्या मुलास चोखण्यासाठीं हातांत देण्याची वस्तु . ०जतन स्त्री. हातानेम केलेली मशागत ( मालीस इ० ); रोज वक्तशीर घेतलेली काळजी . हा घोडा नुसत्या हातजतनानें इतका हुशार आहे . ०जुळणी स्त्री. ( ठाकुर ) लग्न लागल्यानंतर मुलानें मुलीचे दोन हात धरणें . - बदलापूर १३८ . ०झाड स्त्री. आपोआप उगवलेलें नसून मुद्दाम लाविलेलें झाड . ०झाडणी स्त्री. राग , तिरस्कार इ० नें हात झटकणें . ०झालणा पु. हातजाळें ; हातविंड . ०झोंबी स्त्री. परस्परांचे हात धरून केलेली झटापट ; हिसकाहिसकी ; झगडा . ०तुक न. १ हातानें वजन करणें . नव्हती हाततुके बोल । - तुगा ३४२३ . २ अटकळ ; अजमास . मग त्यागु कीजे हाततुकें । - ज्ञा १८ . १३१ . ०दाबी स्त्री. लांच . मालकानें हातदाबी केली म्हणजे माल त्यांना परत देतात . - गुजा ६७ . ०धरणें न. ( खा . ) सोधणें ; स्वयंपाकघरांतील भांडीं उतरणें इ० चें फडकें . धरणी माप - न . माप भरतांना त्याचे शेवटास डावा हात धरून , मापापेक्षां थोडें जास्त धान्य घेऊन केलेलें माप . बोटधरणी माप पहा . ०धुणी स्त्री. १ राजाच्या हातधुणारास दिलेलें इनाम इ० . २ स्वयंपाकघरांतील मोरी . ०धोंडा पु. १ हातानें उचलण्याजोगा धोंडा . २ धोंडा हातानें फेंकला असतां जेथवर जाईल इतकें अंतर ; टप्पा . ०नळा पु. हातांत धरून सोडण्याचा , शोभेची दारू भरलेला नळा . ०नळी स्त्री. चपटें कौल . ०निघा निगा - हातजतन पहा . हातजपणूक . ०नेट क्रिवि . १ ( व . ) हाताचा जोर , भार देऊन . २ ( व . ) हाताजवळ . ०पडत पात - वि . हातीं असलेलें ; अगदीं जवळ असणारें ; लागेल त्यावेळीं ताबडतोब मिळणारें . ०पहार स्त्री. हातभर लांबीची पहार . ०पा हातोपा - पु . अंगरखा इ० ची बाही . ०पाटिलकी स्त्री. १ हातानें ठोकणें ; चोपणें , बदडणें . तोंडपाटिलकीचे उलट . २ बोलण्यापेक्षां प्रत्यक्ष कृति , काम . तोंडपाटिलकी सगळयांस येते हातपाटिलकी कठीण . ३ हस्तचापल्य ; उचलेगिरी . ०पाणी न. १ लग्नांत रासन्हाणीचे वेळीं वधूच्या सासूनें तिचे हातांवर ओतावयाचे पाणी . ( क्रि० घालणें ). २ लग्नांत मांडवपरतण्याचे दिवशीं सासूनें सुनेची बोहोल्यावर ओटी भरून , किंवा मांडवांत न्हातेवेळीं नवर्यानें केशरी रंगांत बुडवून तिचे हातांत घालावयाची अंगठी . ३ लग्नांत मुलाच्या हाताखालीं मुलीचा हात ठेवून त्यांवर समंत्रक पाणी घालणें . - बदलापूर २०५ . ०पान पु. कोंका पडण्यापूर्वीचें केळीचें पान . ०पान्हा पु. हातकरीण गाय , म्हैस इ० नें सोडलेला पान्हा ( वासरूं किंवा अंबोण दाखविण्याशिवाय ). हातपान्ह्यास लागणें , येणें , हातपान्ह्याची गाय इ० प्रयोग . ०पालवी स्त्री. हात पोंहोचेल इतक्या उंचीवरील पाला . ०पावा वि. ( कों . ) हाताच्या आटोक्यांतील , हात पोहोंचेल इतक्यां उंचीवरील ( वेलीचें फूल इ० किंवा खोली - विहिरींतील पाणी इ० ). [ हात + पावणें ] ०पिंटी स्त्री. १ झोंबाझोंबी ; गुद्दागुद्दी . २ ( ल . ) हातघाईची मारामारी . तंव राउतां जाली हातपीटी । - शिशु ९६८ . [ हात + पिटणें ] ०पेटी स्त्री. हातानें भाता चालवून वाजवावयाची बाजाची पेटी ; हार्मोनियम . २ सरकारी कामाचे कागदपत्र ठेवण्याची पेटी . स्वभावचित्रें २४ . ०पोळी स्त्री. चेंडूफळीचा एक प्रकारचा खेळ . - मखेपु ५६ . ०फळ न. ( बे . ) मेर ओढण्याचें फळ . ०फळी हातोफळी - क्रिवि . हातोहातीं ; लवकर . ०बळ न. हस्तसामर्थ्य . हातबळ ना पायबळ , देरे देवा तोंडबळ . ०बांधून स्त्री. ( कुस्ती ) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें . डंकी स्त्री. ( कुस्ती ) जोडीदारास खालीं आणल्यावर त्यानें आपला एक पाय धरला तर आपण दुसर्या पायानें जोडीदाराचे पाठीवरून झोंका घेऊन उडी मारून त्यास चीत करणें . ०बेडी स्त्री. कैद्याच्या हातांत अडकवावयाची बेडी ; हातकडी . ०बोनें न. हातांत घेतलेलें भक्ष्य . बुध्दीचेनि शाकें । हातबोनें निकें । - ज्ञा ६ . २८२ . ०बोळावन स्त्री. हातांनीं मार्गाला लावणें . जाणो नेदी योग्यता । ग्रहीं हातबोळावन करितां । - भाए ३४९ . ०भाता पु. हातांत घेऊन फुंकावयाचा भाता ; लहान भाता . ०भार पु. मदत ; साहाय्य ( विशेषतः द्रव्याचें ). ( क्रि० लावणें ). ०भुरकणा भुरकें - वरील प्रकारचा पातळ पदार्थ . ०भेटी स्त्री. प्रेमानें हातांत हात घालणें . - एभा २८ . ५९२ . ०मांडणी स्त्री. पैसे पावल्याची पोंच म्हणून पैसे नेणार्याची खतावणीवर घेतलेली सही . ०मात स्त्री. हात टेकणें . ०मेटी क्रिवि . आळसांत ; निरुद्योगीपणानें ; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत ( दिवस इ० ) घालविणें . दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी . हेटीमेटी क्रिवि . आळसांत ; निरुद्योगीपणानें ; हातांवर व गुडघ्यावर टेकून रमतगमत ( दिवस इ० ) घालविणें . दिवस गेला हातमेटीं चांदण्या खाली कापूस वेटी . ०रगाडा पु. उंसाचा हातचरक . ०रवी स्त्री. घुसळखांब , मांजरी यांचे विरहित हातानेंच फिरविण्याची लहान रवी . ०रहाट पु. हातानें ओढून पाणी काढण्याचा लहान रहाट . ०रिकामी स्त्री. विधवा स्त्री . - बदलापूर १७४ . ०रिती वि. ( महानु . ) रिकामी विधवा . - स्मृतिस्थळ . ०रुमाल पु. १ तोंड वगैरे पुसण्याचा लहान रुमाल . २ नित्योपयोगी कागदपत्रें ठेवण्याच्या दप्तराचा रुमाल ; चालता रुमाल ; त्यांतील कागदपत्रांचें बंडल . ०रोखा पु. दस्तक ; चिठी ; आज्ञापत्र . पाराजीपंत वाघ यांस हातरोखा वरचेवर पाठवून अति आग्रहें अंतरवेदींत घालविलें . - भाब १०२ . ०लाग पु. हाताचा टप्पा . ०लागास लागीं येणें असणें - कक्षा , आंवाका , आटोका , अवसान इ० त येणे , असणे . ०लागा लाग्या - वि . अनुकूल असणारा . तुमचे हातलागे लोक असतील . - वाडबाबा १ . ६ . ०लावणी स्त्री. १ वेश्येचा चिरा उतरणें ; कौमार्यभंग ( क्रि० करणें ). २ हाताची पेरणी ; लागवण . - वि . हातपेरणीचें . ०लावा लाव्या - वि . हाताळ ; चोरटा ; चोरी करण्यासाठीं हात फुरफुरत असलेला . ०वजन न. १ जिन्नस हातांत घेऊन केलेलें वजन . २ अशाप्रकारें वजन काढण्याची लायकी . ०वटी हातोटी - स्त्री . १ हस्तकौशल्य ; हस्तचातुर्य . २ ( सामा .) कसब ; नैपुण्य ; चलाखी . अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे । - ज्ञा ९ . २९ . ३ विशिष्ट पध्दत , रीत , प्रकार . [ हिं . ] भाषणाची - पोहण्याची - व्यापाराची इ० हातोटी . ०वडा हातोडा - पु . सोनार , कासार इ० चें ठोकण्याचें हत्यार . ०वडी हातोडी - स्त्री . लहान हातोडी . ०वणी न. १ हात धुतलेलें पाणी . २ ( कों . ) हातरहाटाचें पाणी पन्हळांतून जेथें पडतें तेथील जमीनीचा उंच केलेला भाग ; हातणी . ०वल्हें न. हातानेंच वल्हवावयाचें लहान वल्हें . ०वश वि. हस्तगत . ०वशी स्त्री. हात उगारणें . - शर . ०वळा हातोळा - पु . हातवटी पहा . म्ह० गातां गळा ; शिंपता मळा , लिहितां हातवळा . ०वारे पु. अव . हातानीं केलेले हावभाव ; हाताची हालचाल . ०विंड न. ( राजा . ) हात झालणा पहा . ०विरजण न. अजमासानें घातलेलें विरजण ०विरजा विरंगुळा - वि . कामांत मदत करण्याच्या लायक , लायकीस झालेला ( पुत्र , शिष्य , उमेदवार इ० ) [ हात + विरजणें ] ०शिंपणें न. सोडवणी न देतां शेलणें इ० साधनानें भाजीपाल्यास उडवून द्यावयाचें पाणी ; असें पाणी शिंपणें . ०शेकणें न. ( उसाचा चरक ) चुलाण्यांत जाळ घालणारास त्याच्या मेहनती बद्दल द्यावयाचा गूळ . ०शेवई स्त्री. हातानें वळलेली शेवई ; याचे उलट पाटशेवई . ०सर न. बायकांचा हातांतील एक दागिना , गजरा . हे पाटल्या हातसरांस ल्याली । - सारुह ६ . २६ . ०सारवण न. खराटा , केरसुणी न घेतां हातानें जमीन इ० सारवणें . ०सुख न. १ दुसर्यास , शत्रूस हातानें मारूंन त्यामुळें अनुभविलेलें सुख ( क्रि० होणें ). २ हातानें दिलेला मार . ०सुटका स्त्री. १ एखाद्या व्यवहारांतून , धंद्यांतून स्वतः अंग काढून घेणें ; मोकळें होणें . २ हातविरजा पहा . ३ हाताचा सढळपणा . ०सुटी स्त्री. औदार्य . हे हातसुटीक्षीरसागरा । वांचौनि नाहीं । - भाए ७६९ . ०सुतकी स्त्री. पाथरवटाचें दगड फोडण्याचें हत्यार . ०सूत न. चातीवर हातानीं काढलेलें सूत . ०सोकील सोकेल सोका - वि . हाताच्या संवयीचा ; अंगाखांद्यावर घेण्यास संवकलेला . केल कुत्रा हातसोंका । घडो नेदि तीर्थयात्रा . - तुगा २९५४ . ०सोडवण नस्त्री . हातसुटका अर्थ १ , २ पहा . ०सोरा सोर्या सुरा सुर्या - पु . कुरडया इ० करण्याचा सांचा . ०हालवणी स्त्री. प्रवाशांवरील एक जुना कर ( त्यांच्या हात हालवण्याच्या क्रियेबद्दल हा कर असे ). हातचा - वि . १ हातानें दिलेला ; स्वाधीनचा ; हातांतला ; हातानें निर्मिलेली , मिळविलेली , दिलेली ( वस्तु , काम , उत्पादन इ० ). शूद्राचे हातचें पाणी स्नानसंध्येस घेऊं नये . रोग्यास औषध देणें मनुष्याच्या हातचें आहे - आयुष्य घालणें नाहीं . २ ( अंकगणित ) पूर्णांकाची बेरीज करतांना बेरजेच्या संख्येंतला अंक ज्या स्थानाचा त्या स्थानीं मिळविण्याकरितां उरलेला अंक . ( क्रि० येणें ; रहाणें ; ठेवणें ). ३ लवकर हातीं येणारें ; अवसानांतील . ४ ताब्यांतील ; कबजांतील . म्ह० हातचें सोडून पळत्याचे पाठीस लागूं नये . ०चा १ हातांतील सोडणें . २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तूस मुकविणें . पाडणें १ हातांतील सोडणें . २ एखाद्यास त्याचे ताब्यांतील वस्तूस मुकविणें . ०चा धड नीट - वि . नीटनेटकें काम करणारा ( लेखक , कारागीर ). ०चा पु. फार प्रिय माणूस . तळहाताचा फोड पहा . फोड पु. फार प्रिय माणूस . तळहाताचा फोड पहा . ०चा पु. सहज घडणारी गोष्ट . सरळ , सोपी आणि बालिकबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे . - कीच . मळ पु. सहज घडणारी गोष्ट . सरळ , सोपी आणि बालिकबोध भाषा कशी वापरावी हें म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे . - कीच . ०चा वि. सढळ हाताचा . हातवा - पु . १ ( बायकी ) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें . २ लग्नांत नवर्याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा . ३ घोडयाचा खरारा , साफ करण्याचा काथ्याचा पंजा . ४ काडवात मनको . ५ ( कर्हाड ) न्हाणवली बसवितांना , मखर बांधावयाचे ठिकाणीं , कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटें ठसें उठविणें . हातळ , हाताळ , हाताळु - वि . चोरण्याची संवय असलेला ; चोर ; भामटा . हातळणें , हाताळणें - उक्रि . १ हात लावणें ; चोळवटणें ; चिवडणें , २ हाताळ माणसानें वस्तू चोरणें . हातळी , हाताळी , हाताळेंस - स्त्रीन . १ घोडयाचा कथ्या इ० चा खरारा . २ भात्याची बोटांत , हातांत अडकवावयाची चामडयाची वादी . ३ ( कर . ) भाकरी . हाता - पु . हातांत राहील इतका जिन्नस , पसा ( फळें , फुलें इ० पांच - सहा इ० संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात ). हाताखालचा - वि . १ मदतनीस ; हाताखालीं काम करणारा . २ उत्तम परिचयाचा ; माहितींतील . ३ हातांतील ; कबज्यामधील ; स्वाधीन . ४ दुय्यम ; कमी दर्जाचा . हाताखालीं - क्रिवि . १ सत्तेखालीं ; दुय्यम प्रतींत . २ स्वाधीन . ३ जातांजातां ; हातासरशीं ; सहजगत्या . मी आपला घोडा विकावयास नेतोंच आहे , मर्जी असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन . हाताचा उदार , मोकळा , हाताचा सढळ - वि . देणगी इ० देण्यांत सढळ . हाताचा कुशल - वि . हस्त कौशल्यांत निपुण , प्रवीण . हाताचा जड , हाताचा बळकट , हाताचा थंड - वि . १ चिक् कू ; कृपण . म्ह० हाताचा जड आणि बोलून गोड . २ मंद ( लेखक ). हाताचा जलद - वि . काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ - वि . फटाफट मारणारा ; मारकट . हाताचा बाण - पु . वर्चस्व , पगडा , वजन पाडणारें कृत्य , गोष्ट ( क्रि० गमावणें ; दवडणें ; सोडणें ). हाताजोगता - वि . १ हातांत बसेल ; मावेल ; धरतां येईल असा . २ हात पोहोचण्याजोगें . हातानिराळा , हातावेगळा - वि . १ पूर्ण ; पुरा ; सिध्द केलेला ; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें ( काम , धंदा इ० ). हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल . २ - क्रिवि . एकीकडे ; बाजूस . कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा . हातापध्दति - स्त्री . दलाल माल घेणार्याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्याकडून अजमावतो ती पध्दत . हाताची थट्टा - स्त्री . थट्टेनें मारणें ( थापटी इ० ); चापट देणें . ( तोंडी थट्टा नव्हे ). हाताफळी , हातीफळी - स्त्री . गुद्दागुद्दी ; मारामारी ; कुस्ती ; हातझोंबी ; धक्काबुक्की . मजसीं भिडे हातोफळी । - ह १९ . १४३ . - क्रिवि . पट्कन ; चट्दिशी ; तत्काळ ; हातावर हात मारून . [ हात + फळी ] हातावरचा संसार , हातावरचें पोट - पुन . मजुरी , कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें ( क्रि० करणें ; चालविणें ) थोडया पगाराची , कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह . हातावीती - क्रिवि . हातोहात पहा . सर्वज्ञ हातावीती पुढें जाती । - पुच . हातासन - न . हातवटी . अन्योपदेशाचेनि हातासनें । - ज्ञा ६ . ११९ . हातासरसां - क्रिवि . त्याच हातानें , प्रकारानें ; तसेंच ; त्याच बरोबर ; चालू कामांत आहे तोंच . उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू . हातिणें - अक्रि . मारणें . - मनको . हातिवा - स्त्री . काडवात . उजळोनि दिव्य तेजा हातिवा । - ज्ञा १६ . २३ . हातुवसीया - वि . एक हात अंतरावरील . हातवसिया कळागंगां पार्वती । - धवळे ३१ हातोणी - स्त्री . ( व . ) खरकटें पाणी ; हातवणी . हातोपा - हातपा पहा . हातोपात , हातोपाती - क्रिवि . एका हातांतून दुसर्या हातांत , वरचेवर ; हातोहात . - ज्ञा १८ . १५६ . हातोरी - क्रि . ( ना . ) हातांनें ; साहाय्यानें . हातोवा - पु . ( महानु . ) अंजली ; ओंजळ . हातोवा केवि आटे अंभोनिधि । - भाए २१७ . हातोसा - पु . मदत ; हातभांर . ( क्रि० देणें ), हातोहात , हातोहाती - क्रिवि . १ हातचेहातीं ; हातोपात . २ चट्कन ; भरदिशीं . ( क्रि० येणें = मारामारी करणें ). हिंवांळयाचे दिवसांत दुपार हातोहात भरते . हातोळा - हातवळा पहा . हातोळी - स्त्री . ( व . ) लग्न . हात्या - पु . १ पाणरहाटाचा दांडा . २ घोडा घासण्याची पिशवी ; खरारा . हाताळी अर्थ १ पहा . ३ मागाच्या फणीची मूठ . ४ काहिलींतील गूळ खरवडण्याचें खुरपें . ५ ( कर . ) मोठी किल्ली . सुटा वि. सढळ हाताचा . हातवा - पु . १ ( बायकी ) गौरीपूजनाचे सणांत हळदीकुंकवानें हात भिजवून जमिनीवर छाप मारणें . २ लग्नांत नवर्याच्या मिरवणुकीच्या मागें धरावयाचा कणकेचा दिवा . ३ घोडयाचा खरारा , साफ करण्याचा काथ्याचा पंजा . ४ काडवात मनको . ५ ( कर्हाड ) न्हाणवली बसवितांना , मखर बांधावयाचे ठिकाणीं , कुंकू पाण्यांत भिजवून हातानें पांच उलटे पांच सुलटें ठसें उठविणें . हातळ , हाताळ , हाताळु - वि . चोरण्याची संवय असलेला ; चोर ; भामटा . हातळणें , हाताळणें - उक्रि . १ हात लावणें ; चोळवटणें ; चिवडणें , २ हाताळ माणसानें वस्तू चोरणें . हातळी , हाताळी , हाताळेंस - स्त्रीन . १ घोडयाचा कथ्या इ० चा खरारा . २ भात्याची बोटांत , हातांत अडकवावयाची चामडयाची वादी . ३ ( कर . ) भाकरी . हाता - पु . हातांत राहील इतका जिन्नस , पसा ( फळें , फुलें इ० पांच - सहा इ० संख्येचा संच एकेक वेळ हातांत घेऊन बाजूस ठेवतात ). हाताखालचा - वि . १ मदतनीस ; हाताखालीं काम करणारा . २ उत्तम परिचयाचा ; माहितींतील . ३ हातांतील ; कबज्यामधील ; स्वाधीन . ४ दुय्यम ; कमी दर्जाचा . हाताखालीं - क्रिवि . १ सत्तेखालीं ; दुय्यम प्रतींत . २ स्वाधीन . ३ जातांजातां ; हातासरशीं ; सहजगत्या . मी आपला घोडा विकावयास नेतोंच आहे , मर्जी असली तर हाताखालीं तुमचाहि घोडा नेईन आणि विकीन . हाताचा उदार , मोकळा , हाताचा सढळ - वि . देणगी इ० देण्यांत सढळ . हाताचा कुशल - वि . हस्त कौशल्यांत निपुण , प्रवीण . हाताचा जड , हाताचा बळकट , हाताचा थंड - वि . १ चिक् कू ; कृपण . म्ह० हाताचा जड आणि बोलून गोड . २ मंद ( लेखक ). हाताचा जलद - वि . काम करण्यांत चलाख हाताचा फटकळ - वि . फटाफट मारणारा ; मारकट . हाताचा बाण - पु . वर्चस्व , पगडा , वजन पाडणारें कृत्य , गोष्ट ( क्रि० गमावणें ; दवडणें ; सोडणें ). हाताजोगता - वि . १ हातांत बसेल ; मावेल ; धरतां येईल असा . २ हात पोहोचण्याजोगें . हातानिराळा , हातावेगळा - वि . १ पूर्ण ; पुरा ; सिध्द केलेला ; पुन्हां हात लावण्याची जरूरी राहिली नाहीं असें ( काम , धंदा इ० ). हा दुर्निवह कोश एकदां हातानिराळा झाला म्हणजे दुसरें काम घेतां येईल . २ - क्रिवि . एकीकडे ; बाजूस . कामापुरती भांडीं वहिवाटींत ठेवा वरकड हातानिराळीं ठेवा . हातापध्दति - स्त्री . दलाल माल घेणार्याच्या हातावर रुमाल टाकून गुप्तरीतीनें मालाची किंमत माल घेणार्याकडून अजमावतो ती पध्दत . हाताची थट्टा - स्त्री . थट्टेनें मारणें ( थापटी इ० ); चापट देणें . ( तोंडी थट्टा नव्हे ). हाताफळी , हातीफळी - स्त्री . गुद्दागुद्दी ; मारामारी ; कुस्ती ; हातझोंबी ; धक्काबुक्की . मजसीं भिडे हातोफळी । - ह १९ . १४३ . - क्रिवि . पट्कन ; चट्दिशी ; तत्काळ ; हातावर हात मारून . [ हात + फळी ] हातावरचा संसार , हातावरचें पोट - पुन . मजुरी , कामधंदा करून स्वतःचें कसेंतरी पोट भरणें ( क्रि० करणें ; चालविणें ) थोडया पगाराची , कष्टाची नोकरी करून उदरनिर्वाह . हातावीती - क्रिवि . हातोहात पहा . सर्वज्ञ हातावीती पुढें जाती । - पुच . हातासन - न . हातवटी . अन्योपदेशाचेनि हातासनें । - ज्ञा ६ . ११९ . हातासरसां - क्रिवि . त्याच हातानें , प्रकारानें ; तसेंच ; त्याच बरोबर ; चालू कामांत आहे तोंच . उष्टी काढतो आहेस तों हातासरशीं भांडीं घास मग हात धू . हातिणें - अक्रि . मारणें . - मनको . हातिवा - स्त्री . काडवात . उजळोनि दिव्य तेजा हातिवा । - ज्ञा १६ . २३ . हातुवसीया - वि . एक हात अंतरावरील . हातवसिया कळागंगां पार्वती । - धवळे ३१ हातोणी - स्त्री . ( व . ) खरकटें पाणी ; हातवणी . हातोपा - हातपा पहा . हातोपात , हातोपाती - क्रिवि . एका हातांतून दुसर्या हातांत , वरचेवर ; हातोहात . - ज्ञा १८ . १५६ . हातोरी - क्रि . ( ना . ) हातांनें ; साहाय्यानें . हातोवा - पु . ( महानु . ) अंजली ; ओंजळ . हातोवा केवि आटे अंभोनिधि । - भाए २१७ . हातोसा - पु . मदत ; हातभांर . ( क्रि० देणें ), हातोहात , हातोहाती - क्रिवि . १ हातचेहातीं ; हातोपात . २ चट्कन ; भरदिशीं . ( क्रि० येणें = मारामारी करणें ). हिंवांळयाचे दिवसांत दुपार हातोहात भरते . हातोळा - हातवळा पहा . हातोळी - स्त्री . ( व . ) लग्न . हात्या - पु . १ पाणरहाटाचा दांडा . २ घोडा घासण्याची पिशवी ; खरारा . हाताळी अर्थ १ पहा . ३ मागाच्या फणीची मूठ . ४ काहिलींतील गूळ खरवडण्याचें खुरपें . ५ ( कर . ) मोठी किल्ली .
|