|
पु. १ तीळ , भुईमुग , करडई वगैरेचे तेल काढण्याचें साधन , यंत्र सांचा ; तेलाची गिरणी . घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । - ज्ञा १७ . ४१९ . २ तेल्याच्या घाण्याची लाट जींत फिरते ती लांकडी कुंडी . ३ एका वेळीं जातें , गिरणी , घाणा इ० मध्यें घालावयाचा घांस ; एकवार घालावयाचें परिमाण ; तेल काढण्यासाठीं घाण्यांत घालावयाचें तिळाचें , करडईचें एका खेपेचें परिमाण ; खापरांत भाजण्याच्या , उखळांत कांडण्याच्या पदार्थाचें , धान्याचें औषधांचें एक वेळेचें परिमाण , भर , हप्ता . ४ उसाचा रस गाळण्याचा चरक . रणभूमीचा घाणा करौनि सरिसां । महाकाळु इक्षु गाळीतुसें जैसा । - शिशु १०४३ . ५ मकरसंक्रांतीच्या दिवशीं ब्राह्मणास दान देण्याकरितां स्त्रिया उखळावर जी धान्याची रास ठेवतात ती . ६ कांडण्याचा विधि ( देवक बसण्यापूर्वीचा ); लग्न , मुंज , इ० मंगल कार्यात दुरडींत तांदूळ घालून सौभाग्यवती स्त्रिया मंगलगीतें गात ते तांदूळ कांडतात तो विधि ; मंगलविधीच्या आरंभीं कांडण्याचा समारंभ करतात तो . ( क्रि० भरणें ; घालणें ). लग्न किंवा मुंज यांच्या साहित्याला आरंभ करण्याची सूचक ही घाण्याची चाल असावी . ही शास्थोक्त नाहीं . ७ चुना मळण्याची घाणी . ८ दौतींत उगीच लेखणी घालून ठेविली असतां होणारी विशिष्ट स्थिति , अवस्था . - शास्त्रीको [ प्रा . दे . घाण ; का . गाण ; गु . घाण ; सिं . घाणो = तेल्याचा घाणा ; तुल० ग्रहाणक - गहाणअ - घाणअ - घाणा - राजवाडे , पाटणचा शिलालेख शके ११२८ ; मूळअर्थ घाण्यांतला घांस ; हप्ता . ] ( वाप्र . ) घाणा करणें - १ ( मनुष्यास , प्राण्यास ) छळणें ; त्रास देणें ; गांजणें ; सतावून सोडणें ; शक्तीबाहेर काम करावयास लावणें . २ ( कागद , कापड , कपडे इ० ) विसकटून टाकणें ; अस्ताव्यस्त करणें ; चुरडणें ; गुधडणें ; सुरकुत्यांनीं युक्त करणें ; घुसडणे . घाण्यांत घालणें - ( एखाद्यास ) मोठया संकटांत लोटणें ; पेंचात पाडणें . घाण्यांतून पिळणें , घाण्यांतून काढणें - १ चेंगरणें ; चिरडणें ; पिळून काढणें . २ ( एखाद्यास त्याच्या ) शक्तीबाहेरचें काम सांगून , करावयास लावून , नि : सत्त्व , निर्बल बनविणें . ( एखाद्याचा ) भुसा पाडणें . घाणेकार - पु . ( गो . ) तेली ; तेलविक्या [ घाणा + करणें ] पु. एक मुलांचा खेळ . - व्याज्ञा १ . ३२९ .
|