|
- स मिळणें सर्वस्वी नाश होणें ( अक्षरश : आणि ल ).
स्त्री. - भूमी ; धरणी ; भुई ;
- नद्या , समुद्र लागेल .
- शेत ; लागवडीची जागा . राजापूर प्रांतीं सगळा कातळ आहे . जमीन थोडी .
- गच्ची ; मजल्यावरची भुई अथवा पेंडाची तयार केलेली भुई .
- वस्त्राच्या बाजूच्या कांठांमधील आंतील अंग ; तवा .
- चित्राची पार्श्वभूमि .
- ( ल . ) मूळ आधार . भूई पहा .
जमिनीचे प्रकार :- पड जमीन = नापीक जमीन . वहित जमीन = लागवडीची जमीन . तणेली जमीन = गवत माजलेली जमीन . करळ - चोपण - खळगट जमीन = कांहीं खोलीवर चुनखडीसारखा टणक थर असलेली ; हींतून पाणी लवकर झिरपत नाहीं . आगरी जमीन = समुद्र किनारीं , नदीच्या किंवा खाडीच्या काठीं असणारी रेताड जमीन . हींत रेतीपेक्षां मातीचा अंश अधिक असल्यामुळें नारळीच्या बागा करतात . कागदाळी = गोवा , कारवार कडील सुपारी , वेलदोडे यांच्या लागवडीची जमीन ; मध्यम काळी = देशावरील जमीन . हींत २ ते ४ फूट माती असून खालीं मुरूम असतो . भारी काळी जमीन = मोठया नद्यांच्या खोर्यांतील पंधरा - वीस फूट खोल काळी माती असलेली जमीन ; कूर्याट जमीन = कों . ) डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणीं बांध घालून केलेली भात जमीन . खाजण - खारी जमीन = खाडी अडवून केलेली ; हीस गझणी , कनटूर , सापळ , भाटी इ० नावें आहेत . पुळणवट =( कों . ) वाळूची किंवा रेताड जमीन ; हींत नारळाची लागवड होते . हीस रेवे , रेवट , शीट्टा इ० नावें आहेत . बांधणरब्बी =( कों . ) डोंगराच्या माथ्यावरील कातळांत भोंवतालची माती येऊन झालेली. मळखंडी = ह्या जमीनी गाळानें तयार झालेल्या असतात . त्यांचीं खांचरें बनवीत नाहींत . त्या देशांतील जिराईत जमिनीसारख्या मोकळया ठेवितात . अशा जमिनीवर ठाणें , कुलावा जिल्ह्यांत पावसाळी गवत होतें . या प्रकारच्या जमीनींत मानवट म्हणून एक भेद आहे . घाटावरील करळ जमीन व कोंकणांतील मानवट जमीन यांत बरेंच साम्य आहे. मळई = नदीकांठची , गाळानें सांचलेली . वायंगण =( राजा . ) पावसाळी भात काढल्यावर रब्बीच्या वेळीं डोंगरांतील पाटाच्या पाण्यावर भाताचें दुसरें पीक काढितां येणारी . वरकस = डोंगराच्या उतारावरील जमीन . हिचें भरोड असें दुसरें नांव आहे . हिचे प्रकार दोन :- डोंगरी व माळ पहिलीची मशागत हातांनीं खणून करतात . जंगली भागांत हिच्यांत कुमरा - डाहळी या पध्दतीनें नाचणी , वरी , सावा , खुरासणी तीळ इ० पिकें काढितात , दुसरींत बैलाची नांगरट करितां येते . शेळ जमीन = डोंगराच्या खोलगट भागांत असणारी व सतत पाण्याचा झिरपा असणारी. मळी जमीन = दरीच्या पायथ्याशीं असणारी जमीन . हीस बैलू , गादळ अशीं दुसरीं नावें आहेत . [ फा . झमीन ; झेन्द , झेम ] ( वाप्र . )
म्ह० जमीन बादशहाची लेक माय - बापाची . सामाशब्द ०अस्मान एक होणें - सपाटून पाऊस पडणें ; धुरळा , धुकें यांनीं दिशा धुंद होणें .
- ( ल ) अतिशय गर्विष्ठ होणें .
०अस्मानाचें अंतर फार मोठें अंतर , तफावत . ०उकरणें आंगठयानी भुई उकरणें ( संकटग्रस्त , भीतिग्रस्त होऊन घोडा टापेनें जमीन उकरतो तसें ). ०ओढणें जमीन लागवडीस आणणें . ०धरणें - आजारीपणामुळें अंथरुणाला खिळणें .
- रागाला वश होणें .
०माडी ठेवणें बागाईत पिकाकरितां जमीन रिकामी ठेवून बाकीच्यांत एकच पीक काढणें . ०वाफेला येणें पेरण्याच्या हंगामाला येणें . ०सोडणें - जमिनींतून वर येणें , दिसणें ( पीक ).
- ( ल . ) दुखणें , दारिद्रय इ० तून वर येणें , उठणें .
०उत्पन्न न. - जमीनीचें उत्पन्न .
- सारा किंवा वसूल .
०जुमला पु. खेडेगांवांतील सगळी जमीन , घर , दार , वतन वाडी , कुरणें यांस व्यापक अर्थानें म्हणतात . [ फा . झमीन + अर . जुम्ला = सर्व ] ०झाडा पु. जमीनी , गांव , खेडें , यांची एक विस्तृत याद , यादी . ०दार पु. - ( व . ) इंग्रजीपूर्वीच्या राज्यांतील सनदी सरंजामी माणसें .
- स्वत : साठीं मेहनताना म्हणून कांहीं टक्के ( शेंकडा दहा टक्के ) वसूल कापून घेऊन बाकीचा वसूल उगवून सरकारांत पाठविणारा ; वतनदार . [ फा . झमीदार , झमीनदार ]
०दार, जमीनदार , जमीदार व कुळें पु.न.अव. - वंशपरंपरेचे सरकारी वतनदार , कामदार ; जसें - देशमुख - देशपांडया , ( कोठेंकोठें ) पाटील , कुलकर्णी .
- शेतीच्या उपयोगाच्या बर्याच जमिनी स्वत : च्या मालकीच्या असलेला सधन मनुष्य , त्या जमिनीचे वेगवेगळे गट करून ते जमिनीची लागवड करणार्या गरीब लोकांस ठराविक मुदतीपुरते देतो व त्यापासून जमिनीच्या भाडयाबद्दल कर ( खंड ) घेतो , अशा व्यवहारांत जमिनीचे मालकास जमीनदार व जमीनदाराचा हक्क , हुद्दा , धंदा ; जमीनखंड इ० .
- ( ल . ) लुच्चेगिरी ; छक्केपंजे .
०दारी मत न. ( ल . ) लबाडीचें , खोटें मत . [ फा . ] ०दारी जमा स्त्री. जमीनदाराकडून येणारा सरकारसारा , वसूल . ०दोस्त वि. - ( कुस्ती ) जमीनीला खिळविलेला ; लोळविलेला .
- सर्वस्वीं नाश झालेला ; फन्ना झालेला .
०धारा स्त्री. जमीनीचा कर ; सारा . ०नीस, नवीस पु. - शेत , जमीन , पिकें इत्यादींची पहाणी करून सारा ठरविणारा अधिकारी .
- ( क . ) दप्तरदार . [ फा . जमीन + नवीश ]
०बाब स्त्री. सारा ; कर . ०महसूल पु. जमीनबाब ; जमीनीपासून कराच्या रूपानें होणारें सरकारी उत्पन्न . ०मोजणी स्त्री. जमीनीचें क्षेत्र मोजून जमाबंदी करणें . ०शिरस्ता पु. जमिनीची पहाणी करून प्रत लावून ठरविलेला सरकारसारा . ०सांड क्रि.वि. ( राजा . ) जनिनीपासून निराळें ( उचललेलें ओझें ). जमीनीवर पाय नसणें चपळ घोडा , जलद पळणारा , गडबडया माणूस यांसंबंधीं योजितात . - स पाठ लागणें , स अंग लागणें , स पाठ वर पडणें , स अंग वर पडणें दुखण्यानें किंवा अतिशय दारिद्रयानें पीडणें - स पाय लागणें रोगमुक्त होणें .
|