Dictionaries | References ब बाहेर Script: Devanagari See also: बाहीर Meaning Related Words बाहेर बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : बाइजो बाहेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A बाहेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad,prep Out or without. Beyond.बाहेर करणें Part with; dispose of.बाहेरचा External. Strange.बाहेरची A woman under menstruation.बाहेर निघणें-पडणें Leave her husband and home and take to the streets, or dwell with a strange man.बाहेरची बाधा A term for demoniac possession. बाहेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb आत नव्हे असे Ex. त्यांनी अस्त्रे बाहेर काढली. MODIFIES VERB:करणे असणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmবাহিৰত bdबाहेराव hinबाहर kasنٮ۪بر کُن kokभायर malപുറത്ത് nepबाहिर panਬਾਹਾਰ sanबहिः tamவெளியே telబయట urdباہر adverb अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे Ex. हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmবাহিৰত bdबाहेरायाव kanಹೊರತು kasاَتھہٕ نٮ۪بَر kokभायलें malഅപ്പുറം mniꯋꯥꯡꯃꯗ oriବାହାରେ sanपरम् tamஅப்பால் telమించి urdباہر , خارج adverb बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने Ex. हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:निश्चयात्मक (Affirmative) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:बाहेरूनWordnet:asmবাহিৰে bdबाइजो benবাইর kanಬಾಲ kasنٮ۪بٕرۍ , نٮ۪بَر کُن , نٮ۪بٕرۍ کِنۍ malപുറമേയായി nepगुञ्जित sanबहिः tamஇருந்தாலும் telబైట urdباہر , خارج میں , بیرون میں बाहेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. स्त्री. सैम्याबरोबरचे बिनलढाऊ लोक , बुणग्यांसारखे सैन्याबरोबरचें लोक . ' बहिरीचें लोक जाधवा मागें जात होते . त्याचें मागें स्वार पाठवून बाहेर माघारे फिरविली .' - पेद २५ . ८८ . बाहिर , बाहीरबुणगे पहा .आंतल्या बाजूहून भिन्न ठिकाणीं ; आंत नव्हे असें . उदा० घराबाहेर .विशिष्ट देश - काल - मर्यादा उल्लंघून ; शिवाय ; वेगळा . उदा० महिन्याचे बाहेर ; शिरस्त्याबाहेर .स्त्रीनें आपल्या नवर्यासंबंधीं बोलतांना योजावयाचा शब्द . वाहेर सांग कीं जेवायाचें झालें आहे . याच्या उलट नवरा जेव्हां आपल्या पत्नीसंबंधानें बोलतो तेव्हां तो घरांत हा शब्द वापरतो . [ सं . बहिस ; प्रा . बहिरो ; म . बाहिर . बाहेर ] म्ह० बाहेरचे शत्रू पुरवतात पण घरांतील भेद पुरवत नाहीं . - टिले १ . ३६ . ( वाप्र . )०करणें विकून टाकणें ; काढून टाकणें ; दूर करणें ( जिन्नस , मालमत्ता इ० ).०काढणें हद्दपार करणें . दाहिजें प्रजळती वैरी चिंतिती आन । बाहेर काढिले । - वसा ४ .०जाणें ( स्त्रियांच्या भाषेंत ) लघवीला जाणें .परसाकडे जाणें ; बहिर्दिशेस जाणें .०निघणें पडणें - विवाहित स्त्रीनें आपला नवरा सोडून परपुरुषाकडे जाणें ; घर सोडणें ; गृहत्याग करणें .०बसावयास -जाणें -मित्राच्या घरीं बसण्याकरतां जाणें .शौचास जाणें ; बहिर्दिशेस जाणें . सामाशब्द -०कोट पु. बाहेरील तट किंवा किल्ला ; आंतल्या तटाच्या बाहेरील तट .आंतील तट व बाहेरील तट यांच्या दरम्यानची जागा .किल्ल्याच्या बाहेरील प्रदेश . ख्याल - पु . रंडीबाजी ; बहिर्त्र्यसन . [ फा . खियाल ]०ख्याली स्त्री. व्यभिचार ; रंडिबाजी . - वि .छिनाल ; रंडिबाज ; बदफैली ; व्यभिचारी .बाहेरचा नाद - छंद - चटक - तलप - व्यसन - वेड - संवय असलेला .०गांव पुन . मोठ्या गांवाच्या बाहेर असलेला लहान गांव ; उपग्राम .०चार पु. स्वैराचार ; रंगेलपणा ; बदफैली वृत्तीनें राहणें . घरचारच्या उलट . चारी वि . स्वच्छंदी ; रंगेल ; घराबाहेर स्वैर वागणारा ; रांडबाज .०चाल चाली बाहेरची चाल - स्त्री . ज्योतिषशास्त्रविषयक वेळ , काल . नक्षत्रांची विशिष्ट संज्ञा . सूर्य नक्षत्रापासून चालू नक्षत्रापर्यंतच्या सात सात नक्षत्रांचे गट करुन त्यांतील पहिल्या चारांस आंत चालीचीं आणि पुढील तिहीस बाहेर चालीचीं नक्षत्रें म्हणतात . आंतचाल पहा .०बट्टा पु. नाण्याची देवघेव करतांना मिळालेला फायदा ( याच्या उलट आंतबट्टा = नुकसान ); नाण्यांच्या अदलाबदलीच्या वेळीं द्यावयाची वटणावळ .०भितर भीतर - क्रिवि . बाहेर किंवा आंत ; बाहेरील बाजूस किंवा आंतील बाजूस ; आंतबाहेर ; कोठेंहि किंवा कोणत्याहि ठिकाणीं . तो घोडा कोठें बाहेरभितर असेल त्यास शोधून आण . [ हिं . ]०मुदी स्त्री. बाह्यशोभा , देखावा ; बहिरंग . - वि . बाहेरुन डौल करणारा . तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदी न सरती । - तुगा २८८० . [ सं . मोद = आनंद ]०रव बाहेरव बाहेरवसा बाहेरवासा - पु . बाहेरची बाधा पहा .०वाटेची - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .असणें - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .०वार न. ( राजा . ) बाहेरील आवार ; बाहेरील बाजू , प्रदेश ; आंगण . [ बाहेर + आवार ]०वारा क्रिवि . ( राजा . ) ( घराबाहेरील किंवा आवाराबाहेरील ) मोकळ्या जागेंत - जागेवर ; बाहेर . [ बाहेरवार ]०सवडी स्त्री. बाह्यदृष्टि . हेंचि पहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरसवडिया भंगीं । - ज्ञा १० . ३२६ . - क्रिवि . बाह्यत :; वरपांगी . बाहेरचा वि .बाहेरील बाजूचा ; बाहेरील .परका ; तिर्हाईत ; कुटुंबांतील नसलेला ( नौकर इ० ).हलक्या जातीचा ( अस्पृश्य . महारमांग , भंगी इ० ).न्हावी ( ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या भाषेंत ). बाहेरचा छंद , नाद - पु . रंडीबाजी . बाहेरची - वि . ( बायकी ) विटाळशी ( क्रि० होणें ; बसणें ). बाहेरची पीडा - स्त्री . उपदंश ; गर्मीचा रोग . बाहेरची बाधा , बाहेर बाधा - स्त्री . भूतबाधा , भुतानें , पिशाच्यानें इ० झपाटणें . ( क्रि० लागणें ; होणें ; असणें ). बाहेरचें - न . ( बायकी ) भूतबाधा . बाहेरला , बाहेरील - वि .बाहेरचा पहा .पृष्ठभागावरला . बाहेरली , बाहेरली पीडा , बाधा - बाहेरची पीडा पहा . बाहेरलें - न .( व . ) भूतपिशाचांची बाधा , पीडा , त्रास .( व . ल . ) नपुंसक . बाहेरा - पु . ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या कानशिलावर केलेला वार . बाहेरील - वि . बाहेरचा पहा . बाहेरील टांग - स्त्री . ( कुस्ती ) आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात आपल्या बगलेंतून घेऊन आपल्या दुसर्या हातानें त्याचें मनगट धरावें . आपल्या ज्या बगलेंत जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराचा गुढघ्यापासून घोटापर्यंत पाय अडकवून त्याला झोका देऊन पाडणें . बाहेरुन - क्रिवि . बाहेरच्या बाजूनें ; बाहेरच्या बाजूकडून . बाहिरलू - वि . बाहेरचा . आंगौनि एकूणा झोलु । फेडितांचि तो बाहिरलू । - अमृ २ . ४८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP