Dictionaries | References

बाहेर

   
Script: Devanagari
See also:  बाहीर

बाहेर     

See : बाइजो

बाहेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A

बाहेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad,prep   Out or without. Beyond.
बाहेर करणें   Part with; dispose of.
बाहेरचा   External. Strange.
बाहेरची   A woman under menstruation.
बाहेर निघणें-पडणें   Leave her husband and home and take to the streets, or dwell with a strange man.
बाहेरची बाधा   A term for demoniac possession.

बाहेर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  आत नव्हे असे   Ex. त्यांनी अस्त्रे बाहेर काढली.
MODIFIES VERB:
करणे असणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmবাহিৰত
bdबाहेराव
hinबाहर
kasنٮ۪بر کُن
kokभायर
malപുറത്ത്‌
nepबाहिर
panਬਾਹਾਰ
sanबहिः
tamவெளியே
telబయట
urdباہر
adverb  अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे   Ex. हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे.
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmবাহিৰত
bdबाहेरायाव
kanಹೊರತು
kasاَتھہٕ نٮ۪بَر
kokभायलें
malഅപ്പുറം
mniꯋꯥꯡꯃꯗ
oriବାହାରେ
sanपरम्
tamஅப்பால்
telమించి
urdباہر , خارج
adverb  बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने   Ex. हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
निश्चयात्मक (Affirmative)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
बाहेरून
Wordnet:
asmবাহিৰে
bdबाइजो
benবাইর
kanಬಾಲ
kasنٮ۪بٕرۍ , نٮ۪بَر کُن , نٮ۪بٕرۍ کِنۍ
malപുറമേയായി
nepगुञ्जित
sanबहिः
tamஇருந்தாலும்
telబైట
urdباہر , خارج میں , بیرون میں

बाहेर     

क्रि.वि.  
 स्त्री. सैम्याबरोबरचे बिनलढाऊ लोक , बुणग्यांसारखे सैन्याबरोबरचें लोक . ' बहिरीचें लोक जाधवा मागें जात होते . त्याचें मागें स्वार पाठवून बाहेर माघारे फिरविली .' - पेद २५ . ८८ . बाहिर , बाहीरबुणगे पहा .
आंतल्या बाजूहून भिन्न ठिकाणीं ; आंत नव्हे असें . उदा० घराबाहेर .
विशिष्ट देश - काल - मर्यादा उल्लंघून ; शिवाय ; वेगळा . उदा० महिन्याचे बाहेर ; शिरस्त्याबाहेर .
स्त्रीनें आपल्या नवर्‍यासंबंधीं बोलतांना योजावयाचा शब्द . वाहेर सांग कीं जेवायाचें झालें आहे . याच्या उलट नवरा जेव्हां आपल्या पत्नीसंबंधानें बोलतो तेव्हां तो घरांत हा शब्द वापरतो . [ सं . बहिस ; प्रा . बहिरो ; म . बाहिर . बाहेर ] म्ह० बाहेरचे शत्रू पुरवतात पण घरांतील भेद पुरवत नाहीं . - टिले १ . ३६ . ( वाप्र . )
०करणें   विकून टाकणें ; काढून टाकणें ; दूर करणें ( जिन्नस , मालमत्ता इ० ).
०काढणें   हद्दपार करणें . दाहिजें प्रजळती वैरी चिंतिती आन । बाहेर काढिले । - वसा ४ .
०जाणें   
( स्त्रियांच्या भाषेंत ) लघवीला जाणें .
परसाकडे जाणें ; बहिर्दिशेस जाणें .
०निघणें   पडणें - विवाहित स्त्रीनें आपला नवरा सोडून परपुरुषाकडे जाणें ; घर सोडणें ; गृहत्याग करणें .
०बसावयास   -
जाणें   -
मित्राच्या घरीं बसण्याकरतां जाणें .
शौचास जाणें ; बहिर्दिशेस जाणें . सामाशब्द -
०कोट  पु. 
बाहेरील तट किंवा किल्ला ; आंतल्या तटाच्या बाहेरील तट .
आंतील तट व बाहेरील तट यांच्या दरम्यानची जागा .
किल्ल्याच्या बाहेरील प्रदेश . ख्याल - पु . रंडीबाजी ; बहिर्त्र्यसन . [ फा . खियाल ]
०ख्याली  स्त्री. व्यभिचार ; रंडिबाजी . - वि .
छिनाल ; रंडिबाज ; बदफैली ; व्यभिचारी .
बाहेरचा नाद - छंद - चटक - तलप - व्यसन - वेड - संवय असलेला .
०गांव   पुन . मोठ्या गांवाच्या बाहेर असलेला लहान गांव ; उपग्राम .
०चार  पु. स्वैराचार ; रंगेलपणा ; बदफैली वृत्तीनें राहणें . घरचारच्या उलट . चारी वि . स्वच्छंदी ; रंगेल ; घराबाहेर स्वैर वागणारा ; रांडबाज .
०चाल   चाली बाहेरची चाल - स्त्री . ज्योतिषशास्त्रविषयक वेळ , काल . नक्षत्रांची विशिष्ट संज्ञा . सूर्य नक्षत्रापासून चालू नक्षत्रापर्यंतच्या सात सात नक्षत्रांचे गट करुन त्यांतील पहिल्या चारांस आंत चालीचीं आणि पुढील तिहीस बाहेर चालीचीं नक्षत्रें म्हणतात . आंतचाल पहा .
०बट्टा  पु. नाण्याची देवघेव करतांना मिळालेला फायदा ( याच्या उलट आंतबट्टा = नुकसान ); नाण्यांच्या अदलाबदलीच्या वेळीं द्यावयाची वटणावळ .
०भितर   भीतर - क्रिवि . बाहेर किंवा आंत ; बाहेरील बाजूस किंवा आंतील बाजूस ; आंतबाहेर ; कोठेंहि किंवा कोणत्याहि ठिकाणीं . तो घोडा कोठें बाहेरभितर असेल त्यास शोधून आण . [ हिं . ]
०मुदी  स्त्री. बाह्यशोभा , देखावा ; बहिरंग . - वि . बाहेरुन डौल करणारा . तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदी न सरती । - तुगा २८८० . [ सं . मोद = आनंद ]
०रव   बाहेरव बाहेरवसा बाहेरवासा - पु . बाहेरची बाधा पहा .
०वाटेची   - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .
असणें   - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .
०वार  न. ( राजा . ) बाहेरील आवार ; बाहेरील बाजू , प्रदेश ; आंगण . [ बाहेर + आवार ]
०वारा   क्रिवि . ( राजा . ) ( घराबाहेरील किंवा आवाराबाहेरील ) मोकळ्या जागेंत - जागेवर ; बाहेर . [ बाहेरवार ]
०सवडी  स्त्री. बाह्यदृष्टि . हेंचि पहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरसवडिया भंगीं । - ज्ञा १० . ३२६ . - क्रिवि . बाह्यत :; वरपांगी . बाहेरचा वि .
बाहेरील बाजूचा ; बाहेरील .
परका ; तिर्‍हाईत ; कुटुंबांतील नसलेला ( नौकर इ० ).
हलक्या जातीचा ( अस्पृश्य . महारमांग , भंगी इ० ).
न्हावी ( ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या भाषेंत ). बाहेरचा छंद , नाद - पु . रंडीबाजी . बाहेरची - वि . ( बायकी ) विटाळशी ( क्रि० होणें ; बसणें ). बाहेरची पीडा - स्त्री . उपदंश ; गर्मीचा रोग . बाहेरची बाधा , बाहेर बाधा - स्त्री . भूतबाधा , भुतानें , पिशाच्यानें इ० झपाटणें . ( क्रि० लागणें ; होणें ; असणें ). बाहेरचें - न . ( बायकी ) भूतबाधा . बाहेरला , बाहेरील - वि .
बाहेरचा पहा .
पृष्ठभागावरला . बाहेरली , बाहेरली पीडा , बाधा - बाहेरची पीडा पहा . बाहेरलें - न .
( व . ) भूतपिशाचांची बाधा , पीडा , त्रास .
( व . ल . ) नपुंसक . बाहेरा - पु . ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या कानशिलावर केलेला वार . बाहेरील - वि . बाहेरचा पहा . बाहेरील टांग - स्त्री . ( कुस्ती ) आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात आपल्या बगलेंतून घेऊन आपल्या दुसर्‍या हातानें त्याचें मनगट धरावें . आपल्या ज्या बगलेंत जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराचा गुढघ्यापासून घोटापर्यंत पाय अडकवून त्याला झोका देऊन पाडणें . बाहेरुन - क्रिवि . बाहेरच्या बाजूनें ; बाहेरच्या बाजूकडून . बाहिरलू - वि . बाहेरचा . आंगौनि एकूणा झोलु । फेडितांचि तो बाहिरलू । - अमृ २ . ४८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP