स्त्री

See also STRĪ
ना.  अबला , नार , नारी , महिला , वनिता .
A woman: also a female animal. 2 One's wife, the wife of. 3 The female of trees and plants. 4 A word of the feminine gender. Ex. लेखणी ही स्त्री आणि चाकू हा पुरूष.
 स्त्री. १ बायको ; मादी . २ पत्नी ; स्वत : ची बायको ; भार्या . ३ स्त्रीलिंगी शब्द , वस्तु . ४ फळें येणारी वेल , झाड इ० . [ सं ..] स्त्रीचें सानें होणें - उतारवयांत स्त्रीनें पतीच्या आधीं मरणें . स्त्रीच्या नाकावर पदर येणें - वैधव्य येणें , सामाशब्द
०गमन   संग नपु . मैथुन .
०चरित्र  न. स्त्रीची चालचलणूक ; कावेबाज वर्तणूक इ
०म्ह०   ( गो .) स्त्रीचरित्र गाढ ; जोर्‍याक आयलें खाड तुम्ही चिकेसरा आड , जोयांचे वचूं नी खांड .
०चिन्ह  न. स्त्रीचें जननेद्रिय , गुह्य .
०दास   लंपत पर बुद्धि वश वि . स्त्रियांविषयीं आसक्त किंवा बायकोच्या मर्जीप्रमार्णे वागणारा ; बाईलबुद्धया . म्ह० स्त्रीबुद्धिप्रलयंगता . स्त्रीबुद्धि : प्रलयावहा .
०धन  न. स्त्रीची हक्काची मालमत्ता ( लग्नाचे वेळी मिळालेले दागदागिने किंवा आईंबापाकडून मिळासेलें ; धन इ० ). याच्यावर तिचा पूर्ण हक्क असतो . या धनाचे सहा प्रकार आहेत .
०धर्म  पु. १ स्त्री अस्पर्श होणें . २ लज्जा , विनय इ० स्त्रीचे गुण .
०धर्मिणी वि.  रजस्वला .
०पुरुषधर्म  पु. स्त्री . पुरुष यांची परस्पर कर्तव्ये .
०पुरुष   पु अव . नवराबायको .
०रत्न  न. सुंदर व पतिव्रता स्त्री .
०राज्य  न. १ पुराणांत वर्णिलेलें एक स्त्रियांनी चालविलेलं राज्य . २ ( ल .) ज्या कुटुंबात पुरुषापेक्षां . बायकोचें प्रस्थ जास्त असें कुटुंब .
०रोग  पु. प्रदररोग .
०लिंग  न. नामाच्या तीन लिंगापैकी जी , ती , ही अशा सर्वनामरुपांनी ज्या नामार्थाचा परामर्ष होतो त्या नामाचें जें लिंग तें . - वि . त्या लिंगाने युक्त .
०लोभ  पु. स्त्रीविषयीं आसक्ति ; स्त्रीलंपटपणा .
०हत्या  स्त्री. स्त्रीचा खून , स्त्रैण न . स्त्रीत्व - वि १ बायक्या . स्त्रादास पहा . २ स्त्रीसंबंधी ( व्यवहार ) [ सं .]
 f  A woman; one's wife.

Related Words

स्त्री   स्त्री सहसा प्रवृतेनाः प्रवर्तली तर निवर्तैनाः   सुकुमार स्त्री चोरवाट घरी, मनुष्याचे पर खालीं करी   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   न स्त्री स्वातंत्र्यमर्हति   दुसर्‍याची स्त्री विषवल्ली   शेताचें झाकड (ण) पाड व घराचें झाकण स्त्री   स्त्री . अराज्य   कडोसरी-स्त्री   लिपि-लिपिमात्र पुस्तक, योनिमात्र स्त्री   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   कुलवधू-स्त्री   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   अंगाखालची बायको or स्त्री   स्त्री-स्त्रीचें सोनें होणें   दोहो जिवांची स्त्री   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   अलंप्रतीति - स्त्री .   अलंप्रतीति - स्त्री .   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   कडोसरी-स्त्री   कुलवधू-स्त्री   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   दुसर्‍याची स्त्री विषवल्ली   दोहो जिवांची स्त्री   न स्त्री स्वातंत्र्यमर्हति   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   लिपि-लिपिमात्र पुस्तक, योनिमात्र स्त्री   शेताचें झाकड (ण) पाड व घराचें झाकण स्त्री   सुकुमार स्त्री चोरवाट घरी, मनुष्याचे पर खालीं करी   स्त्री-स्त्रीचें सोनें होणें   स्त्री सहसा प्रवृतेनाः प्रवर्तली तर निवर्तैनाः   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   काशीनाथशास्त्री उपाध्याय   विष्णुशास्त्री वामन बापट   स्त्रीगीत   स्त्रीजीवन   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person