मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
सुख आठवीन पतिचे

सगनभाऊ - सुख आठवीन पतिचे

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


माहालातुनि मि बाहेर आले चैन पडेना आंगणी ॥ध्रु०॥

काय आवस्ता जाली माझे शरिर हे खवखवते ॥

यास्तव बाहेर आले सख्यानो चरित्र ऐका सवते ॥

सुखदुःख चोरित नाही फळापुष्पावाणी पुढे ठेविते ॥

उभ्या कशाला राहाता बसावे स्वस्तपणे चौभाते ॥

कवळी ग माझी ज्वानी रुताला करकरा लवते ॥

हे लवणी स्थीर करिल कोण बाई सांगा वचनी गोवीते ॥

जसे दंत सळसळते गुदगुद्या करते जोबन दोन्ही ॥१॥

कामचेतना जाहाली शरीरी विशेष आग्र होती ॥

कंबरेत प्रिया निर्‍या भिजल्या चोळी भिजली छाती ॥

सर्पमधे गजराज टोचिती भाले जखमी होती ॥

त्या जखमेचा गुलान नाही झुकत चालला हत्ती ॥

मि बाहेर पडल्यावर भोवती लोक तमाशा पाहाती ॥

तसीच कळ सोशीते परंतु आम्ही अबरूंच्या गरती ॥

चांगले दिवस येतील केव्हा येऊन सांगा कानी ॥२॥

रंग माहालातील पलंग बिछोने गाद्यागिरद्या ॥

खाशा वैर्‍यावाणी पाठि लागते आणखी उषा उसोशा ॥

नग डागीने जडीत जोहार कोंदन केल्या खाशा ॥

आंधक दिसते तेज नाही ऐणे महाल आरशा ॥

विठ्ठल माझा तोही कोपला खचित जाली निराशा ॥

काय केली तुझी चोरी पदरी घाला जगन्निवासा ॥

आस करू कोणा तुजवीण सांभाळूना कोणी ॥३॥

मान्य करिना आर्ज विठ्ठल फारच उदास जाहाली ॥

जाते ग बायानो फिरत पंढरीच्या भोवताली ॥

संताचे पदि मस्तक ठेउन चित्तवृत्ती मन धाली ॥

च्यार दिवस सुख आठविन पतीचे भजन करिन सुरताली ॥

नको घाबरी होऊ एकांती जासुदजोडी आली ॥

खुशाल जाहाली अंतःकर्णी भेटला तिचा वाल्ही ॥

सगनभाऊ गुण गाती चाहाती ॥

गुणीजन गुण पाहुनी नवी ।

चाल रंग बहार रसीली तर्‍हतर्‍हेच्या बानी ॥

माझे मन भासते पतीविण झोप लागेना नयनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP