मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
झाला हो वनवास

सगनभाऊ - झाला हो वनवास

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


झाला हो वनवास पती गेले नवतीचा पाहाणारा ॥

आता कैचा राजा भरवी भरतपुरच्या राहणारा ॥ध्रु०॥

कुंकु कपाळी शोभत नाही रत्नागिरीच्या ज्योतीबा ॥

माझे हे रूपस्वरूप पारखे झाले हे तोबा तोबा ॥

पसा पसा डोळ्यातुन पाणी एकसाळ पद्मनाभा ॥

जसा ताण्हुले काढी ढोसर तुळजापुर जगदंबा ॥

डाहाळी जळुन कोळ जाती गळुन पडे भिंतीवर आंबा ॥

शापिले शक्रारी काय रे आज्ञांकित तुमची रंभा ॥

पुनरपी उद्धार होऊन काय शेषावर निजणारा ॥१॥

इंद्रादिक गांजिले दशकंठा जन्मामध्ये संव्हार ॥

मंदोदरी बोले रावणा नम्र होऊन जोडन कर ॥

मुळीच दुष्ट झालासी रामचंद्राशी काम होइल बरे ॥

श्रम घडवीले रघुरायाला हे तुजला मुक्तीचे घर ॥

शरण रिघाला बिभीषण बंधु पाहुनीया सारासार ॥

चिरंजीव आद्यापी त्यासी आर्पिले राज्यभार ॥

पतीसहित मी दीन असता कसे लुटले रे लुटणारा ॥२॥

काव्य ऐका श्रीकृष्णाचे क्रशीपुन यादव श्रापिले ॥

भागीरथीचे तीरी लढाई करून समग्र मारवीले ॥

दोन प्रहर रात्रीचे वेळे समाचार घेऊ ठरले ॥

धाय लोकळुन वृक्षाखाली चिंतातुर बसले ॥

तेव्हा किरति काय केले ॥

धनुष्य बाण ते क्षणी कसीले ॥

तळपाया तळहात मस्तक फोडून क्षितीवर लोळवीले ॥

बरे किराता जाउन सांगा सोमवंशीच्या झुंजणारा ॥६॥

अर्जुन बोले काय अज्ञा सांगावी राया धर्मा ॥

धर्म होणे रे बंधु राया निरदयी व्हावे घनःश्यामा ॥

सुभद्रेच्या कांता काकुळती येतो आत्मारामा ॥

बाण काढा प्राण चालला यासमयी वाचिव आम्हा ॥

चतुरभुज नारायण त्याच्या गती आशा सीव सीव रामा ॥

काय पाड आमच्या राज्याचा ठावे असे लिहीले कर्मा ॥

जीवंत असो पतिराज ते नको भेटवू भेटविणारा ॥

सगनभाऊ म्हणे सपुत कपुत कोण आहे रे झुंझणारा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP