मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
मी तर कळी कि जाईची

सगनभाऊ - मी तर कळी कि जाईची

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


उभी द्वारी मी वाट किती पाहू ॥

पंचप्राण तुम्ही रत्‍न कोठे ठेऊ ॥

वरकांतीची प्रित नको दावू ॥

इष्क करा पुरा जरा नको भिऊ ॥ध्रु०॥

मदनबाण तुम्ही मी कळी जाईची ॥

तुला पाहाता होती अग्न देहाची ॥

खूण मुद्रा ही बाळपणाची ॥

आशा तृप्त करा मज दीनाची ॥ बसा शेजारी आवडमनाची ॥

इष्क करा पुरा मी भुलली भिन्याची ॥

द्रीष्टी पाडता किती आलाप बला घेऊ ॥

मला सोडूनिया नका जाऊ ॥१॥

परी जात करून भाइ जवळ या हो ॥

मला घेउनिया पलंगी बसा हो ॥

वस्त्र आरमानी झटपट आज त्या हो ॥

आप हास्ते हाती गेंद हाता लाहो ॥

करीन नखरा आज इष्क चेतला हो ॥

मज दुरबळास माल गवसला हो ॥

विषयबाण भेदला कोणास होऊ ॥

शरीर दान करिन कोठे तुला पाहू ॥२॥

सुभरा चांदण्यामध्ये वाट तुझी पाहाते ॥

बसुन झुरक्यात मार्ग न्याहाळिते ॥

केव्हा याल लाल पेहेरवा मी करिते ॥

नग डागीने चकचकाटणे कर्ते ॥

राव बनसीचे दरशन आधी घेते ॥

भाव गर्तीचा दाउन पुढे येते ॥

मिठी घालुनीया मुखचुंबन देऊ ॥

सोडा राग भाग नका दुर जाऊ ॥३॥

सखा चमकुन हाती धरीला पूतळीने ॥

नेला मंदिरात हर्ष युक्तीने ॥

बसा शेजारी जवळ मला घेणे ॥

आंगसंग घेईन कपा द्रीष्टी पाहाणे ॥

लक्ष माझे मी थोरा घरचे केणे ॥

सगन भाऊचे गुण ऐकुन घेणे ॥

रामा दर्दीचे नवे छंद गाऊ ॥

गुरुनाथ सिद्ध प्रसंगात ध्याऊ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP