दासीला दुर नध० ॥
आ गे सखे घडी वरुषाची ॥
भेट करवा प्राणप्तीची ॥
नाही आस्ता धन द्रव्याची घालिते आण माझ्या रक्ताची ॥ध्रु॥
आ ग सखे गेंद गुलाला ॥
कुठे धुंडू छेलछबेला ॥
मी रतले त्या स्वरूपाला ॥
ममतेचा घालुन घाला ॥
आपला पण सिद्धीस नेला ।
शोभते मी कांता वचनाची ॥१॥
आ ग सखे जडित श्रृंगार ॥
करिते मी वारंवार ॥
मुदराखडी माथ्यावर ॥
कंठाने तु भरपुर ॥
चकचकाट चंद्रकोर ॥
शोभती करी आंगठी पाचुची ॥२॥
आगे सखे लोभ करावा ॥
दिलभर पलंगी असावा ॥
नखरा कोणास दावावा ॥
गोविंदविडा हाती घ्यावा ॥
चेतली अग्न या विषयाची ॥३॥
आ ग सखे कोमल कांती ॥
हाती धरुन चांदणी राती ॥
ही घडी वरुषाची जाती ॥
भोगावा सखा मंदिराती ॥
भाउसगन गुणीजन गाती ॥
रामजी चाल गाई नखर्याची ॥
घडी वरुषाची ॥४॥