पुणे शेहर गुलजार मुशाफर म्हणे येथुन जाऊ ॥
बादशाई बेदर पाहु ॥ध्रु०॥
सीताकांत रघुनाथ रामरूपी स्वरूपी सूर्य जासा ॥
उभा रणमंडळी भीष्म जसा ॥
श्रीकृष्णासी केली प्रतिज्ञा सुदर्शन घेसा ॥
पार्थ वीर पाहील तमासा ॥
रथी मारुनी दाहा सहस्त्र देवा पांडवासहीत पळसा ॥
नेला पण सिद्धीस ऐसा ॥चाल॥
किर्तीवान् कसे जाचे प्रतिमा कलयुगी ॥
देश दक्षिण बाकेराव राजद्रिं सौभागी ॥
सांब वरदायक जो शुचीर्भूत भोके वैरागी ॥
अर्धांगी वामांगासहीत संतोष सदा सेवू ॥
पांडुरंगी ज्याचा भाऊ ॥१॥
धनी समर्थ महाराज स्त्रीया आम्ही दोघे गुणशांती ॥
एक वचनी कोमळ कांती ॥
काय आम्ही चुकलो शेवेला बोल प्राणपती ॥
सख्याची अंतरती भक्ती ॥
प्राचीन नगर सोडुन जाता कोण ग्राम वस्ती ॥
तुम्हाला शुभ चिन्ह दिसती ॥चाल॥
स्वामी मर्जीने आम्हाला तृप्त करुनी या जा ॥
विनोद नाद नानापरीचे भाषण गोड बोलुनी या जा ॥
सखे लावु वाटे आलिंगन देऊन खुषाल जा ॥
पराक्रमासारखी प्रीत करा ॥
तुम्ही श्रीमंत राऊ ॥
कोणाच्या ग्रही नका राहु ॥२॥
अनेक सुर शिपाई चपळता तेजाची भरली ॥
जसा उगवला सहस्त्र तरणी ॥
छत्र चाचचे चबरी मोर्चिल हातची हातरमणी ॥
निघाला नमस्कार करुनी ॥
स्वरूपाकडे पाहवे ना वितळतो जागो जागी आग्नी ॥
इंद्र लाजतो इंद्र भुवनी ॥चाल॥
मुशाफर वेष घेऊन प्रपंचीक वस्त्र आसमानी ॥
स्वार आश्वावरती श्याम कल्याणी चतुरगुणी ॥
ध्यान गंगेमाते शुद्ध मार्ग टोक्या आज गंगा तिरि सुख पाहु ॥३॥
प्रार्थना करुन गंगेची आमचे लक्ष तुझे ठायी ॥
माय बहिण गे विठाबाई ॥
देसी विदेसी दो चौ महिन्या होता लवलाही ॥
प्रवासावीण कर्मत नाही ॥
राज्यभार सोडून गोपीचंद झाला गोसावी ॥
आमर काया जाणती शाई ॥चाल॥
कोणाची प्रीत कशी आंतरी जाऊन बेदर पहा ॥
पाषशाई तक्त दौलताबाद अगोदर पाहा ॥
किती सांगती तेथे कामशेनाचे गोषुर पाहा ॥
हरकुच गेले राव बाग पाहीला शितळ छाऊ ॥
उतरले तेथे उमरऊ ॥४॥
पाहुन दौलताबाद मनाची झाली संतुष्टी ॥
कीला बीन मोल उंबोरी ॥
सोरी प्रवास घेऊन निघालो ज्या कार्यासाठी ॥
शहर बैसर पाहाया साठी ॥
ललकारुन तुरुंग शाम कल्याणी ऐक गोष्टी ॥
तुझ्या आमच्या पडल्या गाठी ॥चाल॥
बाग बंगला पाहुन पुढे निर्मळ बागर सिरा ॥
देवालय आंबेचे चमत्कारिक प्रयत्न करा ॥
आंबेच्या दर्शना नगर नारीचा समदाऊ ॥
त्या प्रज गोयी खुण वाऊ ॥५॥
कल्पवृक्ष बंगल्याशेजारी पदार्थ इच्छीले ॥
गुण भूमिकेचे पादा वडीले ॥
सर्व सिद्ध साहीत्य होउनीया आनंदात बसले ॥
तेज सुर्यबिंब प्रकाशले ॥
जीवाभावाच्या विचित्र कांता त्याने पाहीले ॥
ध्यान गंगेचे अंतरले ॥चाल॥
उभ्या राहिल्या पुढे चांदण्या चंद्र पाहुनिया मग्न ॥
स्वरुप न्याहाळुन सारे अंतरी संतोष निमग्न ॥
येकेमेकास म्हणती कुमारी आम्ही लावू लग्न ॥
उखा चित्रलेखा म्हणे दावी चित्र लेहु लेहु ॥
प्रद्युम्न पाहता तृप्त जेउ ॥६॥
मर्यादा ठेउन पुस्त पाच्यारून सौंदर्या दिसते हिंदुपदचर्या ॥
म्हणे मुशाकर नका वीसरु गुणीयीं गुणकार्या ॥
खोल आहे प्रीतीचा पर्या ॥
आह्मी वनात फिरणार घरी लावण्य दोन्ही भार्या ॥
दिल्ही स्त्रीचरित्र क्रीया ॥चाल॥
गिता आठरा आधेय आर्या मोरोपंताच्या ॥
त्यातली खुण जाणुन कल्पना आंगी संताच्या ॥
थोर घरच्या पात्रा आहात तुम्ही भाग्यवंताच्या ॥
इष्क हा चांडाळ काळ महाकाळ वर धाऊ ॥
मग कैचा आठवे खाऊ ॥७॥
निराकारी दाखले आकारास आले ते ऐका ॥
नाही ठाउक नगर लोका ॥
सदासी वाचा भक्त बाणासुर कन्या त्याची उखा ॥
सुगर मिळाली चित्रलेखा ॥
स्वप्नामधे प्रघुन पाहता प्रदीप्त परम सखा ॥
आहे पुराणी जाची टीका ॥चाल॥
आहे माहीम स्वामी कल्पना जीवीच्या जीवलगा ॥
निपुण ज्ञानी पूर्ण माफ करोनी सोडा जागा ॥
बागर माणिक दुसरा समर्थाचे चित्राजोगा ॥
गंगा चंद्रभागा पांडुरंगास नका भीऊ ॥
पाक स्नेहा कोण ठेविल नाऊ ॥८॥
नाना यत्न प्रयत्न करूनी मोहिले सगुण मूर्ती ॥
गाऊन वचनी शर्ताशर्ती ॥
आपण जिवीच्या सख्या कुशळता दाऊ शुद्ध आर्ती ॥
इष्कसा गरी आली भरती ॥
गतपुरुषे शेहराची रचना पाहावी येशकीर्ती ॥
कृपा बरी पूर्ण आम्हावरती ॥चाल॥
राव राजंद्रि म्हण धन्य तुमचाच्यातुर्यपणा ॥
आशा भगवंताची नाही सफळ कल्पना ॥
सख्याला भाक दिधली फिरुन ये रस्ता रानोवना ॥
पद कडवे कवन शोधने आर्थ घेऊ घेऊ ॥
इष्क गातो सगन भाऊ ॥९॥