मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
तुझ्या आंगी इष्काच्या कळा

सगनभाऊ - तुझ्या आंगी इष्काच्या कळा

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


प्रांत पुणेकडे पठारचे राहणार पंढरीस जाऊ ॥

जिवाला घोर सखे नको लावू ॥ध्रु०॥

तुजवर आमची प्रित कसी तुज ठावे आहे की नाही ॥

जिवाला शोध करून पाही ॥

आज्ञा मोडून कधी तुझी आम्ही परग्रही गेलो नाही ॥

उभयताचे मन देते ग्वाही ॥

चवथा दिवस सरला पाचवे दिवसी कळले काही ॥

पतिसंगे रम जा ऐक ठायी ॥चाल॥

मनांत शोधुन पाहावे ॥

उतरलो तुका सखे सद्भावे ॥

पुढे गुण काय म्हणुन विसरावे ॥

आणखी भेटु नेत्र घेती लाहु ॥१॥

डोळ्यास आल पाणी ऐकता चपळा आकांत करी ॥

जिवाला का श्रम देता भारी ॥

चैत्रशुद्ध शुभवेळा त्रयोदशी दिन रवीवारी ॥

भाषण केले तिसरी प्रहरी ॥

मला बरोबर न्यावे निश्चय ठरला कारभारी ॥

हर्षयुक्त पाहावी पंढरी ॥चाल॥

मनचे मनात ठेवा ॥

पुरविली आस्ता नाहिं देवा ॥

भरवसा देऊनी जा ता गावा ॥

करुणाकर मी गरीब माऊं ॥२॥

ठाव घेतला नाही ठाव लागेना आस्तेविण ॥

जिव मिळल्यावर माहित खुण ॥

निमेशिमे गुण ठसते त्यांत सासुबाईचे चोरीन ॥

सवड पाहुन होते बोलणे करी करवाला पाहु सखे इच्छीले चित्तापुन ॥

हासु लागतिल सकळ जन ॥

मला घालतील डोई ॥

मग आठवावे कृष्णाबाई ॥

भ्रम फुटल्यावर होईल काऊ काऊ ॥३॥

मनोमन साक्ष आहे तुझ्या आंग इष्काच्या कळा ॥

भेदल्या नाही सखे वेल्हाळा ॥

आपली कुडी सजनाचा आत्मा एक दिसे कनवाळा ॥

तेव्हा पचवील विषाचा गोळा ॥

आकाश जरी कडकडले डंष तक्षके तोडला डोळा ॥

पार पाडील हरी सावळा ॥चाल॥

सूचना मात्र ग्रहसम ॥

केली नाही पुरविली आस्ता ॥

चातुरमास कर्मिले गुदस्ता ॥

तेही कळले प्राण घुलाऊ ॥

सगनभाऊ म्हणे कार्तिक मासी जे घडेल ते पाहु ॥

एक वेळ पंढरी दाऊ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP