मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
गोरे गाल मजा पहाल

सगनभाऊ - गोरे गाल मजा पहाल

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


गोरे गाल मजा पाहाल जपुन चाल फाकडे ॥ध्रु०॥

इष्क यार फार आम्हा छंद तुझा लागला ।

रंग पाहुन दंग झालो संग करू चांगला ॥

शरीर गोल वजन तोल पाहू तुझा मासला ।

उर छाती छनकदार नको पाहू चहूंकडे ॥१॥

चारी सोमवार मजा संगमावर पाहात जा ।

चौभोते लाल उभे मर्जीने राहात जा ॥

रावळ गवळ्याची चाल नित्य मुखी गात जा ।

बिसनीच्या छब्यामधे टिकत चाल फुल झडे ॥२॥

नवा करून थाट वाट बिसनीला घेरसी ।

ज्वारी बाजरीची जमिन जेव्हा तेवा पेरसी ॥

नेत्राच्या नखर्‍यामधि दर्वीला घेरसी ॥

शरीरदान करू कोणास नको पडू देउ साकडे ॥३॥

सकळ स्त्रियांमधे जोत तू बनलिस पुतळी ।

चोळी तंग पाहुन रंग जशी रंभा भूतळी ॥

नाथ सिद्ध सगनभाऊ कवन गाई रावळी ।

रामा दर्दीचे गुण चौमुलखी चौघडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP