ऋतु चौथा गे बाई ॥
तारुण्य रुपाशी काय करू ॥ध्रु०॥
मज भुलविलेल्या भ्रमराने ॥
होती जिवाची लाही गेल्या ठायी ॥१॥
परि मी चाहाते चातक पक्षा ॥
यामधे संशय नाही साक्ष विठाई ॥२॥
येउन बसतो मज शेजारी ॥
नाही बोलत देसाई मला त्या ठायी ॥३॥
येउन पलंगी राजस रूपडे ॥
रंग विलास त्या ठायी रामजी गायी ॥४॥