मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
नावडतिची साखर अळणी

सगनभाऊ - नावडतिची साखर अळणी

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


कुठे करमेली रात्र सांग रे वात सारिते मुखाकडे ॥

का निजलासी पाठमोरा हात येऊ द्या खव्याकडे ॥ध्रु०॥

निजल्या निजल्या काय मी बोलू उठून बसत पाय ते ॥

तुम्ही स्वस्त घ्या झोप रोप चापेचे कोमजल्या गाते ॥

उजवे अंग द्या सोडुन डाव्या आंगावरती घ्या कलते ॥

देठाषुन काळीज लखलखते शरीर पोटर्‍या थरारती ॥

जगप्रसिद्ध हे वर्म जाणोन केले कर्म कोण्या रिती ॥

मित्र बरोबर तुमच्या होता कि नवता सांगा प्राणपती ॥

नावडतिची साखर अळणी आसे काही कुडे पावडे ॥१॥

गुळ नाही गोड सीवाचा राव तुम्ही निद्रिस्त का जागे आसा ॥

नाहि तरी निमित्त घेऊन झोपेचे काय बोलते मग पुसा ॥

प्रधान पुत्र यकुलता एक त्याचा सत्वगुण आसा ॥

चोरी केल्यावाचुन सजणा आरूण उदय होईल कसा ॥

तेव्हा पित्याने मंत्र शिकविलाकिंचित वर्मी मिन जसा ॥

माणिक मोती सुवर्ण उचलुन दचकुन टाकी उसासा ॥

आखर शेवटी साळीच्या कोंड्याचे चोरिले गाठोडे ॥३॥

तुरुतदान महापुण्य म्हणावे कैसा दाता धर्मकरी ॥

येजीचे उसने सवेच देणे आहे सवाई समशेरी ॥

धर्मराज महाराज सौमवौसीचे हस्तनीपुरी चीखलाचा वारणा करून वाणे घेउन गेली गांधारी ॥

कोंती माता म्हणे भीमासी जारे बापा इंद्रपुरी ॥

आईरावतासी आणि पछाडून परत वाण कौरवा घरी ॥

विभीच्यावर कर्मास आसे दृष्टांत पापपुण्य कोणाकडे ॥३॥

गोडीने गोड शब्द मन वानवले मनाचे साक्षीने ॥

सखा सखी पोटासि धरूनिया पदरी घेतले पापपुण्ये ॥

हे मंदिर द्या सोडून दुसरे मंदिर सुंदर सहस्त्रा गुणे ॥

सर्व सिद्ध साईत्य न्युनता नाही नानापरि सुमने ॥

तिन प्रहार विनोद गुजरले चौथे प्रहरी सितापीने ॥

कामचेतना शांत झाली उभयता राजस वदने ॥

पाहिले नाही रविने केले कविने कसे काय हे कोडे ॥

सगनभाऊ म्हणे होनाजी बाळा उत्तर द्यावे रोकडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP