मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
त्याचे न माझे सैंवर झाले

सगनभाऊ - त्याचे न माझे सैंवर झाले

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


पति भर ज्वानीत मी भर ज्वानीत वर्ष बारा तेरा ।

त्याचे न माझे सैंवर झाले लोटले मास बारा ॥ध्रु०॥

लग्नाची तारीफ सांगते पहिलीच केली जुळणी ।

झाला वृत्तांत ऐकुन घ्यावा रुचीकर केवळ आळणी ॥

न्हायाला वसविले परंतु मी नाही आले वळणी ।

डाव्या बाजुला चौरंग त्यावर मौजेची खेळणी ॥

डोळा चुकवुन उर चोळावा जशी गव्हाची मळणी ।

माझ्या बहिणी त्याच्या मेहुणा हाटकाउन टाका मुळणी ॥

रंगाचा भडीमार सख्यावर लाली लाल सारा ।

रागे कोणाला भरले नाही भिजले गुलाल मारा ॥१॥

संताप्रति श्रुत केले परंतु राया साळयासी ।

ह्रदयी स्मरता जावे वनांत पर्वणी प्रयाग काशी ॥

मानवासी बहुत प्रार्थिले करुणा येई ना त्यासी ।

न्यान इनसाफ पाखर पक्षामधे प्रित आहे खासी ॥

पक्षामधे प्रीत आहे की नाही पुसते सांभ निवासी ॥

ऐकताच उत्तर पिंगळा कुजबुजला शांती सिवासी ।

शुभवेळा अमृतवेळा सुवेळ वेळ संहारा ॥

सुख जाले शरिरस उभा द्वारी पतीचा हलकारा ॥२॥

काये बोलू सुख वाटे ना हाटका गार पगारा ।

खरा प्रश्न घ्या ऐकुन जैशा जमिनीवर वर्षती गारा ॥

तंत्री मंत्री पुष्कळ भरले पूर्ण अभ्र ढगारा ।

शब्द तुम्हाकडे नाही माझ्या दैवी इंगळ सारा ॥

विठ्ठलदासी त्याची मी क्षणभर गाईन नाम नगारा ॥

ज्ञानेश्वराची ओवी, जनीचा अभंग कोणी तरी गा रे ॥

पतीच्या शोकांतरे हाळहळ ते संत हो वारा ।

लोटांगण घालीन चरणावर होईल विघ्ननिवारा ॥३॥

जासुद विनंती करी निघताना बोले आती श्नेहाने ।

दीले जरी पोषाख स्वामीला चक दौलतरायाने ॥

बाग बगीचि पाहाता राव येता आनंदाने ।

रण बहेरि रणतोफ शिपाई बरोबर सुरमर्दाने ॥

आले राजमंदिरी स्त्रियाला नाना रितीचे देणे ।

जैशी त्याची इच्छा तैशी पूर्ण करिल भगवान ॥

आयश आराम करा दिन होऊन प्रार्थिते द्वारा ।

सगनभाऊचे गुण ऐकुनिया गुणीचा होता मारा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP