उभारूनी बाह्या बला घेते बसुनीया ॥
आ रे माझ्या चोचल्या उभी साळू मुख पाहया ॥ध्रु०॥
काल सख्या तुम्हि सायंकाळी ॥
उभे होता तुम्ही तिसरे ताळी ॥
खेळतसे गंजिफा तुम्ही वनमाळी ॥
मारुन तुमची काय म्हणती गुणीराया ॥१॥
का करिता असे मला न्हाऊ घाला ॥
निम्मे अंग भिजल्यावरी मसि बोला ॥
गेंद पाहता न्हाता आता देते झोला ॥
नागावाणी डूला मुका घेते निजला ठाया ॥२॥
न्हाऊ उभयता बरे या सुखशयनी ॥
चिकटून बसते मोहोर उकलून वेणी ॥
इगडून धरिली ऊर बुंद आले नयनी ॥
मुदी रूपली नार करिती गाया वाया ॥३॥
न्हातो उभयता बरे भात फोडणीचा ऊन ॥
जेवू घालते तुम्हा उतरल चहडला सीन ॥
सगनभाऊ म्हणे सिद्धीस न्यावा पण ॥
रामा जाचा तोच जाणे व्यर्थ जन्म वाया ॥४॥