काशीचे राहाणार मुशाफर पंछी प्रवास गबरू ॥
नाही पाहिले गुलछनाबाद पाहावे यास्तव झाले स्वारू ॥ध्रु०॥
प्रातःकाळी प्रवास होणे ॥
आडीच प्रहर रात्र झाल्यावर एकांत ऐकतीस पट्टराणी ॥
स्वप्न दावील भगवंताने ॥
मनात होती कल्पना साडेसाहा सुभे दक्षिण एक वेळ पाहाणे ॥
कोमळ कांती राजस वदने ॥
करार झाला निश्चय जाता आम्हाला लागतील साहा महिने ॥
संगे काही नको दलभारू ॥१॥
घोडा सांगा सुज्ञानी ॥
जिनावर भरगच्ची कलाबतूचे जडले हिरा मिन्याचे पाणी ॥
कलगी सूर्यपान मुलतानी ॥
गळ्यात ताईत्या पेट्या आकबरी मोहरा पायी तोरड्या तुफानी ॥
आपण केला थाट पठानी ॥
तेव्हा अश्वावर स्वार झाली राव राजींद्र हिंदुस्थानी ॥
हातात भाला पाच हाती आरू ॥२॥
दर कूच चालले राजींद्र ॥
मार्गावरल्या नगरस्त्रिया टकमक पाहताच उगवला चंद्र ॥
कोण्या पट्टराणीचा भोगींद्र ॥
आमर पुरीचा राजा कोणी पाहिला दिसतो प्रत्यक्ष इंद्र ॥
मर्यादा आंगी क्षीर समुद्र ॥
एकमेकीला पुसती तारामतीचा होता असा हरिश्चंद्र ॥
भव्य स्वरूप धना कर तारू ॥३॥
इष्क बाज सावळी मूर्त ॥
उज्जनी बर्हानपुरची मजा पाहुनी आसे पैठणात ॥
स्वामी पाहावा एकनाथ ॥
स्नान गंगेचे करून दर्शन घ्यावे ज्या घरी पंढरीनाथ ॥
राहे ज्या देत कळावे घेत ॥
दुरुन पाहिले गुळछनाबाद देहात लागुनी गेली ज्योत ॥
भवते बाग मध्यसी शेहरू ॥४॥
खबर कळली नगर स्त्रीयासी ॥
बारवे तिरी मुशाफर उतरला उत्तरचा रहीवाशी ॥
शेषभास आल्या पाहाण्यासी ॥
सिरी घागर राण्याचा चंबू मोकळे हात सगुन गुणराशी ॥
प्रजन्यकाळी चपळ आकाशी ॥
फेंकसी नोक एकसारखी बरोबर नेत्राची बुंदखाशी ॥
तयासी बोले मुशाफर चारू ॥
लावणी सगन भाऊची ॥
जडणी रसीक दुधारी गहेरे वारू ॥५॥