मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
आले माहेरचे पत्र

सगनभाऊ - आले माहेरचे पत्र

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


आले माहेरचे पत्र सख्याला विनवणी सांगा ।

कृपा असावी मजवर ऐशी प्रार्थना सांगा ॥ध्रु०॥

मोकळे नाही पत्र लखोटे करून पाठविले ।

येताक्षणी प्राणविसावा किंचीत जवळ नाही ठेविले ॥

दोन्ही कागद वाचुन पाहावे काम आहे लिहीले ।

आत्मराज तुम्ही माझे तुमच्या इष्कामधे पोहोले ॥

जे ह्रदयाचे मित्र त्याला नाही सांगितले ।

ही शेवटची भेट मी तर मेल्याहुन मेले ॥

फार तुम्हाला छळीले जसे बोलीले ताग ॥१॥

आयुष्य मर्यादा माझी काय आहे त्रिनेत्रा ।

निमे सख्याला द्यावे निश्चये कमलोद्भवनेत्रा ॥

दरिद्र हारण केले ठेवीले चांगले मित्रा ।

दिले घेतले तुमचे खाते ठावे सर्वत्रा ॥

त्वरा आता जायाचे घरी यावे सत्पात्रा ।

गुणगोविंदे वाटे लावा सीरच्या सीर छत्रा ॥

जे झाले ते बरेच झाले जिवीच्या जीवलगा ॥२॥

काय तुझी उतराई होऊ सीर पदी ठेवीले ।

सारे निरुपण सांगा सख्याला हंसाला पाहीले ॥

षडरसी पक्वान्न मीष्टान्न सोवळ्याने केले चरचरीत शाखा पात्रावर संतोषे जेवीले ।

अमुका समुख भोजन केले ते आठवले ॥

आता बरोबर कैसे जेवण प्राणाला मुकले ।

क्रियाभ्रष्ट झाल्यास धरित्री देइना नागा ॥३॥

खिसमतदाराच्या हाती पत्रिका दिल्या भावार्थे ।

नानापरीचे करुन बोलणे घेउनिया येथे ॥

मुखजबानी सांगितली ऐकीली रायाने तेथे ।

जमाखर्च मागेच नाही वहीवर खाते ॥

जावे अथवा राहावे गरज नाही शोधुन पाहा पुरते ।

तुमची क्रीया तुम्हास लागेल काय जाईल येथे ॥

सगनभाऊ म्हणे जायाचे कोण आहे सद्या जोगा ।

बौद्ध्यरूपी पंढरीस हरी तो स्मरा दांडुरंगा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP