मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
कस्तुरीचा सुगंध

सगनभाऊ - कस्तुरीचा सुगंध

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


कस्तुरी वाळवित होते माडीवरती ॥

बेदरची कामसेना चतुर गुणवंती ॥ध्रु०॥

बेदर शहर आदि ठिकाणा ॥

पात्रा नांदे कामसेना ॥

चतुर गुणवंत देखिली वदना ॥

घरि अमिर द्रव्य खजिना चढती नवती ॥

साहाराग छत्तीस रागिण्या जाणत होती ॥चाल॥

साहा राग छत्तिस रागिण्या जाणत होती ॥

कंठांत जसि कोयाळ बोलुन पुरती ॥

ति एके दिवसी बसली माडीवरती ॥

अंमल अडचा प्रहाराचा दुपार कलथी ॥

कस्तुरी वाळवित होती आपले हाती ॥

मध्यम सुटला वायु त्याच वक्ती ॥

त्या कस्तुरीचा श्वास वायु संगती ॥

दौलताबादेस गेला राव बाच्छायप्रती ॥

आज कस्तुरी कोणापसी श्वास मारिती ॥

याउपर दिवाण बोले बाच्छाया प्रती ॥१॥

दिवाण म्हणे बाच्छाया अवधारी ॥

बेदरी वाळत असे कस्तुरी कामसेनाचे माडीवरी ॥

कि पवने श्वास आला येथवरी ॥ की सत्य जाणा ॥

बाच्छाय म्हणे सांभाळून बोला वचना ॥चाल॥

बाच्छाय म्हणे सांभाळून बोला वचना ॥

हे लटके झाले तरी सिर माराना ॥

ति वेळ लिहिली त्याच दिनमाना ॥

मग जासुदाची जोडी केली रवाना ॥

ति गेली बेदरी जिथे कामसेना ॥

ऐकता पुसु लागली धुंडती कवणा ॥

जासुद म्हणे बाच्छाये धाडिले आपणा ॥

पत्र दिधले तिजपासी वाची कामिना ॥

विचित्र हास्य कस्तुरी नाव निघताना ॥

वाळविली काणे दिवसी वेळ सांगाना ॥

लिहुन पाठवा ठिक या अर्थी ॥

मग बहिरी निजामशाहा गणिका पुसती ॥३॥

अमुक दिवस अमुक वेळ ॥

पत्र लिहीती गणिकाचे वेल्हाळ ॥

लाखोटे दिले करून त्या वेळ ॥

दिधले जासुदाजवळ ॥

कि जोडी फिरली दौलताबादेस ताबडतोब गेली ॥चाल॥

दौलताबादेस ताबडतोब गेली ॥

बाच्छाई कचेरी होती तेव्हा भरली ॥

खुर्निसा करून जासुदे पत्र अर्पिली ॥

साबाजि अनंताने हुजर वाचिली ॥

तो दिनमान ति वेळ ठीक निघाली ॥

ऐकुन हासे बाच्छाय शाबासकी दिधली ॥

आज पत्र तुम्ही चतुराई आम्हास कळली ॥

ही वार्ता दुनियामधे प्रगट झाली ॥

साबाजी रणाळे कर चातुरवल्ली ॥

बेदरी निजामशाहिची जोडी बनली ॥

ति इकडे कामशेना मनात झुरती ॥

साबाजी अनंताला पाहुन म्हणती ॥३॥

गणिका तेव्हा कामसेनाने ॥

सर्व श्रृंगार काढिला तिने ।

विंदिसिसफूल गळ्यामधे रत्ने ॥

नथनी बुलाख सुढाळ वदने ॥

गळ्यात चिंचपेट्या मनगट्या मणि ॥

कुसुंबी जरी पिसवाजरेल चरित कंठी ॥चाल ॥

कुसुंबी जरी पिसवअवेळ जरित कंठी ॥

रुणझुण पायि पोल्हारे जोडवे बोटी ॥

वरकड डागिन्याची घेतली पेटी ॥

बत्तिस अभरणे अवचळ द्रव्य गांठी ॥

गाडीत बसुन चालली बाच्छाय भेटी ॥

स्वर्गीहुन आली रंभा सुखाचे साठी ॥

हि उपमा साजे तिला चतुर मोठी ॥

पोहोचली दौलताबादेस हर्ष चित्ती ॥

चांभार टेकडीजवळ घेतली वस्ती ॥४॥

गायन करी कामशेना पुरती ॥

जंगली हरणे तेथे होती ॥

आलाफ केला त्याच ठायाप्रती ॥

गवरी रागिणी झालि बोलती ॥

तो आळविला तिने ॥

त्या नारिजवळी आली जंगली हरणे ॥

चाल ॥ त्या नारिजवळी आली जंगली हरणे ॥

बैसला तिचे सन्मुख रागज्ञानाने ॥

हार गळ्यातिल काढिला त्या गणीकेने ॥

हरणाच्या गळा घातला आप हस्ताने ॥

मग बाच्छाया फिर्याद केली त्या नारीने ॥

तुमच्या नगरामधे मला झालि आठवण रात्री ।

गळ्यांतुन हार नेला चोरून ॥

ह्या ठिकाणि लावावा मेहरबान ॥

ऐकुन बाच्छाय म्हणे दिवाणाप्रती ॥

हार इवा इजला द्यावा ऐसे म्हणती ॥५॥

हुकुम बाच्छाय ऐक असा जाहला ॥

सावजि अनंत तेथून निघाला ॥

संगे घेऊन कामसेनेला ॥

तेव्हा तो तिसी पुसू लागला ॥

कोठे ठिकाणी घेऊन गेला चोर त्या रानी ॥

मग दोघे चालली तेव्हा हस्त धरुनी ॥चाल॥

मग दोघे चालली तेव्हा हस्त धरुनी ॥

हार गेला तेथे बसली दोघे जा नी ॥

मग काय केले सावजि अतंतानी ॥

तो सर्व गुणसंपन्न पूर्ण चतुर ज्ञानी ॥

आळवी राग तेव्हा त्याच मैदानी ॥

हा सर्व मेळ हरिणाचा ऐकुन कानी ॥

त्या दोघांजवळ आले प्रिती करूनी ॥

त्यामधि नाही आला हाराचा धनी ॥

मागुन आला तयाचे पंक्ती ॥

तो आणिला कचेरिस बाच्छाय तेव्हा पाहती ॥६॥

फिरयाद झाली त्याच दिनमानि ॥

हार आणविला तिसर्‍या दिनी ॥

बाच्छाय खुशी त्यास पाहुनी ॥

धन्य एकाहून एक ज्ञानी ॥

जाली गनिकेसि मेहरबानी ॥

मोहोरा दिधल्या तबकभर ॥

ति म्हणति भोग मजला उभी समोर ॥चाल॥

ति म्हणतो भोग मजला उभी समोर ॥

माझा हेत आहे साबाजि अनंतावर ॥

एक रात्र द्यावी मजला घटका चार ॥

हे बरे म्हणुन बाच्छाये दिल्हे उत्तर ॥

सांगितले साबाजिला तिचे उजूर ॥

मग साबाजी अनंत गणिका ती नार ॥

अहो कळले ते तेव्हा माडीवरती ॥

पंजातिल मदन त्या दिवशी तिच्या हाती ॥७॥

माडीला शिडी होती लावली ॥

प्रथम पायरी काढिली पहिली चढता येईना ऐशी केली ॥

चढू जाता पायरीशेवटली ॥

नाही असे पाहुनी तेथे खुंटली ॥

साबाजिस म्हणे हस्त द्या मज कारण ॥

साबाजि अनंत उठला तेथून ॥चाल॥

साबाजी अनंत उठला तेथून ॥

पंजा धरताना तीचा उतरला मदन ॥

संपूर्ण जाहली भोग भोगिल्याविण ॥

हरला कामसेनेचा गर्व पुणे ॥

गुरु गोविंद राव वस्ती वाई ठिकाण ॥

हा नाथ सांप्रदा स्वतः जाचे दर्शन ॥

द्वादश पंथाचे आदेश नाथ नमनी ॥

सिद्धनाथ कविची कविता नाथपंथी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP