मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
कबूली जबाब

सगनभाऊ - कबूली जबाब

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


राजसा देउनि भरवसा कोण्या गोष्टीचा राग धरिला ॥ध्रु०॥

सावळी कांती पिवळी सुरत कवळी कोणास दाऊ ॥

भागले रात्री जागले तुम्हाला कोठे धुंडित जाऊ ॥

चुरमरून पदर सावरून झोप पलंगी एकली घेऊ ॥चाल॥

शृंगार करून उभी द्वारी ॥

चोरून जाता परभारी ॥

रोहोकुनि या वाटा च्यारी ॥

भागले रात्रि जागले तुम्ही तर पण सिद्धीस नेला ॥१॥

भरजरी बुट सोनेरी लाल पातळ पैठणी लेत्ये ॥

चकचकाट आरसेमहाल बिच्छाना सुभक करून ठेवित्ये ॥

हौसेने धरिन पदरास सख्याचे पुढे उभी राहते ॥चाल॥

कोठवर छळूनिया पाहाता ॥

परकीच्या घरी कसे जाता ॥ नित नवा रंग उडविता ॥

आर्जवात मर्जी धरा पाखरा लालडीच्या लाला ॥२॥

जोडली प्रित ताडिता कोणाचा आसरा मज नाही ॥

चालवा लळा अहो मि पडले आज सौशय नाही ॥

तुम्ही श्रीमंत आम्ही गरजवंत पाहाता पलंगी आज येई ॥चाल॥

का करिता पातळ माया ॥ लावण्य स्वरूप मी जाया ॥

या पलंगी बसा गुणिराया ॥

आधी विडा करुनीया देत्ये तुम्हाला मुख भरून बोला ॥३॥

ऋतु वसंत आमुचे दिवस सख्या आज करू इष्कबाजी ॥

लावण्य गळा कोकिळा तुम्हाला आहे मी आज राजी ॥

भोगावे बसुन प्रितीने ये ग खेळू चौसर बाजी ॥चाल॥

खुषरंग करून बेबहारी ॥ मी दासी पदरची प्यारी समजला तिचा कंसारी ॥

गुणिराज रामजी गाती सख्ये आठविता जा सजनाला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP