शिवचरित्र - लेख ९५
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
हू
[मूतमिनखानाची शि.व मो.]
श.१६२२ मार्ग. व,१३
इ.१७०० डिसें.२७
अज दिवाण सरकार किले राजकोट मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल सुज्याअंत शार सरदारानी व जमांतदारानिहाये नामजाद किले सागरगड बिदानंद सु॥ इहिदे मया व अलफ दरी विला आपाजी माहादाजी अदिकारी मामले मजकूर येंही हुजूर येऊन बंदगी हजरत मालुम केलें ऐसें जे देहरा कनकेश्वर येथे कार्तिकी पौर्णिमेस जत्रां भरत आहे ते ठिकाणीं जागांजागांहून आलंम जत्रेस जात आहे ते जागां हर कुदाम पेसंजीपासून जागे बसावयाचे वांटले आहेत त्यास आपला जागा पोखरणीचे उतरेस आहे ते ठिकाणीं साल गुदस्ता सागरगड येथील स्वारी गेली होती त्यापैकीं लोकां आपले आवालेयावर उतरले आम्हास बैसो दिल्हें नाही म्हणून जाहीर केलें त्याजवरुन खातरेस आणितां देशाई व अदिकारी व देशपांडे हे बाछाई जमीदार यांचे जागे ते ठिकाणी आहेत व तिघांचे दीप ते जागां लागत असत व जत्रेमध्ये वाणीउदमियापासोंन वानगी घेत आहेत म्हणून सुदामतीची ताहकिकात करोन खैरख्वा दामोदरभट पिटकर उपाध्ये व सेटे येही शाइदी दिल्ही यास तुम्हांस हुकूम सादर केला जात अंसे बाछाई जमीदार यास छडाछिडी केलियास तुमचा मुलाहिजा होणार नाहीं ताकीद समजणे छ २७ रजब [फा.मो.]
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP