मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ३०

शिवचरित्र - लेख ३०

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[आरंभी फार्शी मजकूर]
श.१५४५ पौष व. १
इ. १६२३ डिसें. २७

र्द देसक मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल मालुम दानद सुहुर सन अर्बा इशरैन व अलफ अर्दास छ १ माहे जिल्हेज इरसाल केळी र॥ छ १६ माहे मि॥ मजमुन सेरीकरास साहेबी ळुगडी देउनु माहाळास रवाना केलें कमीन माहाळास आळों साहेबी रजा फर्माविली जें हात्ररोखा नापीक आफ्त व बाकीदार खोताचा मामले माराचे कारकुनाजवली मागुनु पाठउनु देतो म्हणौनु तरी माहाळी कारकून तहसिलेची ताकीद करिताती तरी रयेतीवरी नजर अनायेत करुनु माहाळी कारकुनास हुजती सादर करवया रजा होयें म्हणौनु बयाजवार ळिहिले तरी तुम्हास हुजुरुनु माहाळास रवाना केलें तें वख्ती बाकीचा अमल सन सळासीचे आफ्ताचे बाबे हुकुमती रोखा सादर केळा आहें तेणेंप्रमाणें तुम्ही माहाळी जाउनू तो हुकुमती रोखा कारकुनास दाखउनु काये सरंजामी केली कारकून बेरीजवार हुजतीचा जाब मागताती म्हणौनु लिहिले तरी पेसजीच हुकुमती रोखाची मजमु वाचीळी की नाही हे दखल होत नाही अगर तुम्हीही तेणेंप्रमाणे सरंजामीचा जाब काही लिहिळा नाही बाजे हेकयेती लिहिली तरी त॥ सन इहिदी बाकीचे बाबे व सालमजकुरीचे सळासीचे आफताचे बाबे खोज दिलावरास हुकुमती रोखा सादर आहे तेणेंप्रमाणे सरंजामी करुनु बयाजवार खबर ळिहिणें जाब सादर होईल तेणेंप्रमाणें अमल कीजे रयेतीस तकवा दिलदारी देउनु कीर्दी मामुरी कीजे तुम्हास हुजुरुनु मामुरीचे बाबे पंद फर्माविला आहे तेणेंप्रमाणें सरंजामी न करिता तुम्ही जाणा महालास जाउनु हुजुरील पंद विसरोनु जाल आखैर मामुरी न होतें. वख्तीची आपली खेरेती ... असणे व सन अबार्काकारणे बरसात बरवा पडिला नाही याकरिता तमाम रयेती व खोत बहुत बेदिल हो उनु दिलगीर आहेत म्हणोनु लिहिले तरी बरसकाळाही बरवा मोईन पाहिजे यैसा पडिला आहे म्हणोनु खबरा येताती कैफवती लिहिणे दुरुस नाही मातल [फा.वा.मो.]
रुजु सुरुनिवीस
तेरीख १७ माहे रबिलावल
[कागदामागें] माहे रविलावल सुद
बारु सुद बारु सुद बारु सुद तालिक सुद
पैवस्ता छ १५ माहे रबिलाखर

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP