शिवचरित्र - लेख १६

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


शिवचरित्र - लेख १६
श.१५२१-२२
इ. १५९९-१६००

ई कौल दादे देसक व काजी हकीमसरा व सौदागर व देसाई व अदिकारी व सोटिया माहाजन व खोत व रयेती बी तपसील
सैद माहामद मीर सैदी
सैदजी
खोज जाफर
खोज बैर्‍हीम
इदी माहामद
रामाजी रंगाजी देसाई अज
हती गणेश पंडित देसाई
चिपाजी खोतु
गबाजी पुठिया मुकादम
गब्बाजी पोस प्रभु
जमाती पोसजी मोकादम
सराफ दतोदा मोकादम
सराफ दतोवा मोकादम नरसु कडू
कासार
सालवी कासार परवटनी
जनमदेट चिमाजी
रामसेटी नागोजी
नरससेट्‍ गबोजी
वागसेट महलोजी
काजी हकीमसरा
खोज अजम खोज निजामदी
माहामद हुसैन
खोज माहामद जामदार
मुलना अली
सुडक ठाकूर अदिकारी
तिमाजी कुलकर्णी
बकाल भिऊ चौधरी
कृष्णाजी येकद प्रभु
क्षेत्री गोविद व येमाजी मोकादम
गौली साल गौली चौगला
सोनार
वीस सेट  गोदसेट
सोम सेट पोस सेट

सदरहु देसक यासि धर्माजी गंभीराऊ सेटीया सिवा अकरा मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल सु॥ अलफु कारण आम्हास सागितले जे कसबेयामधे अकरा सिवामघे सालेचे दर घरास सालाबाद जेवण व लारी येक देणे व ज्याचे घरी वर्‍हाड होईल तेन्हे सेटियास सेला देत जाणें व ज्यास बेटा होईल तेण्हे हरकी म्हणौनु लारि येक देणें व करयातीमधे आकरा सिवाचे लोक कालण घोही हजाम सिपे सुतार सोनार कांसार लोहार पाथरवट रंगारे व मोची येही सालाचे जेवण म्हणोनु दर घरास लारियेक व कोण्ही लारी नीम देत असत व कासार बालाघाटी खरीद लरितात ळोखंड व पोत व काबी व तिसं बालाघाटिहून आणिताती व चेऊलीहून खरीद करिताती ताबे व मोड व कथील व सिसं व पितळ व कासं दर खंडीस लारी येक देताती व अकरा सिवाचे ण्याव मुनसुबी व खंडदंड व दीव प्रमाण व सिनलकी व निपुत्रिक हे बारनिसबत करयात व कासारामधी छतीस आहा (बा) डाचे कासार सारी कानु देताती व सेटिया अकर व सेटिया आपले गावी कासावीस करीत असेल त्यास निमकानु घ्यावी व आपला गाव सोडून सेटिया दुसरे गावी राहेल त्यास कानु सारी द्यावी व अकरा सज्याचे अन ज्याचे बापाचा मारा नसेल त्यास सारी कानु द्यावी व ज्याचे आंज्याचे व बापाचा मारा असेल त्यास कानु निम द्यावी याप्रमाणे सालाबाद चालत होते यामधे जो सिरजोरी करील व सेटियाचे बोलामधे नसेल त्यास मारावे त्याचे पाई बेडी घालावी असी रीत आहे दरीवख्त हक लाजिमा व जेवण कोण्ही देताती कोण्ही देत देत नाही कोण्ही रीत जालविताती कोण्ही रीत चालवीत नाही व जिकडे सेटिया गाव देस जाईल वर खारीस जाईल व मुलुक ज्याजती होईल व सेटिया बाहेर पडेल त्याबराबर बाहेर पडाव ज बाहेर न पडे त्यास खंड घ्यावा व खंडासी न मनील त्यासि मारुन खून करावा त्याचा खूण त्याचे गरदानेवर त्याचे खुनाचा दावा कोण्हावर वर नाही यैसे सालाबाज चालिले आहे हे बाबे समापत्र व देसाईयाचे कागद व मामलेयाचे कौल व दिवाणचे फरमाण आहेत हे हिमात व सिरजोरी करुन चालवीत नाही म्हणौनु सेटिया ब्याबाबे खर्च जाहाला म्हणौनु छत्री व दिवटी व नेजा व नफर व चाकर व घोडा या बराबर चालत नाही व देसकाहा बराबर गावई व दिवानकाम चालत नाही म्हणौनु सदरहु देसकी मनास आनुन विचार केला व विचार करुन निगुत केली मुहुर सन इहिदे पासुनु हा [क] लाजीमा जेवण नवे करुन दिधळे असे [स] दरहु बाबा अकरा सिवापासुनु व बालाघाटि कासारापासुनु हाक ळाजिमा व जेवण म्हणौनु [स] दरहु बाबा अकरा सिवापासुनु व बालाघाटि कासारापासुनु हाक ळाजिमा व जेवण म्हणौनु [स] दरहु लिहिले आहे त्याप्रमाणे घेत जाणें याप्रमाणे चालवीत जाइजे हे तुम्हास नवे करुन दीधळे असे याप्रमाणे औलाद अफलाद चालवीत जाइजे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-02-11T18:52:48.0630000