मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ४३

शिवचरित्र - लेख ४३

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[फा.शि.]
श.१५६७-६८
इ.१६४५-४६

ई कौलुनामा अज दिवाण माहालानिहाये हवाले सेख अबदुल [फते] हवालदार समत तलकोकण तं॥ देसमुखानी व अदिकारीयानी व देसकुलकर्णी व चौधरी व माहाजन व खोतानी व तमाम रयेत खलकुला लाहाणथोर कसबा व पेठा व माहाल आगर चेऊल तपे आठागर व देहाये कर्याती मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल सु॥ सीत अर्बैन अलफ दादे कौलनामा यैसाजे तुम्हीं आपुला (मक) सूदनामा पाठविला र॥ छ २१ रबिलाखर मकसुदु .... यैसाजे मामले मजकुरीची रवेस कानुकमाविस बर ....... कदीम कारकीर्दी निजामशाह दर जमाने मलिकअबर अजाजीत पटिया व मिरासदार पटिया व सादिलवार पटिया व गैर महसूल व निपुत्रिक व जुळुम ज्याजती व वेठी बेगारी व जाबती फर्मासी येक जरा सदरहु तसविजा लागलिया नाही याकरिता मामले मजकुरीची मामुरी जाली होती येण्हेकरि [ता] मलिक अबरचा ऐसाफ चौपातशाहीमध्यें जाला यावरी मलिक बफत जाले आणि तहवेली गलबले व फितरती जालिया व दुकाल काल पडिलियां धुंदमार्म जाली व कितेक रयेत परागदा जाली जागा जागा पर मळकास जाउनु कुल मुलुक खराब पडिला येकरोजाचे खावयास नाही यैसा हाल अहवाल जाला यावरी खुदाये तालाने रयेतीवरी मेहरेची नजर केली म्हण उनु मामले मजकुर हजरती बडेखान साहेबांस मुकासा अर्जानीं जाला हजरती बडेखान साहेबीं मलिकंबरी रवेसप्रमाणे कौल देउनु सदरहु तसवीस लागो दिधली नाही साले चार ई॥ सन तिसा त॥ इसने अर्बैन अलफ तेणेकरुन रयेत जागा जागाहून परमुळुकहून येउनु कीर्दी मामुरी करुन बंदर व कसबा व कर्याती मामूर होऊ लागलें व माहाली जे सरहवालदार व कारकून आले तेहीं कौल बरहुकुम पालनुक केली येणेंकरी [ता] नामोश पातशाहीतलग जाहीर जाला यावरी रयेतीचे कम [बेश] ...... जें बफत जाले माहाली
[अपूर्ण]

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP