मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ७७

शिवचरित्र - लेख ७७

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

श.१६१२ श्रावण वद्य ७
इ.१६९० आगस्ट १६

ई कौलनामा अज सुभा येतकातखान साहेब नामजाद त॥ तककोकण माळुम दानद ब॥ देसमुखान व देशपाडियान व मोकादमानी व रयानी सुभा चेऊल सा महिने पातशाही फौज येऊन बैसली आहे आणि तुम्ही रुजु जाले नाहीत यैसे नादान याउपर त्या प्राते दामाजी रघुनाथ व केरोजी पवार मनसफदार पाठविले आहेत यापासी येउनु रुजु होणे हे जो तह करुन देतील त्याप्रमाने चालऊन तमाम परगणे आबाद करुन आपले मजुरा करुन घेवणे प॥ पाली आसराब घारणे व आतोणे व तपे नागोठणे व मामले चेऊल स॥ परगणेयाचे दस्त बदस्त माइलेस समजाऊन म्हणौन कौल असे सन हजार ११०० माहे जिलकाद छ २० रोज

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP