मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ४०

शिवचरित्र - लेख ४०

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


त॥ श.१५६५ - ६६
इ. १६४३ - ४४

ई कौलनामा अज दिवाण म॥ हजरती राजश्री शामजी सिवदेऊ सरहवालदार व कारकून म॥ हाये स॥ तलकोकण त॥ देसमुखानी व अदिकारीयानी व देस व सेटेयानी व माहाजनानी व चौघले व बाजे मोख्तासर खुदा पेंठ रुस्तुमाबा मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल विदानद सुहुर सन आर्बा आर्बैन अलफ देसक मामले मजकूर मालूम केलें जे साहेब सलामत माहालास आलेयावरी गडगानजीक जागा खूब देखोन मुकाम केला त्यावरी साहेबीं आपणास बोलाऊन रजा फर्माविली कीं जागा खूब आहे येथें पेठेची वसाहत करणे म्हणोन रजा फर्माविली त्यावरी आपण रयेतीचा दिलासा करुन जागां जागां कौल देउनु साहेबांनजीक मोख्तासर खूब घेऊन आलों त्यांचा मुदा घेतां तेही मुदा लेहोन दिल्हा जे साहेंबी बारा सालांचा कौल मर्‍हामती केलियानी पेंठ मजकूर मामूर होईल व जहाजाची व बंदराची मामुरी आहे साहेबीं नजर इनायेत फुर्माऊन मकसूदप्रमाणे कौल मर्‍हामती केला पाहिजे म्हणउनी  देसकी माळुम केलें बराये माळुमाती खातिरेसी आणून तुमचे मकसूदनामेप्रमाणे कलमांचे कलम सरंजाम केला असे बीतपसील.

पेठ मजकुरी बाजाराचे रोजीं हमशाई कर्यातीचे बाजाराचे रोजीं हमशाई कर्यातीचे लोक बाजारास येतील बाजार मजकुरीं हरयेक जिनस खरीद करुन नेतील त्यांस जकाती माफ करणें त॥ कापडपटी पांच बाजे जिनस भूंस तार जकात माफ वजन मण ०१ तंबर करणे कर्यातीचे हम जकांत माफ करणे शाई बकाल व उदमी म्हणोन ज्याजती चाटे कोंकणचे बाजानेतील त्यास सवा रामधे हरयेक जिनस ईं वजा करुन खरीदी करीतील बाकी जकाती घेणे त्यांसी सवाई जकाती माफ करणे म्हणौन तरी सदरहुप्रमाणे जकाती ..... असे ज्याजती तसवीस न लगे निपुत्रिक व गैर महसूल व सिंगोटी व वर्‍हाडटका औलाद व अफलादबरी माफ असे तसवीस नल [गे]
[अपूर्ण]

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP